Author: दीपक मोहिते

पालघर प्रतिनिधी, समाज कसा आहे,याविषयी शांतपणे संशोधन करायला हवं – डॉ.मिलिंद बोकील, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि समाजशास्रज्ञ डॉ. मिलिंद बोकील यांनी ” इरावती कर्वे : भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ,” या प्रा.प्रतिभा कणेकर लिखित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उदगार काढले. पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात झालेल्या प्रकाशन सोहोळा प्रसंगी ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले,प्रतिभाताई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होतोय, कारण एका मराठीच्या प्राध्यापिकेने समाजशास्राच्या दुसर्‍या प्राध्यापिकेचे चरित्र लिहिणं,ही वेगळी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.निवृत्त झाल्यानंतर पाच-दहा वर्षांनी सुद्धा एखादं पुस्तक लिहिता येतं,हे प्रतिभार्ताइंनी दाखवून दिलं आहे.चरित्र लिखाण ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतिभार्ताइंनी रसाळ आणि ओघवत्या भाषेत इरावती…

Read More

दीपक मोहिते, दिल्ली विधानसभा निवडणूक : सकाळपासूनच मतदानाला वेग, आज सकाळी सात वाजल्यापासून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.एकूण ७० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत १३ हजार ७६६ मतदानकेंद्रावर सुमारे १ कोटी ५६ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत.एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून भाजप व आम आदमी पार्टी,या दोन तुल्यबळ पक्षात सरळ लढत होत आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील रिंगणात आहे,पण या पक्षाचा फारसा प्रभाव पाहायला मिळत नाही. दिल्लीची राजसत्ता खेचून आणण्यासाठी भाजप पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरला आहे.तर आम आदमी पार्टीही तेवढ्याच ताकदीने त्यांना रोखण्यासाठी सज्ज झाली आहॆ. मतदानाच्या वेळी संघर्ष होण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाने अर्धसैनिकांच्या २२०,दिल्ली पोलिसांचे ३५…

Read More

सुरेश काटे,तलासरी, काजळी ग्रामदान मंडळावर माकपाचे वर्चस्व, तालुक्यातील काजळी ग्रामदान मंडळाच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदासाठी निवडणुका नूकत्याच पार पडल्या.या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजयी होऊन ग्रामदान मंडळावर पुन्हा एकदा लालबावटा फडकला आहे. ग्रामदान मंडळ कार्यालय काजळे येथे नायब तहसीलदार मुकणे यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या निवडणुकीत काजळी ग्रामदान मंडळावर अध्यक्षपदी ( सरपंच ) शंकर जलाराम वरठा,उपाध्यक्षपदी ( उप सरपंच ) जयेश रडका कोद्ये हे दोघे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार निवडून आले. ग्रामदान मंडळ ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी पुर्ण ताकत लावली होती.पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल झिरवा यांनी आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवल्यामुळे तसेच लोकांनी माकपावर विश्वास ठेवून जनतेने एकदा पुन्हा…

Read More

अनंत भोईर,पालघर, कॉपीमुक्त अभियान निकोप पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रु.- मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षा ११ ते १८ मार्च २०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा २१ फेब्रू.ते १७ मार्च २०२५,या कालावधीत पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक,लातूर व कोकण या विभागीय मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्याबाबत शिक्षण विभागाने आवाहन केले आहे.मात्र हे अभियान निकोप वातावरणात पार पाडले जावे, यासाठी सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे,यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला काही…

Read More

मनिष धानू,डहाणू रेल्वेच्या महिला अधिकाऱ्याकडून समाजहिताचा उपक्रम, गंजाडच्या जिल्हा परिषद शाळेचे अनेक विद्यार्थी आज सहलीसाठी डहाणूला आले होते.सहल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असते. अशा सहलीमधून त्याना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य विषयाची माहिती मिळावी, असा उद्देश या सहलीमागे असतो.असाच एक सुखद अनुभव गंजाड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना आला. या सहली दरम्यान विद्यार्थी व शाळेचे शिक्षक डहाणू रोड रेल्वे स्थानकात आले असता येथे असलेल्या एका रेल्वे सुरक्षा बलाच्या महीला अधिकाऱ्याने त्याना शिक्षण,तंत्रज्ञान,मोबाईल वापर व दुष्परिणाम,याविषयी उपयुक्त माहिती देत त्यांचे समुपदेशन केले.अगदी थोड्या वेळात त्यांनी उपयुक्त असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.ही महिला अधिकारी घोलवड रेल्वे स्थानकात जेंव्हा कर्तव्यावर असते,तेंव्हाही त्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करत असतात.त्यामुळे या…

Read More

संजय लांडगे,वाडा, जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत सोनशिव शाळा ठरली अव्वल, पालघर जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेतील कबड्डी या क्रिडाप्रकारात वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोनशिव ही शाळा प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वाडा तालुका गटशिक्षणाधिकारी जयवंत कामडी,बीटविस्तार अधिकारी सातपुते,केंद्रप्रमुख सुरेश ढवळे यांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षक यांचे जिल्हा परिषद शाळा सोनशिव येथे अभिनंदन व कौतूक करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वसंत दळवी क्रिडा शिक्षक, बबन ठाकरे, प्रशिक्षक विजय ठाकरे, प्रविण अधिकारी, मार्गदर्शक प्रविण गायकर, प्रगती भोईर,आरती घाणेकर, अध्यक्ष शशिकांत डोंबर, एस.एम.सी.सदस्य सोनशिव ग्रामस्थ,मंडळ महिला मंडळ, तरुण मंडळ आदी उपस्थितीत उपस्थित होते.

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे ” सायबर गुन्हे, ” मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद, डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे जनजागृती होणे,अत्यंत गरजेचे आहे.या उद्देशाने आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह,नवीन जव्हार,येथे पोलीस उपनिरीक्षक भुसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ” सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव, ” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात वसतीगृहातील विद्यार्थिनींना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार,त्यांची ओळख, तसेच अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, ओटीपी शेअरिंगचे धोके, बनावट कॉल्स,ऑनलाइन फसवणूक आणि सायबर सुरक्षेसाठी घ्यावयाच्या आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी वसतीगृहाच्या गृहपाल पुष्पा विश्वनाथ जाधव,तसेच इतर कर्मचारी…

Read More

दीपक मोहिते, पिडीत कुटुंबाचा आक्रोश, ४१ अनधिकृत इमारतीवर कारवाई : पिडीत कुटुंबाचे न्यायासाठी दारोदार भटकंती, नालासोपारा पूर्व भागातील ४१ अनधिकृत इमारतीमधील विस्थापित ४०० कुटुंबे सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत.खासदार व आमदारांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे.आपली फसगत झाल्याचे कळल्यानंतर ही कुटुंबे न्यायासाठी दारोदार भटकत आहॆ.आज या पिडीत रहिवाशांनी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्याना साकडे घातले.यावेळी आ.ठाकूर यांनी,माझ्याने जे काही करता येईल,ते मी नक्की करीन,माझ्या कारकिर्दीत मी ही बांधकामे तुटू नयेत,यासाठी प्रयत्न केले होते.व ही बांधकामे तुटली नाहीत.पण आता मात्र कारवाई झाली. त्यामुळे हा तिढा आता न्यायालयातच सुटू शकतो.या प्रकरणी ज्यांची तुम्हाला मदत होऊ शकते,ती घ्या,असे…

Read More

जिल्हास्तरीय पदाधिकारी,अधिकारी आणि कर्मचारी स्पर्धेत तलासरीचे घवघवीत यश, सुरेश काटे,तलासरी, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न, जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम उपाध्यक्ष पंकज कोरे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,शिक्षणाधिकारी संगीता भागवत,शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसई,पालघर,डहाणू, विक्रमगड,जव्हार,मोखाडा, वाडा आणि तलासरी,अशा आठ तालुक्यातील पंचायत समितीतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.दैनदिन सततच्या कामाचा ताणतणाव कमी व्हावा,यासाठी दरवर्षी पालघर जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेत विविध खेळ प्रकारातील क्रिकेट,कब्बडी,…

Read More

जव्हार प्रतिनिधी, दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा “ बँको ब्लू रिबन २०२४,” पुरस्काराने गौरव. दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या उत्कृष्ट बँकिंग सेवांच्या बळावर राष्ट्रीयस्तरावर मानाचा तुरा रोवला आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बँकेस प्रतिष्ठित ” बँको ब्लू रिबन २०२४,” हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे लोणावळा परिसरातील ॲम्बी व्हॅली येथे आयोजित विशेष समारंभात भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक मॅनेजर भार्गेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.बँकेचे चेअरमन निलेश ज.पाटील,व्हा.चेअरमन वैभव अभ्यंकर,संचालक हबीब अ. शेख,प्रवीण रा.मुकणे,ज्ञानेश्वर तु.मोरे,नरेंद्र र.प्रभू,नामदेव य. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बा.मुकणे यांनी हा पुरस्कार स्विकारला. या ऐतिहासिक सोहळ्यास सहकार…

Read More