दीपक मोहिते,
” माही वसई,” व ” कोकण पर्व, ” या लोकप्रिय कार्यक्रमाचे वसईत आयोजन,
वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाकडून आयोजित करण्यांत येणाऱ्या भव्य कला क्रीडा महोत्सवाचे यंदाचे हे ३५ वे वर्ष आहे.
रौप्य महोत्सवी कला – क्रीडा महोत्सवानिमित्त “ माही वसई,” तर ३० व्या वर्षानिमित्त “ कोकण पर्व कोकण सर्व,” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले आहे.वसई कला – क्रीडा महोत्सवाचे ज्येष्ठ पदाधिकारी मुकेश सावे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “ माही वसई,” या कार्यक्रमातून वसई तालुक्यातील विविध जातीधर्मीयांची संस्कृती, व्यवसाय,चालीरिती,परंपरा यांचे यथार्थ दर्शन घडवण्यात आले होते.तर ” कोकण पर्व कोकण, ” यामधून कोकण प्रांतातील सर्व जिल्ह्यातील जीवनपद्धती,संस्कृती आणि परंपरा दाखवण्यात आल्या होत्या.या दोन्ही कार्यक्रमांना नागरीकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता.
वसई तालुका कला – क्रीडा महोत्सवाचे ज्येष्ठ पदाधिकारी मुकेश सावे यांनी ” भारताची वैभवशाली गौरव गाथा,” अर्थात “ ग्लोरीऑफ इंडिया,” ही भव्य कलाकृती सादर केली आहे.
३५ व्या कला – क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने विरार येथील विवा महाविद्यालयाच्या सहकार्याने साकारण्यात आलेल्या “ भारताची वैभवशाली गौरव गाथा,” अर्थात “ ग्लोरी ऑफ इंडिया, ” या भव्य कलाकृतीद्वारे नागरीकांना भारताचे सांस्कृतिक वैभव,प्रगती आणि लष्करी सामर्थ्याची झलक पहाता येते.ज्यामुळे त्यांच्या मनातील राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ होईल,असा विश्वास सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी व्यक्त केला.
ही कलाकृती म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथील कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनाची प्रतिकृती असून यात इंडिया गेट, राष्ट्रपती भवन यासह भारतीय लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या २८ रेजिमेंट व २० बॅण्डमधील ५ हजार ७८७ सैनिक व ५७ घोडे,११४ उंट, l२४ विविध रणगाडे, मोबाईल ब्रिज,मिसाईल लॅान्चर, मल्टीपल मिसाईल लॅान्चर,
ॲन्टी एअर क्राफ्ट मिसाईल लॅान्चर
रेडिओ ॲन्टेना व्हेईकल, ॲन्टी एक्सप्लोजन व्हेईकल, मिलिटरी ट्रक,आर्मर्ड व्हेईकल्स,आर्मर्ड जिप, मिलिटरी जिप,अॅन्टी एअर क्राफ्ट गन,हॅलिकॉप्टर, राफेल व मिग फायटर प्लेन,चिनुक हॅलिकॉप्टर,एअरक्राफ्ट कॅरीयर शिप,बॅटल शिप,सबमरीन व विविध राज्याचे चित्ररथ पहायला मिळतील.नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून या प्रदर्शनाची मुदत २ दिवसांनी वाढवण्यात आली असून हे प्रदर्शन आता ५ जाने.२०२५ पर्यंत वसई विकास सहकारी बॅंकेच्या चिमाजी आप्पा मैदानालगतच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात नागरिकांना पहाता येणार आहे.

