मनिष म्हात्रे,वसई,
पोलीसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला गांजाची पुडी देणा-याला अटक,
वसई न्यायालयासमोर पोलीसांसोबत असलेल्या आरोपी मित्राला अमली पदार्थ देण्याचा प्रयत्न करणा-याला पोलीसांनी गजाआड केले आहे.
काल सांयकाळी साडेचारच्या सुमारास सदर घटना वसई न्यायालयासमोर घडली.आनंद मलंगी,रा.गोरेगाव- संतोषनगर असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलीसांच्या समक्ष जर गंभीर गुन्ह्यातील आरोपींना त्यांचे साथीदार अमली पदार्थाचा पुरवठा करत असतील तर ती गंभीर बाब असून पोलीसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहॆ.
काल सकाळी ठाणे कारागुहातून गंभीर तसेच पोक्सो,फसवणूक आदी गुन्ह्यातील दहा आरोपींना पोलीस व्हॅनमधून वसई न्यायालयात आणण्यात आले होते.संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या सर्व आरोपींना पुन्हा ठाणे येथे कारागृहात नेण्यात येणार होते.बसमध्ये आरोपींना बसवण्यात येत असताना आनंद मलंगी नावाच्या व्यक्तीने आपल्याकडे असलेली अमली पदार्थाची पुडी बसमधील सहकारी मित्राकडे बसच्या खिडकीतून फेकली.यावेळी तेथील एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला हटकले.आनंद मलंगी याने पोलीस आता पकडतील म्हणून घाबरुन वसई किल्ल्याच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर धुम ठोकली.बसबाहेर उभ्या असलेल्या इतर पोलीसांना आरोपी पळाला असे वाटल्यामुळे चार ते पाच पोलीसांनीही त्याचा पाठलाग सुरु केला.यावेळी काही काळ रस्त्यावर वाहतुककोंडी व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.पोलीसांनी आनंद मलंगी याला पाठलाग करत वसई पोलीस ठाण्यासमोरुन ताब्यात घेतले.आनंद मलंगी याने बसमध्ये फेकलेल्या पुडीमध्ये गांजासदुष्य अमली पदार्थ असल्याचे पोलीसांनी सांगितले.सध्या आनंद मलंगी याची पोलीसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
असाच प्रकार १४ जाने. रोजी उल्हासनगर न्यायालयात घडला होता.विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी हर्षल सकट याला न्यायालयात आणण्यात आले होते.त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने आरोपी सकट याला चप्पलचा बॉक्स दिला. पोलिसांनं संशय आल्याने, बॉक्स तपासल्यावर त्यात दोन स्लीपर चप्पल होत्या. पोलिसांनी त्या स्लीपर्स चप्पलची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल २५० ग्राम अंमली ( गांजा ) पदार्थ सापडला.पोलिसांनी चप्पलचा बॉक्स देणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता,त्याने न्यायालयाच्या पहिल्या मजल्याच्या सिमेंट जाळीतून उडी मारून पळ काढला होता.

