संजय नेवे,विक्रमगड,
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर लवकरच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार,
पालघर जिल्ह्यात जव्हार येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणे व विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा,अशा दोन मागण्या शिवसेनेचे शिंदे गटातील निकी नाईक यांनी केली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड व मोखाडा हे आदिवासीबहुल व अति दुर्गम तालुके असुन या भागात आरोग्याच्या समस्या मोठ्याप्रमाणात आहेत.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या जिल्ह्यात दरवर्षी कुपोषण व साथीचे आजाराचा प्रादुर्भाव होत असतो.पण वरील आदिवासीबहुल तालुक्यात प्रभावी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना उपचारासाठी मुंबई,नासिक व केंद्रशासित प्रदेशातील सेल्वासा येथे जावे लागते. या ज्वलंत समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात व स्थानिक रहिवाशांना दर्जेदार वैद्यकीय सोई – सुविधा मिळाव्यात,यासाठी शिवसेना शिंदे गटाचे निकी मनोज नाईक यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन या भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासंदर्भात निवेदन दिले.जव्हार येथे पतंगशहा कुटीर रुग्णालय हे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल निर्माण करण्यात यावे व विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, अशा विविध मागण्याकडे यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधण्यात आले.जिल्ह्याची आरोग्य व वैद्यकीय व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री लवकरच दौरा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

