Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कराड यांचे स्वतःहून हजर होणे,पडद्याआड नक्की काय घडले ? वाल्मिक कराड,किती नाट्यमयरीत्या प्रकट झाला,हे काल आपण पाहिले.गेले बावीस दिवस गुन्हे अन्वेषण विभागाची ९ पथके,बीड पोलीस यांना गुंगारा देणाऱ्या कराड याने स्वतः हजर होऊन पोलीस यंत्रणा कशी सडलेली आहे,हे दाखवून दिले आहे.महाराष्ट्र पोलीस हे कितीही अट्टल गुन्हेगार असो,पण त्याच्या मोबाईलवरून लोकेशन शोधून काढतात व त्याना गजाआड करतात,असा आजवरचा अनुभव आहे.मग संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शोधून काढण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला अपयश का आले ? याची चौकशी व्हायला हवी.पोलीस यंत्रणेवर दबाव असल्याशिवाय हे होऊ शकत नाही.सायबर गुन्हेगारांना हुडकून काढण्यात महाराष्ट्र पोलिसांचा हात कोणी पकडू शकत नाही.अशा या पोलिसांना…

Read More

दीपक मोहिते, खा.डॉ.हेमंत सवरा यांना अनावृत्त पत्र, भाग २, खा.सवरा यांनी शिवधनुष्य पेलावे,जिल्हावासियांकडून माफक अपेक्षा, पालघर जिल्ह्यात वर्षानुवर्षे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था व झालेले अनेक भीषण अपघात,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची याविषयी असलेली अनास्था,गेल्या तीस वर्षांपासून अडगळीत पडलेला डहाणू – नाशिक रेल्वे प्रकल्प,सध्या सुरु असलेल्या मुंबई – वडोदरा द्रुतगती मार्ग व बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये भूमिपुत्रांच्या जमिनी संपादन करताना झालेले गैरप्रकार व जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची महसूल विभागाकडून होणारी पिळवणूक,इ.महत्वाच्या समस्यांचा समावेश आहे.खासदार या नात्याने डॉ.हेमंत सवरा यांनी जटील समस्याचा पाठपुरावा करणे,आवश्यक ठरते. या व्यतिरिक्त पालघर जिल्ह्यात आदिवासी शेतकरी ज्या वनजमिनी गेली अनेक वर्षे…

Read More

प्रमोद बक्षी,आनंदवन, गडचिरोली, येणारे वर्ष सुख – समृद्धी – समृद्धीने ओतप्रोत भरलेले, म्हणता म्हणता चोरपावलांनी २०२४ सरत चालले.काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले.बघा ना,जेव्हा आपण घर बदलतो,त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण,त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो.तसेच, जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गतवर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात. व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे. “आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते..” शेवटी भूतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव,आठवणी यांचं कोलाज,असं म्हणतात.पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य होय.वर्ष कोणतेही…

Read More

दीपक मोहिते, ” माही वसई,” व  ” कोकण पर्व, ” या लोकप्रिय कार्यक्रमाचे वसईत आयोजन, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाकडून आयोजित करण्यांत येणाऱ्या भव्य कला क्रीडा महोत्सवाचे यंदाचे हे ३५ वे वर्ष आहे. रौप्य महोत्सवी कला – क्रीडा महोत्सवानिमित्त “ माही वसई,” तर ३० व्या वर्षानिमित्त “ कोकण पर्व कोकण सर्व,” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले आहे.वसई कला – क्रीडा महोत्सवाचे ज्येष्ठ पदाधिकारी मुकेश सावे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “ माही वसई,” या कार्यक्रमातून वसई तालुक्यातील विविध जातीधर्मीयांची संस्कृती, व्यवसाय,चालीरिती,परंपरा यांचे यथार्थ दर्शन घडवण्यात आले होते.तर ” कोकण पर्व कोकण, ” यामधून कोकण प्रांतातील सर्व जिल्ह्यातील जीवनपद्धती,संस्कृती…

Read More

वसंत भोईर,वाडा, उपसरपंचपदी विशाल पाटील यांची बिनविरोध निवड, तालुक्यातील घोणसई मेट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पडली.या निवडणूकीत उपसरपंच पदी विशाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. घोणसई मेट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिलीप पाटील यांची मुदत संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.आज उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.या निवडणुकीत विशाल पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ते बिनविरोध निवडून आले. त्यांच्या निवडीनंतर सरपंच शैला जाबर यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.ग्रामपंचायतीत विकासकामे करून आदर्श ग्रामपंचायत करू,असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.पीठासीन अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबल यांनी काम पाहिले.

Read More

संदीप बोराडे, डहाणू, वाकी ग्रामपंचायतीमध्ये महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न, डहाणू तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या आशागड-2 बीट अंतर्गत वाकी ग्रामपंचायतीमध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आ.विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच,जिल्हा परिषद सदस्य जयंवत डोंगरकर,सरपंच दिनेश दयात, ग्रामपंचायत सदस्य सावित्री कान्हात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात महिलांसाठी आहार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय,सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत स्थानिक महिलांनी पारंपरिक नृत्य आणि ” तारका, ” नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.कार्यक्रमाने महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणा दिली आणि ग्रामीण भागातील महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली. या मेळाव्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायतीने विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या प्रतिसादामुळे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कराड याचे स्वतःहून हजर होणे,सरकार व पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली… अखेर,वाल्मिक कराड स्वतःहून हजर झाला.त्याने स्वतः हजर होऊन पोलीस,राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व फडणवीसांच्या गृहखात्याच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहेत.सरकार व गृहविभाग कसे नसावे,हे या घटनेने दाखवून दिले आहे.तब्बल २२ दिवसांनी वाल्मिक कराड स्वतःहून हजर झाल्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर अज्ञात शक्तीचा दबाव होता,हे स्पष्ट झाले आहे.ज्या महाराष्ट्र पोलिसांची देशभरात ख्याती होती,ती या कराडाने अक्षरश: धुळीस मिळवली. एकेकाळी गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले विनायक वाकटकर,ज्युलिओ रिबेरो,विजय साळसकर,हेमंत केरकर,अशोक कामटे यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्र पोलिसांचे नाव शिखरावर नेऊन ठेवले होते,आज त्या महाराष्ट्र पोलिसांना या कराड महाशयाने तोंड दाखवायला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुख्यमंत्र्यांनी नितीश राणे यांना वेळीच आवरावे- काँग्रेस नेते थोरात, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान,त्यामुळे प्रियांका गांधी खासदार झाल्याचे वक्तव्य,मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केल्यानंतर राज्यात जोरदार वादळ उठले आहे.त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांनी राणे यांना आवरावे,अशी मागणी केली आहे.यापूर्वीही नितीश राणे यांनी ” मशिदीत घुसून मारू,” अशी वलग्ना केली होती. मुस्लिम समाजात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते.मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे,हा संविधानाने आखून दिलेल्या चौकटीची मोडतोड करणारे असल्याची टीका सर्वत्र करण्यात येत आहे. गेल्या रविवारी पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी बोलताना…

Read More

दीपक मोहिते, खा.हेमंत सवरा याना अनावृत्त पत्र, भाग क्र.१ पालघरवासीयांना तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत…. लोकसभा निवडणूका होऊन जवळपास सात महिन्याचा काळ लोटला असून ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” आता ओसरली आहे.पालघर लोकसभा निवडणुकीत पालघरवासीयांनी खा.डॉ. हेमंत सवरा यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले होते.त्या पालघरवासीयांच्या खा.सवरा यांच्याकडून जिल्हा विकासाबाबत फार नाही,पण माफक अपेक्षा आहेत.यापूर्वीही चिंतामण वनगा,बळीराम जाधव व राजेंद्र गावित,हे येथून खासदार म्हणून निवडून गेले होते.पण या तिघांच्या काळात जिल्हा कात टाकू शकला नाही.गेली अनेक वर्षे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने या तिघांच्या काळात फारसे प्रयत्न झाले नाहीत.त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. पालघर जिल्ह्याच्या विकासाचे अनेक…

Read More

जव्हार,प्रतिनिधी, कौलाळे गटात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार, तालुक्यातील कौलाळे गटात एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तीन जिल्ह्यातील स्पर्धकांनी हजेरी लावली होती.तर पंचक्रोशीतील दोन हजार शेतकऱ्यांनी मनसोक्तपणे स्पर्धेचा आनंद घेतला.गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयाने बंदी हटवल्याने महाराष्ट्रामध्ये पुन्हा बैलगाडा शर्यती जोमात सुरू झाल्या आहेत.या निर्णयानंतर गेल्या तीन वर्षांपासून पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुकाच्या गारादेवी मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार बघायला मिळाला. दरम्यान झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून काल कौलाळे गटात बैलगाडा शर्यत आयोजीत करण्यात आली होती.यासाठी पालघर, ठाणे व नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी आपली बैल जोडी…

Read More