दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद : फडणवीस यांचा शिंदे गटाला आणखी एक धक्का,
बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळख असलेल्या प्रताप सरनाईक यांनी परिवहनमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच त्यांच्यामधील बांधकाम व्यवसायिक अचानक जागा झाला.त्यांची वाकडी नजर एसटी महामंडळाच्या हजारो कोटी रु.मोकळ्या जमिनीवर गेली आहे.या जमिनीचा विकास करून महामंडळाला तोट्यातून नफ्यात आणण्याचे ते ” हसीन सपने,” बघू लागले.पण राजकारणात बेरके असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सरनाईकांचे प्रताप ओळखले व त्यांचे पंखच छाटून टाकले.
फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेले महामंडळाचे अध्यक्षपद काढून घेत,त्यांच्याजागी राज्याचे अति.सचिव संजीव सेठी यांची अध्यक्षपदी वर्णी लावली आहॆ. हा शिंदे गटाला आणखी एक धक्का असल्याचे मानण्यात येत आहॆ.
परिवहनमंत्रीपदी आल्या आल्या प्रताप सरनाईक यांनी राज्यात सुमारे ८४२ ठिकाणी असलेल्या एसटी महामंडळाच्या १३६० हे.जमिनीचा विकास करण्याच्या नावाखाली महामंडळाला अधिक खड्ड्यात घालण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.तत्पूर्वी त्यांनी दरवर्षी पाच हजार प्रमाणे एकूण २५ हजार वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहॆ.या गाड्या रस्त्यावर आल्या की महामंडळाचा दररोज होणारा तोटा भरून निघेल,असे त्यांचे म्हणणे आहॆ.आता जमिनीची विक्री करण्यासाठी त्यांनी कोणतीही जाहिरात दिली नाही.त्यामुळे या त्यांच्या निर्णयाविषयी संशयाचे धुकं निर्माण झाले होते.शासकीय जमिनीचा व्यवहार करण्यासाठी ” बांधा,वापरा व हस्तान्तरीत, ” करा,या योजनेतर्गत ४५ जागांचा विकास करण्यात आला, त्यातून महामंडळाला केवळ ३० कोटी रू.मिळाले होते.त्यामुळे परिवहनमंत्र्यांच्या हेतूबद्दल सनदी अधिकाऱ्यामध्ये संशय व्यक्त करण्यात येत होता.या सर्व घडामोडी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी आपले अधिकार वापरून सरनाईक यांच्याकडे असलेले महामंडळाचे अध्यक्षपद काढून घेतले व अति.सचिव असलेले संजय सेठी यांच्याकडे सोपवले आहे.यावरून फडणवीस सरकार शिंदे गटाला धक्का देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून आले आहॆ.

