दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
वसई विधानसभा ; लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यंदा विक्रमी मते घेत विजयी होणार..
१३३ वसई विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे.विद्यमान आ.लोकनेते हितेंद्र ठाकूर,महाविकास आघाडीचे विजय पाटील व महायुतीतर्फे स्नेहा दुबे हे तिघे उमेदवार रिंगणात आहेत.गेली तीस वर्षे आ.हितेंद्र ठाकूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.१९९० पासून थेट २०१९ दरम्यान झालेल्या सहा निवडणुकांमध्ये त्यांच्या समोर कोणाचाही टिकाव लागू शकला नाही.प्रत्येक निवडणुकीत विरोधक विकासकामांवर न बोलता वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मानत आले.त्यामुळे आजवर झालेल्या सर्व निवडणुकीत वसईकर आ.हितेंद्र ठाकूर यांच्या पारड्यात भरभरून मते टाकत आले.सलग सहावेळा निवडणूक जिंकणे,हे वसईच्या मतदारांचे आ.ठाकूर यांच्यावर किती प्रेम आहे,हेच दाखवून देते.
यंदाच्या या निवडणुकीत प्रचाराला अद्याप वेग आला नसला तरी,आ.ठाकूर यांनी गेल्या चार दिवसात व्यापारी मंडळे,सामाजिक संस्था,क्रीडा मंडळे,युवक व महिला मंडळे,बचत गट,शिक्षण संस्थांचे पदाधिकारी,धार्मिक संस्थांचे प्रमुख यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आजपासून त्यांनी प्रत्यक्ष मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे.या प्रचारादरम्यान त्यांना सर्वसामान्य नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद हा त्यांना विजयस्तंभाकडे घेऊन जाणारा आहे.गेल्या तीन दशकाच्या राजकीय वाटचालीत या मतदारसंघाच्या अनेक नागरी समस्या त्यांनी मार्गी लावल्या.त्यामध्ये पाणी,आरोग्य,शिक्षण,
रोजगार,या महत्वाच्या क्षेत्राचा समावेश आहे.गेल्या चाळीस वर्षात या उपप्रदेशात नागरीकरणाला प्रचंड वेग आला.तालुक्याची लोकसंख्या बघता बघता २० लाखाच्या घरात पोहोचली.अशा या तालुक्याला नागरी सुविधा देताना तत्कालीन नगरपरिषदांची प्रचंड दमछाक झाली,पण अशा या बिकट परिस्थितीला सामोरे जात आ.हितेंद्र ठाकूर यांनी राज्यशासनाकडून भरीव आर्थिक निधी आणला व नागरिकांना दिलासा मिळवून दिला.सूर्या पाणीपुरवठा योजनेचा दुसरा टप्पा मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली.आरोग्य व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगले योगदान दिले.विकासकामांचे अनेक प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवले आहेत,सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे आपल्याला आर्थिक निधी देताना सत्ताधारी पक्ष हात आखडत घेत असतात.पण स्वभावाने जिद्दी असलेले लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर त्यावर मात करतात,त्यामुळे या निवडणुकीत वसईची जनता या निवडणुकीत त्यांना विक्रमी मताधिक्यानी विजयी करतील,असे राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

