- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
संजय नेवे,विक्रमगड, प्रत्येक कुटूंबाला सक्षम करण्यासाठी शासन कटिबध्द-गोगावले, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचव ल्या जाणार असून जनतेने रोजगार हमी योजनेंतर्गत येणाऱ्या प्रत्सेक योजनांचा लाभ घ्यावा.त्यासाठी गावातील प्रत्येक कुटूंब सक्षम करण्यास शासन कटिबध्द आहे,असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन,खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथे आज केले. या कार्यक्रमास खा.डॉ.हेमंत सवरा, जि.प.अध्यक्ष प्रकाश निकम, आ.हरिश्चंद्र भोये,आ.राजेंद्र गावित,मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार वर्मा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) विजया जाधव, खोमारपाडा गावचे सरपंच विलास गहला आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी गोगावले म्हणाले की, पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. खोमारपाडा,या छोट्याशा गावाने एक आदर्श निर्माण केला आहे.खोमारपाडा हे…
दिपक मोहिते, वसई – विरार मनपातर्फे मुलांसाठी व्याख्यानाचे आयोजन, वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विविध ज्ञानमंदिरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.परंतु शिक्षणाबरोबर काही महत्वाच्या विषयासंदर्भात योग्य वेळी योग्य मागर्दर्शन होणे,तितकेच गरजेचे आहे. ज्यामध्ये लहान मुलांवर होणारे अत्याचार,त्यांच्या शरीरावर आणि मनावर सुद्धा आघात होता असतो म्हणून अशा मुलांसाठी ” चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श,”आणि ” स्वसंरक्षण,” ज्यामधून मुलांना योग्य वेळी काय आणि कशा पद्धतीने प्रतिकार करायचा,याबद्दल जागरूकता येईल,त्याच बरोबर व्यसनाधीनता,मग ती मोबाईल असो,वा अमली पदार्थांचा,सध्याच्या वसई-विरार परिसरात ही वाढत जाणारी समस्या आहे. अनेक ठिकाणी अमली पदार्थ सापडत आहे आणि यामध्ये आपला युवा गुरफटत…
नदीम शेख,पालघर, संविधान सन्मान समितीतर्फे संविधान प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, संविधान सन्मान समिती पालघर जिल्ह्याच्या वतीने काल चिराग विद्यालय भिमनगर बोईसर येथे संविधान प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरास प्राध्यापक सुनील देवरे यांनी मार्गदर्शन केले.त्यांचे संविधानावर प्रशिक्षणावर हे १ हजार ५४३ वे व्याख्यान होते. सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून, त्यामधील स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याचे स्पष्टीकरण करत त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.संविधान काय आहे ते समजा व त्याचा समाजामध्ये प्रचार व प्रसार करा,असे आव्हान केले.संविधानातील कलम १ ते ३२ व ३४०,३४१,३४२ या महत्वपूर्ण कलमांचे तसेच जनगणना कशाप्रकारे केली जाते,याविषयी माहिती दिली.तसेच आपले अधिकार व कर्तव्य,याची जाणीव उपस्थित असलेल्या ३० संस्थांच्या…
वसंत भोईर,वाडा, तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ता,हाच खरा भाजपचा मुख्य कणा आहे — खा.हेमंत सवरा पक्षनिष्ठा राखून दिवस-रात्र पक्षवाढीसाठी मेहनत करणारा तळागाळातील सर्व सामान्य कार्यकर्ताच खरा पक्षाचा मुख्य कणा आहे.गाव -पाड्यातील प्रत्येक घरातील व्यक्तीला भाजपचे ध्येय -धोरण,विचार पटले आहेत.भाजप पक्षाच्या विचारधारेचा कार्यकर्ता घरा-घरात असावा.भाजप हा जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे.असे उदगार पालघरचे खा.डाॅ.हेमंत सवरा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना काढले.ते वाडा येथे सदस्य नोंदणी अभियान बैठकीत बोलत होते. भारतीय जनता पार्टी तालुका शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानाची बैठक आज जिल्हा मध्यवर्ती कार्यालय वाडा,येथे पार पडली.या बैठकीस तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येक बुथवर किमान दोनशे सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार यावेळी…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” खा.सवरा यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्याबाबत पुढाकार घ्यावा, पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस त्रासदायक तसेच धोकादायक ठरू लागला आहे.रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या,अपुऱ्या लोकल्स व विविध असुविधा,अशा कारणामुळे रेल्वे प्रवासी सध्या अग्नीदिव्यातून जात आहेत.त्यामुळे नवनिर्वाचित सर्वपक्षीय आमदारांनी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेऊन चर्चगेट-विरार-डहाणू रेल्वे प्रवाशांच्या समस्या व अडचणी संदर्भांत चर्चा करावी,अशी मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. पालघर जिल्ह्याची लोकसंख्या आता जवसळपास तीस लाखाच्या घरात पोहोचली आहे.दहा वर्षांपूर्वी नवीन जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर सफाळे,पालघर,बोईसर, डहाणू,या परिसरात नागरीकरणाला प्रचंड वेग आला.याच दरम्यान चर्चगेट-डहाणू उपनगरीय सेवाही कार्यान्वित झाल्यामुळे या परिसरातील…
अभिजित पाटील,वसई, क्रीडाज्योतीचे माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते प्रज्वलन, ३५ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची क्रीडाज्योत आज विरार पूर्व येथून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील,स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत राऊत,माजी नगरसेवक विलास चोरगे,माजी नगरसेवक सदानंद पाटील निषाद चोरगे,राजन पोतदार आदी उपस्थित होते.ही ज्योत दुपारी २:३० वाजता कला क्रीडा मोहोत्सवाचा संदेश देत वसई तालुक्यात फिरून शेवटी महोत्सव असलेल्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर जाणार आहे.क्रीडा ज्योत वसई ॲडव्हेंचर फाउंडेशनचे धावपट्टू व मोटार सायकलस्वार घेऊन जाणार धावणार आहेत. क्रीडा ज्योतीचा मार्ग विरार पूर्व रेल्वे फाटक – स्वातंत्र्यवीर…
नवीन पाटील,सफाळे, नववर्षाच्या स्वागताचा होणार जल्लोष,रिसॉर्ट्स हाऊसफुल्ल, पालघर जिल्हातील किनारपट्टीचा भाग हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, केळवे,शिरगाव,बोर्डी,डहाणू नरपड अर्नाळा येथील समुद्रकिनारा तसेच माकूणसार,दातीवरे,दांडा खटाळी,मनोर व विक्रमगड तालुक्यातील रिसॉर्टवर पर्यटकांची गर्दी होऊ लागल्याने गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पर्यटकांचा ओघ या पर्यटनस्थळाकडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे रस्ते मार्गाने पर्यटक येण्यास धजावत नसत.पावसाळ्यामध्ये साधारण दोन अडीच तासाच्या प्रवासासाठी चार ते पाच तास लागत होते.त्यामुळे पर्यटकांची संख्या पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपासून रोडावली होती.मात्र आता या मार्गात सुधारणा झाल्यामुळे पर्यटक पुन्हा या येथे वळायला लागले आहेत. मुंबई,वलसाड,वापी व नाशिक भागातील पर्यटक पर्यटनाचा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरकारने आगीशी खेळ खेळू नये, आपल्या राज्यातील राजकीय,सामाजिक व आर्थिक स्थिती लक्षात घेता आपली वाटचाल अराजकतेच्या दिशेने सुरू झाल्याचे पावलोपावली जाणवू लागले आहे.बीड जिल्ह्यात सध्या जे काही चालले आहे,ते पाहता फडणवीस सरकार किती असंवेदनशील बनले आहे,हे दिसून येत आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस यंत्रणेला या हत्येमधील आरोपी सापडत नाहीत,हा प्रकार आगीशी खेळ करण्यासारखा आहे.आज त्या देशमुख कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता बीडवासियांचा उद्रेक झाल्यास सरकार व पोलीस देखील त्यावर नियंत्रण मिळवू शकणार नाहीत.कारण बीडच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी पोसलेले गुंड हातात…
जव्हार,प्रतिनिधी विक्रमगड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात, चिकित्सक समूहाचे एस.एस. आणि एल.एस.पाटकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स व व्ही.पी.वर्दे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स,गोरेगाव पश्चिम मुंबई यांच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट २५ तर्फे छत्रपती विद्यालय,चरी बुद्रुक, ता.विक्रमगड येथे २४ ते ३० डिसे. २०२४ या कालावधीत निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील समस्यांचे निरीक्षण करून त्यावर उपाय शोधणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना विकसित करणे अशी आहे. शिबिरामध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सत्रे आयोजित करण्यात आली असून,विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या माध्यमातून संधी देण्यात आली आहे.शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रमुख सत्रात…
दीपक मोहिते, ” विनाशाला आमंत्रण,” राज्यसरकारच्या नव्या मद्यधोरणामुळे तरुणाई विनाशाच्या वाटेवर, आपल्या राजकीय फायद्यासाठी महायुती सरकारने गेल्या वर्षभरात विविध योजना कार्यान्वित केल्या.या सर्व योजना सवंग लोकप्रियतेच्या असून त्यावर सरकारने आजवर हजारो कोटी रु.ची उधळपट्टी केली.या उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत आता खडखडाट निर्माण झाला आहे.महसुली खर्चात प्रचंड वाढ झाल्यामुळे सध्या राज्याचे आर्थिक गणित पार कोलमडले आहे.ही घडी पूर्ववत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार विविध स्तरावर प्रयत्नाला लागले आहेत.त्यासाठी त्यांचे सरकार राज्याच्या मद्य धोरणात लवकरच बदल करण्याच्या तयारीत आहे. महसुली तूट भरून काढण्यासाठी सरकार आता १९७२ पासून बंद असलेले दारूचे परवाने मुक्त हस्ते वाटप करणार आहे.राज्यात सध्या विदेशी दारूचे सतराशे,तर देशी दारूचे तीन हजार…
