Author: दीपक मोहिते

संदीप जाधव,बोईसर, दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप, बोईसरमधील नामवंत संस्कृती वर्ल्ड स्कूल,महाविद्यालयाच्या दोन दिवसीय भव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांची झलक आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा सुरेख संगम यावेळी पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध रंगीबेरंगी कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील पुरस्कार विजेते पटकथालेखक किरण कुलकर्णी,अक्षया शक्तीचे सीईओ आणि प्रसिद्ध समाजसेवक डॉ.नारायण अय्यर,तसेच तरुणाईमध्ये लोकप्रिय मराठी यूट्यूबर सिद्धांत जोशी (ओळख ‘श्रीमान लेजेंड,’), प्ले ब्लॅक सिंगर अभिजित गोसाळ आणि प्रसिद्ध संस्थेचे पदाधिकारी इ.कलावंत उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोकनृत्य,आधुनिक नृत्य,सामाजिक संदेश देणारे नाट्य,गाणे,वादन आणि सूत्रसंचालन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली बहुआयामी कला…

Read More

नदीम शेख,पालघर, पालघर येथे क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन, १५ जाने.रोजी खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. यंदाही या जयंतीचे औचित्य साधून पालघर येथे १४ व १७ वर्षाखालील मुलांकरिता क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच शासनमान्य खासगी अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थसहायित प्राथमिक व माध्यमिक शाळा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,शासकीय तसेच शासनमान्य खासगी विद्यापीठ क्रीडा संस्था, असोसिएशन,क्रीडा मंडळ, क्रीडा अकॅडमी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले.१५ जाने.रोजी स्पर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार…

Read More

नवीन पाटील,सफाळे, गीता हे आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शक मेन्यूएल आहे – सनद कुमार प्रभू, मानवी जीवन जगताना असंख्य अडचणी येत असतात.प्रत्येक प्रसंगाला धीराने समोर जाण्यासाठी ‘गीता,’ हे दीपस्तंभाप्रमाणे काम करत असून ‘गीता,’ हे आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शक मेन्यूएल आहे,असं मत गोवर्धन ग्रामीण विकास कार्याध्यक्ष सनद कुमार प्रभू यांनी व्यक्त केलं.गोवर्धन इको व्हिलेज संस्थेतर्फे १२ जाने.रोजी गालतरे वाडा येथे ग्रामीण शिक्षण विभाग अंतर्गत गीता प्रज्ञा शोध स्पर्धा व विज्ञान प्रज्ञा शोध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला,त्यावेळी ते बोलत होते. विज्ञान आणि अध्यात्म हे विरोधी नसून एकमेकांना परस्पर पूरक आहेत.बुद्धीच्या बळावर विज्ञान विकास आणि प्रगती साधता येते,परंतु त्याला अध्यात्माची जोड…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे नशामुक्त भारत अभियान, जव्हार पंचायत समितीतर्फे आज पंचायत समिती जव्हार येथे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सामूहिक नशामुक्त प्रतिज्ञेचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाद्वारे नशामुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करण्यात आला. सदर कार्यक्रम पंचायत समिती उपसभापती दिलीप पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,विस्तार अधिकारी मनोहर उमतोल,वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पाटील, विस्तार अधिकारी शिक्षण पुंडलिक चौधरी,तसेच किरण शिंदे व इतर अधिकारी व विभाग प्रमुख,कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान नशामुक्त जीवनाची शपथ घेण्यात आली व समाजातील नागरिकांना नशेपासून दूर राहण्याचा संदेश…

Read More

जव्हार प्रतिनिधी जव्हार येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न, तालुका कृषी विभाग व ग्रामपंचायत सारसून यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला.या मेळाव्यात शेतकऱ्यांनी फळबाग आणि भाजीपाला लागवडीवर विशेष भर देत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगड मतदार संघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना पाणी साठवण व सिंचन योजनेच्या माध्यमातून शासनाकडून पुरवले जाणारे लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच सारसून ग्रामपंचायत आदर्श गाव म्हणून सलग पाच वर्षे शासनाच्या विविध योजना राबवण्याचे घोषित केले. भाजीपाला आणि फळपिके यांची व्यवस्थित ग्रेडिंग व पॅकिंग करून विक्रीतून अधिक उत्पन्न मिळवण्याचा सल्ला…

Read More

दीपक मोहिते, कार्यकर्त्यांनो मरगळ झटकून कामाला लागा- माजी आ.हितेंद्र ठाकूर, काल नालासोपारा पूर्व आणि पश्चिम भागातील कार्यकर्त्यांची बैठक माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली विवा महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.या बैठकीला सुमारे अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित होते.माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या आवेशपूर्ण भाषणाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला. यावेळी मार्गदर्शनपर केलेल्या आपल्या जोशपूर्ण भाषणात ठाकूर म्हणाले,या निवडणुकीतील पराभवाने आपण खूप काही शिकलो.आपल्याकडून चुका झाल्याचे मान्य करून त्यांनी आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे,असे सांगून आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत.या निवडणुका आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच आहेत.त्यासाठी मरगळ झटकून कामाला लागा.झालेल्या पराभवाची खंत जरूर आहे,पण आम्ही हिंमत हरलो नाही,आजही आम्ही कार्यालयात बसून लोकांची गाऱ्हाणी ऐकतो,अधिकाऱ्यांना…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारावे की ” शरद पवार यांचे कृषीक्षेत्रात योगदान किती  ?, ” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना कायम ” जळी स्थळी शरद पवार,” दिसत असतात.पवार यांचा अमित शहा याना एवढा धसका का वाटतो,कळेनासे झाले आहे.यापूर्वीही शहा यांनी एका जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते.त्यावर पलटवार करताना पवार यांनी ” तडीपार,” अशा भाषेत संभावना करत,त्यांचे तोंड गप्प केले होते.काल त्यांनी पवार यांच्यावर टीका केली,पण ती सौम्य भाषेत होती.त्यांच्या या टीकेला पवार काय उत्तर देतात,हे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. काल अमित शहा यांनी पवार यांच्यावर टीकेची झोड उठवताना,देशाचे…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आगामी महानगरपालिका निवडणूक ; माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसली… काल शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.येत्या तीन ते चार महिन्यात या निवडणुका होतील,असा अंदाज व्यक्त करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्ष अद्याप सावरलेला नाही.भाजपच्या तयारीच्या तुलनेत विरोधी पक्षाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही.पण माजी आ.हितेंद्र ठाकूर मात्र त्यास अपवाद ठरले आहेत.या निवडणुका लवकरच होतील,हे गृहीत धरून त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका व मेळावे घेण्यास सुरुवात केली आहॆ.त्यांच्या या प्रयत्नाला कार्यकर्त्यांचा…

Read More

संजय लांडगे,वाडा, डोंगस्तेच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते हद्दीमध्ये दगडखदान,क्रशर व्यवसाय सुरू असून,सदर व्यवसायिकांकडून सातत्याने दिवसरात्र बोअर ब्लास्टींग करण्यात येत असते.त्यामुळे येथील घरांच्या भिंतींना तडे जावुन घरे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी धर्मवीर विचार मंचच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.पण प्रशासनाने याची दाखल घेतली नाही म्हणून दोन दिवसापूर्वी धर्मवीर विचार मंच व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला होता,पण त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवले होते.दरम्यान अध्यक्ष मिलिंद पष्टे यानी सलग तीन दिवस अन्नत्यागही केला. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून…

Read More

नदीम शेख,पालघर, चिंचणी बारीवाडा येथील पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना, चिंचणी – बारीवाडा येथील पाणीप्रश्न गंभीर बनल्यामुळे आ.गावित यांनी गावकऱ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहुन चर्चा केली. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आ.गावित यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. पाणीपुरवठा यंत्रणेतील अडचणी,नळजोडण्यातील त्रुटी आणि जलवाहिन्याच्या दुरुस्तीची आवश्यकता याबाबत अधिकाऱ्यांशी तातडीने संवाद साधला. गावकऱ्यांना जलस्रोत लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी अधिकारी व स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले.याविषयी आ.राजेंद्र गावित म्हणाले,पाणी हा मूलभूत हक्क असून, प्रत्येकाला तो मिळायला हवा. या समस्येचा त्वरित तोडगा काढण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल.प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना त्यांनी कडक सूचना दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी…

Read More