संदीप बोराडे, डहाणू,
वाकी ग्रामपंचायतीमध्ये महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न,
डहाणू तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या आशागड-2 बीट अंतर्गत वाकी ग्रामपंचायतीमध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
आ.विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच,जिल्हा परिषद सदस्य जयंवत डोंगरकर,सरपंच दिनेश दयात, ग्रामपंचायत सदस्य सावित्री कान्हात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात महिलांसाठी आहार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय,सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत स्थानिक महिलांनी पारंपरिक नृत्य आणि ” तारका, ” नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.कार्यक्रमाने महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणा दिली आणि ग्रामीण भागातील महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली.
या मेळाव्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायतीने विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या प्रतिसादामुळे कार्यक्रमाने वेगळे स्वरूप आले.समाजाच्या प्रगतीसाठी असे उपक्रम महत्त्वाचे ठरत असल्याचे प्रतिपादन यावेळी आ.विनोद निकोले यांनी केले.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश पोळ, प्रशिक्षण नागेश संखे आणि डॉ.धीरज महाले यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

