दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मुख्यमंत्र्यांनी नितीश राणे यांना वेळीच आवरावे- काँग्रेस नेते थोरात,
केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान,त्यामुळे प्रियांका गांधी खासदार झाल्याचे वक्तव्य,मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केल्यानंतर राज्यात जोरदार वादळ उठले आहे.त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांनी राणे यांना आवरावे,अशी मागणी केली आहे.यापूर्वीही नितीश राणे यांनी ” मशिदीत घुसून मारू,” अशी वलग्ना केली होती. मुस्लिम समाजात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते.मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे,हा संविधानाने आखून दिलेल्या चौकटीची मोडतोड करणारे असल्याची टीका सर्वत्र करण्यात येत आहे.
गेल्या रविवारी पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी बोलताना त्यांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केले.ते म्हणाले,केरळ राज्यात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे.राहुल व प्रियांका गांधी या दोघांना केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांमुळेच निवडणुका जिंकता आल्या.मुस्लिम मतदार,या दोघांना खासदार बनवण्यासाठी मतदान करत असतात.त्यांच्या या बेलगाम वक्तव्याचे सर्वत्र जोरदार पडसाद उमटत आहेत.पोलिसांनी या कार्यक्रमा अगोदर आयोजकांना,” कार्यक्रमात कोणतेही प्रक्षोभक भाषण होणार नाही,याची खबरदारी घेण्यास फर्मावले असतानाही राणे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.त्यानंतरही त्यांनी आपल्या म्हणण्यावर ठाम राहत ” या देशात ९० % हिंदू राहतात,हिंदूंच्या हिताची काळजी घेणे,हा गुन्हा होऊ शकत नाही.” असे म्हंटले.या आधी ते मीरा रोड हिंसाचार प्रकरणी वादात सापडले होते.केरळ हे आपल्या सार्वभौम देशाचे एक राज्य असून राणे,अशा प्रकारचे वक्तव्य कसे करू शकतात ? यावर घटनातज्ञानीही आश्चर्य व्यक्त केले आहे.तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही राणे यांना मुख्यमंत्र्यांनी वेळीच आवरावे,असे आवाहन केले आहे.

