- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, वसई विधानसभा ; लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यंदा विक्रमी मते घेत विजयी होणार.. १३३ वसई विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे.विद्यमान आ.लोकनेते हितेंद्र ठाकूर,महाविकास आघाडीचे विजय पाटील व महायुतीतर्फे स्नेहा दुबे हे तिघे उमेदवार रिंगणात आहेत.गेली तीस वर्षे आ.हितेंद्र ठाकूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.१९९० पासून थेट २०१९ दरम्यान झालेल्या सहा निवडणुकांमध्ये त्यांच्या समोर कोणाचाही टिकाव लागू शकला नाही.प्रत्येक निवडणुकीत विरोधक विकासकामांवर न बोलता वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मानत आले.त्यामुळे आजवर झालेल्या सर्व निवडणुकीत वसईकर आ.हितेंद्र ठाकूर यांच्या पारड्यात भरभरून मते टाकत आले.सलग सहावेळा निवडणूक जिंकणे,हे वसईच्या मतदारांचे आ.ठाकूर यांच्यावर किती प्रेम आहे,हेच दाखवून देते.…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मोठ्या रकमा पाठवणाऱ्या लोकांची नावे कळायला हवीत, गेल्या चार ते पाच दिवसात वसई विधानसभा मतदारसंघात सुमारे तीन ते चार कोटी रु.रोख रक्कम पकडण्यात आली.ही रक्कम कोणाची आहे,हे येथील मतदारांना कळले पाहिजे.कारण तो त्यांचा अधिकार आहे.गेल्या आठवडाभरात पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे सात ते आठ कोटी रु.जप्त करण्यात आले.या रकमा पाठवणारे कोण ? ते कोणत्या उमेदवारासाठी पाठवण्यात आले ? ते स्विकारणारे कोण ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतदारांना कळायला हवीत. केंद्रीय निवडणूक आयोग हा पारदर्शक व्यवहार करतो,असा गाजावाजा सतत होत असतो.त्यामुळे आयोगाने या सर्वांची नावे जाहीर करणे,आवश्यक ठरते.हे पैसे कोण पाठवते,हे न कळण्याइतके येथील मतदार दुधखुळे नाहीत.गेल्या लोकसभा…
दीपक मोहिते, कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा, कुणबी सेनेने आज अचानक बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे इतर पक्षाचे धाबे दणाणले आहे.आज कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील यांनी बविआचे नेते व वसईचे आ.हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, होते गेल्या सात वर्षांपासून घटक पक्ष म्हणून कुणबी सेना भाजपासोबत सोबत होती.मात्र त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.त्यामुळे नालासोपारा वसई आणि बोईसर या तिन्ही विधानसभा निवडणुकीत कुणबी सेना बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देत आहे. यापुढेही स्थानिकांच्या अस्तित्वासाठी एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.यापुढेही आम्ही बहुजन विकास…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, राजेश पाटील यांच्या रॅलीला सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा, बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश पाटील यांच्या निवडणूक प्रचार दौ-याला आज सकाळी ९.०० वाजता कोळी पडघे येथून सुरुवात झाली.यावेळी काढण्यात आलेली भव्य प्रचार रॅली मान,बेटेगाव, वाळवे,महागाव,कुकडे,गारगाव – खानिवडे,शिगाव,हनुमान नगर,राणी शिगाव,गणेश नगर,काटकर पाडा अशा भेटी देत,बोईसर येथे पोहोचली.या रॅलीला गावागावातील नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात समर्थन मिळाला.आ.राजेश पाटील यांनी पाच वर्षे जनतेत राहून केलेल्या कामांची पोचपावती स्वागताने आणि जल्लोषाने मिळत आहे.त्यामुळे कार्यकर्ते व नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदैव कर्तव्यदक्ष तत्पर असलेल्या आ.राजेश पाटील यांना विक्रमी बहुमताने निवडून देणार अशी आश्वासने ठिकठिकाणी देण्यात येत होती. महिलांनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छाही दिल्या.…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” छगन भुजबळ व अजित पवार,अडचणीत… राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपण ईडीच्या त्रासामुळे भाजपसोबत गेल्याचे सांगितल्यामुळे राज्याचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे.राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकात याविषयी सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.त्यावर बोलताना भुजबळ यांनी मी असे बोललेलो नाही,असे माध्यमांना सांगत सुटले आहेत. छगन भुजबळ आता आपण अशी मुलाखत दिलीच नसल्याचा दावा करत आहेत.पण त्यांच्या या मुलाखतीमुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.संजय राऊत,सुप्रिया सुळे,नाना पटोले,यांनी अजित पवार गटावर टीकेची झोड उठवली आहे.त्यामुळे त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांचा याविषयी खुलासा करताना प्रचंड दमछाक होत आहे.संजय राऊत यांनी तर…
मुरबे गावात गावित याना स्थानिक भूमीपुत्रांनी काळे झेंडे दाखवले, जिंदाल जेटी,वाढवण बंदरास विरोध, पालघर, पालघर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची प्रचार रॅली मुरबे गावात आली असता स्थानिक भूमीपुत्रांनी रद्द करा,रद्द करा,मुरबे बंदर रद्द करा अशा घोषणा दिल्या. यावेळी काळे झेंडे दाखवून रॅलीला गावात प्रचार करण्यास विरोध केला. त्यामुळे गावीतांना किनारपट्टीत प्रचार करणे,आता अडचणींचे ठरले आहे. सातपाटी, मुरबे, चिंचणी,वरोर, दांडी आणि वाढवण या भागांत स्थानिक मच्छीमार मतदारांची संख्या बहुसंख्य आहे.गेल्या अनेक निवडणूकीत पश्चिम किनारपट्टीवरील या भागांतील मते ही राजेंद्र गावित यांची वोट बँक समजली जात होती.मात्र सद्यस्थितीत वाढवण बंदर आणि मुरबे गावाच्या हद्दीत जेएसडब्लयू जिंदाल जेट्टीला मंजूरी देण्यात आल्याने…
दीपक मोहिते, मुरबे गावात गावित याना स्थानिक भूमीपुत्रांनी काळे झेंडे दाखवले, जिंदाल जेटी,वाढवण बंदरास विरोध, पालघर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची प्रचार रॅली मुरबे गावात आली असता स्थानिक भूमीपुत्रांनी रद्द करा,रद्द करा,मुरबे बंदर रद्द करा अशा घोषणा दिल्या. यावेळी काळे झेंडे दाखवून रॅलीला गावात प्रचार करण्यास विरोध केला. त्यामुळे गावीतांना किनारपट्टीत प्रचार करणे,आता अडचणींचे ठरले आहे. सातपाटी, मुरबे, चिंचणी,वरोर, दांडी आणि वाढवण या भागांत स्थानिक मच्छीमार मतदारांची संख्या बहुसंख्य आहे.गेल्या अनेक निवडणूकीत पश्चिम किनारपट्टीवरील या भागांतील मते ही राजेंद्र गावित यांची वोट बँक समजली जात होती.मात्र सद्यस्थितीत वाढवण बंदर आणि मुरबे गावाच्या हद्दीत जेएसडब्लयू जिंदाल जेट्टीला मंजूरी देण्यात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” या निवडणुकीसंदर्भात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सुमारे २२ लाख ९२ हजार ६६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.एकूण मतदारांपैकी ११ लाख ८७ हजार ५८९ पुरुष तर ११ लाख ४ हजार २४६ महिला व २३१ तृतीय पंथीय मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये दोन लाख मतदार वाढले आहेत.१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६ लाख ८ हजार ५२६ मतदार आहेत,तर १३० पालघर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी २ लाख ९८ हजार ५७९ मतदार असून हा मतदारसंघ अनु.जमातीसाठी आरक्षित आहे.या व्यतिरिक्त १२८ डहाणू ( अनु.ज.) -३ लाख १ हजार २३९,१२९ विक्रमगड ( अनु.ज.)-३ लाख…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, बविआच्या महिलां बविआच्या महिला कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी नवीन फंडा, नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आ.क्षितिज ठाकुर यांच्या प्रचारासाठी आज हजारो महिला घराबाहेर पडल्या.यया महिला कार्यकर्त्यांनी शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन आ.क्षितिज ठाकूर यांनी गेल्या पंधरा वर्षांत केलेल्या विकासाकामाबाबत रहिवाशांना अवगत केले.महिलांनी राबवलेल्या या मोहिमेस नालासोपारावासीयांनी न भूतो न भविष्यती,असा उदंड प्रतिसाद दिल्यामुळे या महिला अक्षरशः गहिवरल्या.आजवर एकाही लोकप्रतिनिधीला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला नाही. आज सकाळी वारूळ फुटून मुंग्या जशा बाहेर पडतात,तशा आज हजारो महिला कार्यकर्त्या आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या.त्यानी घरोघरी जाऊन महिला,तरुण व ज्येष्ठांची भेट घेऊन आजवर केलेल्या विकासकामांची जंत्रीच मांडली.तसेच भविष्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या विकासकामासंदर्भात परिपूर्ण…
दीपक मोहिते, वसई-विरार मनपातर्फे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन, आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप अॅक्टीविटी अंतर्गत मा.आयुक्त तथा प्रशासक, वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी ०८.४५ वाजता वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, नवीन प्रशासकीय इमारत,यशवंत नगर रोड,विरार (पश्चिम) येथे मतदान जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या बाईक रॅलीमध्ये महानगरपालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी,तसेच महानगरपालिकेतील विविध विभागाचे कर्मचारी सहभाग घेणार असून सदर रॅली वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, यशवंत नगर रोड,विरार (पश्चिम) येथून सुरु होऊन बोळींज नाका,आगाशी नाका, निर्मळ नाका,होळी, पारनाका,कोर्ट नाका, माणिकपूर,अंबाडी रोड, वसंत नगरी,आचोळे व नालासोपारा पूर्व-पश्चिम ब्रिज मार्गावरून वसई विरार…
