- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
Author: दीपक मोहिते
सुनील किणी,नालासोपारा कळंब समुद्रकिनारी विद्यार्थ्यांनी साकारली वाळूशिल्पे, नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्रकिनारी कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर वाळूशिल्प साकारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.वसई विकसिनी दृक्-कला महाविद्यालय आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व्या राज्यस्तरीय वाळूशिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वसईतील आणि मुंबई परिसरातील विविध कला महाविद्यायातील २४० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.वरिष्ठ गटात एकूण ८ गटातून ४० स्पर्धक तर कनिष्ठ गटात एकूण ४० गटातून २०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.वरिष्ठ गटात वसई विकासिनी दृक्-कला महाविद्यालयाने प्रथम आणि व्दितीय क्रमांक पटकावला तर वडाळ्याच्या जे.के.अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन महाविद्यालयाने तृतीय क्रमांक…
सुनील पाटील,नायगाव, बहुजन विकास आघाडी व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश….. भाजपा पक्षाच्या नेतृत्वावर, विचारसरणीवर व कार्यशैलीवर विश्वास ठेऊन खा.डॉ.हेमंत सवरा,वसई विधानसभा आ.स्नेहाताई दुबे पंडित,सरचिटणीस श्री.अभय कक्कड यांच्या उपस्थितीत जिल्हा सचिव प्रवीण गावडे यांच्या प्रयत्नातून बहुजन विकास आघाडी नायगावचे अध्यक्ष धरेंद्र कुळकर्णी,उपाध्यक्ष कॅरलिन अलमेडा व त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,राजू म्हात्रे,उपाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे,निशिकांत म्हात्रे,धर्मेद्र मिश्रा,कैलास म्हात्रे,वृदांवन सोसायटीचे चेअरमन जयेश म्हात्रे,प्रमोद तिवारी,ललित म्हात्रे,भरत पाटील,विवेक भोस्कर, काशिनाथ बागुल,प्रदीप पाटील,मेघनाद पाटील,गितेश सुर्वे व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपक मोहिते, माणुसकीला काळिमा, मुला पाठोपाठ बापाने देखील गळफास घेतला, नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थाने कपडे,वह्या व पुस्तके न मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.हा धक्का सहन झाल्यामुळे त्याच्या वडिलांनीही त्याच दोरीला गळफास लावून आत्महत्या केली. बिलोली तालुक्यात मिनकी या गावात ही दुर्देवी घटना घडली असून संपूर्ण जिल्हा या घटनेने हळहळत आहे.हा मुलगा उदगीर येथे दहावीत शिकत होता,शाळांना सुट्ट्या असल्यामुळे तो आपल्या घरी आला होता.परत जाण्यापूर्वी त्याने कपडे,पुस्तके व वह्या घेण्यासाठी आपल्या वडिलांकडे हट्ट धरला होता.पण वडिलांकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्याला दोन दिवस थांबायला सांगितले,पण मी आजच उदगीरला जाणार आहे,त्यामुळे मला आजच द्या,असा हट्ट धरला.पण वडील त्याची…
दीपक मोहिते, निव्वळ धूळफेक, ड्रोनद्वारे समुद्रावर ” जागते रहो,” ; कितपत यशस्वी होणार ? राज्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मासेमारी बोटीतर्फे करण्यात येत असलेल्या अवैध मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याचा संबधित विभाग विविध उपाययोजना करत असते.आता अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई करण्यासाठी समुद्रावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.पण ही यंत्रणा कितपत यशस्वी ठरेल,याविषयी मच्छीमार साशंक आहेत. राज्याला सुमारे मुंबई ते थेट गोव्यापर्यंत सुमारे ७२० कि.मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.या समुद्रात गेल्या काही वर्षांपासून ट्रॉलरनेटच्या साहाय्याने,पर्ससीन,गिल नेट,एलईडी,डायनामाईट व रसायने वापरून अवैध रित्या मासेमारी करणाऱ्या प्रकारांना उत आला आहे.शेजारच्या गुजरात राज्यातील अनेक मासेमारी बोटी,सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवत घुसखोरी करतात व मत्स्यउत्पादन पळवून नेतात.तसेच…
दीपक मोहिते, राजकारण, दिल्ली विधानसभा : भाजप – आपमध्ये अटीतटीची लढाई,काँग्रेस लढणार स्वतःच्या अस्तित्वासाठी… केंद्रात आपले सरकार असूनही गेल्या दहा वर्षांपासून देशाची राजधानी दिल्ली आपल्याकडे नाही,हे शल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांना आहे.त्यामुळे पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक २०२४,वर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.या निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाली असून काँग्रेस पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे.आपचे अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशी समझोता करण्यास साफ नकार दिला आहे.हे दोन्ही पक्ष आता स्वबळावर रिंगणात उतरल्यामुळे भाजपला मतविभागणीचा त्याचा फायदा मिळू शकतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुमारे एकूण १ कोटी ५५ लाख मतदार असून ते आपल्या हक्काचे…
संजय लांडगे,वाडा, वाडा – मनोर राज्यमार्गावर झालेल्या अपघातात एक ठार,तीन जखमी, वाडा तालुक्यातील पाली गावाच्या हद्दीत वाडा – मनोर या राज्यमार्गावर टेम्पो आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात एक मुलगी ठार झाली.तर तिची बहीण भाऊ व टेम्पो चालक,असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. कंचाडहून वाड्याच्या दिशेने येणारा आयशर टेम्पो व वाड्याहून पालीच्या दिशेने जाणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला.या अपघातात दोन्ही वाहने रस्त्याकडेला उलटल्याने दुचाकीवरील तिघे व टेम्पो चालक,असे चौघांना गंभीर दुखापत झाली.त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता स्नेहा बंधू झिरवा ( वय२६ )…
वसंत भोईर,वाडा, धर्मवीर विचार मंचातर्फे तहसीलदार कार्यालयाला घेराव, तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या दगडखदान मालकांकडून सतत होत असलेल्या बोअर ब्लास्टिंग मुळे या गावातील ग्रामस्थांच्या घरांना तडा जाऊन त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या संदर्भात महसूल प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर आज धर्मवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाला घेराव घालून जाब विचारला. डोंगस्ते गावालगत असलेल्या मे.सी. स्क्वेअर कं.लि.( कॅप्टन इन्फ्रा लि.), मे. गुरुकृपा इंटरप्राईजेस या दगडखदान व्यवसायिकांकडून दिवस-रात्र बोअर ब्लास्टिंग केली जात असल्याने या गावातील अनेक गोर-गरीब शेतकरी,शेतमजुरांच्या घरांच्या भिंतीना तडे जाऊन घरांचे मोठे नुकसान झाले आहे.शिवाय येथील नागरिकांच्या जीवितासही…
वसंत भोईर,वाडा तुम्ही घेताय तो आवळा गावरान की संकरित? आंबट,तुरट व कडवट अशा चवीनी युक्त असणारा बहुगुणी आवळा बाजारात दाखल झाला आहे.या फळाचे सेवन सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष मोठ्या चवीने करू शकतात.औषध म्हणून आवळ्याचा उपयोग होतो. त्यामुळे सर्वजण आवळा खरेदी करायला प्राधान्य देत आहेत.मागणी वाढल्याने बाजारात गावरान अन् संकरित आवळा सुद्धा बाजारात दाखल झाला आहे. बाजारपेठेत आवला विक्रीला उपलब्ध झाला असून साठ रु. प्रति किलो दराने विक्रीला उपलब्ध आहे. आवळ्याचे लोणचे,कॅंडी,मुरंबा अनेकांना आवडत असतो.त्यामुळे अनेक गृहिणी हिवाळ्यात आवळ्याचे लोणचे तयार करतात. हायब्रीड आवळा आकाराने मोठा असतो. त्यामुळे यापासून इतर उत्पादित वस्तू करणे,सोयीचे होते.गावरान आवळा आकाराने छोटा असतो.त्यात गर कमी असतो रस…
जव्हार प्रतिनिधी, वाचनाचे अनेक फायदे असुन युवकांनो वाचक व्हा – नितीन आहेर, वाचनाचे अनेक फायदे असून युवकांनी वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे,असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांनी केले.ते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित ” महाराष्ट्राचा वाचन संकल्प, ” या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेत बोलत होते. नितीन आहेर हे जिल्हा परिषद शाळा नवीवाडी येथील प्राथमिक शिक्षक असून पालघर जिल्ह्यात उत्तम वक्ते व प्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणून ओळखले जातात.आपल्या भाषणात त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,वाचनामुळे ज्ञान, शब्दसंग्रह,सकारात्मकता, विचारशक्ती,सर्जनशीलता, कल्पनाशक्ती,एकाग्रता आणि संयम वाढतो.तसेच,वाचनाने आत्मविश्वास आणि हजरजबाबीपणाही वृद्धिंगत होतो. आहेर यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अब्राहम लिंकन, स्वामी विवेकानंद आणि आईन्स्टाईन…
वसंत भोईर,वाडा, आदिवासी विकास महामंडळाच्या भातावर उंदीर घुशींचा डल्ला,साडेचार हजार क्विंटल भात वाया तालुक्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत भात खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यात येते.दरवर्षी काही ना काही कारणाने ही खरेदी वादात सापडत असते. या विभागाचे अधिकारी मात्र उपाययोजना करण्याऐवजी जव्हार,मोखाडा येथील कार्यालयात बसून उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम असतात.त्यांच्या या गलथान कारभारामुळे बळीराजा मात्र पार मेटाकुटीला आला आहे.अनेक हेलपाटे मारून ही ऑनलाइन नंबर येत नसल्याने व जानेवारी अर्धा संपत आला तरी शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी विक्री होऊ शकली नाही.ते भात देण्यासाठी तिष्ठत उभे असल्याचे पाहायला मिळत आहेत.तर दुसरीकडे मात्र गोदामे जुन्या भातानेच भरलेली आहेत.त्यामधील धान्यावर उंदीर – घुशी डल्ला मारत…
