वसंत भोईर,वाडा,
उपसरपंचपदी विशाल पाटील यांची बिनविरोध निवड,
तालुक्यातील घोणसई मेट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पडली.या निवडणूकीत उपसरपंच पदी विशाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
घोणसई मेट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिलीप पाटील यांची मुदत संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.आज उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.या निवडणुकीत विशाल पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ते बिनविरोध निवडून आले.
त्यांच्या निवडीनंतर सरपंच शैला जाबर यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.ग्रामपंचायतीत विकासकामे करून आदर्श ग्रामपंचायत करू,असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.पीठासीन अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबल यांनी काम पाहिले.

