- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
नवीन पाटील,सफाळे केळवे येथे ज्येष्ठ नागरिकांचे स्वास्थ शिबिर संपन्न, सफाळा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे एक दिवसीय स्वास्थ्य शिबिर केळवा रोड, रोठे येथील श्री अंबिका योग सेवा केंद्र,येथे नुकतेच पार पडले.विजय पाटील,नरेश पाटील,आणि भिका सोनवणे यांच्या संयुक्त सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात २७ सदस्य सहभागी झाले होते. शिबिराची सुरुवात प्रार्थना,दीप प्रज्वलन, संस्थेची माहिती,प्रस्तावना तसेच संस्थेच्या कार्याची प्रत्यक्ष पाहणी,त्यानंतर अजित भाईनी ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त माहिती देऊन मार्गदर्शन केले.योग शरीरातील प्रत्येक पेशीला बरे करण्यासाठी आणि वाढवण्याचे कार्य करत असल्याने,तुमचे शरीर आपोआप अधिक रोगप्रतिकारक बनते,असे सांगितले.डायबेटिस हा रोग नाही,आपल्या आत्मशक्तीच्या जोरावर व डायबिटीसला इतर रोगाला दूर करू शकतो असे पुढे त्यांनी…
दीपक मोहिते, नेमकं दडलंय काय ? धनंजय मुंडेच्या आडून अजित पवार यांचा गेम ? गेल्या पंधरा दिवसापासून संतोष देशमुख हत्येचे प्रकरण राज्यभरात गाजत आहे.भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे.हत्येची घटना घडल्यानंतर आ.धस यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची एक ना अनेक प्रकरणे बाहेर काढली.त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुंडे यांचा कट्टर समर्थक असलेल्या वाल्मिक कराड याला पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागले.तर एक वगळता इतर सर्व आरोपी एकामागोमाग गजाआड झाले.सुरेश धस नंतर अंजली दमानिया व आता आ.चित्रा वाघ,यांनीही आता या प्रकरणात उडी घेतली आहे.संतोष देशमुख हे भाजपचे असून त्यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात संतापाचे वातावरण निर्माण झाले…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ईव्हीएमचे रडगाणं बंद करून कामाला लागा… नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा ईव्हीएम मशीनचा प्रश्न ऐरणीवर आला होता.विरोधी पक्ष ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर वारंवार संशय व्यक्त करत होते.अखेर काल मुख्य निवडणूक आयुक्तांनी या विषयी बाळगलेले आपले मौन अखेर सोडले.या प्रणालीमध्ये चुकीचे काही नसून ही व्यवस्था अत्यंत पारदर्शक असल्याचा निर्वाळा दिला.या विषयी आयोगाची भूमिका स्पष्ट करताना मुख्य निवडणुक आयुक्तानी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हवाला दिला.निवडणूक आयोगाने याविषयी विरोधकांच्या सर्व आक्षेपावर सविस्तर विवेचन केले असले तरीही अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील,अशी अपेक्षा करणे,आता व्यर्थ आहे.याविषयी संशयाचे जे ढग पसरले आहेत,ते लवकर नाहीसे होतील,असेही वाटत नाही. असो,पण…
संजय नेवे,विक्रमगड, विक्रमगड – आंबेघर येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन, विक्रमगड तालुक्यातील आंबेघर येथे आज माऊली स्पोर्ट्स क्लब व जिल्हा परिषद पालघर आरोग्य विभाग यांच्यातर्फे ” एक धाव कुष्ठरोग निर्मूलनासाठी, ” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पालघर लोकसभेचे खा.हेमंत सावरा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संदीप पावडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप निंबाळकर,भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पावडे निशिकांत संखे आदी मान्यवर उपस्थित होते.माऊली स्पोर्टस क्लब गेल्या ४ वर्षापासून अथॅलेटिक्स स्पर्धा भरवत असून या स्पर्धेला उस्फूर्त असा स्पर्धकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजक सुरज हाडळ यांनी दिली असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्पर्धक येत आहेत.
वसंत भोईर,वाडा, विजयगड येथील श्रीजी स्टोन ( ईगल इन्फ्रा) क्रशर केले सील, तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विजयगड गावात असलेल्या श्रीजी स्टोन( ईगल इन्फ्रा ) क्रशर संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पालघर खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पथकाने सील केली.त्यांच्याकडे परवानगी नसल्याने या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. वाडा तालुक्यात अनधिकृत दगडखदानींचे पीक आले आहे.राजरोसपणे बोर ब्लास्ट करून दगडाचे उत्खनन केले जाते.ग्रामस्थ कारवाईची मागणी करतात परंतु, प्रशासनाकडून सर्रास दगड खदान मालकांची पाठराखण केली जात आहॆ.मात्र आज अचानक तक्रारीचे कारण पुढे करून खनीकर्म अधिकाऱ्यांनी क्रशर मशीन सील करण्याची कारवाई केल्याने वाड्यातील दगडखदान मालकांचे धाबे दणाणले आहे.
दीपक मोहिते एचएमपीव्ही व्हायरसबाबत लोकांनी घाबरू जाऊ नये- आरोग्य विभाग,जिल्हा परिषद पालघर, चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचा रुग्ण भारतात आढळला असल्याने राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाले असून पालघर जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ह्यूमन मेटानिमा वायरस,हा पूर्वीपासून आपल्याकडे सर्क्युलेशनमध्ये आहे.सद्यस्थितीत चीनमध्ये या विषाणूमुळे साथ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हा विषाणू साधारणतः हिवाळ्याच्या सुरुवातीला सर्कुलेशनमध्ये आढळतो व त्यामुळे सर्दी,ताप व खोकला यासारखे फ्लू सदृश लक्षणे आढळतात. एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्यास तीव्र श्वसन दाह किंवा रुग्णालयात भरती करण्याची गरज शक्यतो भासत नाही. एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभुमीवर कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण…
जव्हार,प्रतिनिधी, जव्हार अर्बन बँकेस ” बँको ब्लू रिबन २०२४,” पुरस्कार जाहीर, दि.जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय स्तरावर ” बँको ब्लू रिबन २०२४,” पुरस्कार जाहीर झाला आहे.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बा.मुकणे यांनी ही माहिती दिली.हा पुरस्कार २७ ते २९ जाने.२०२५ दरम्यान ॲम्बी व्हॅली,लोणावळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सहकारी परिषदेत प्रदान केला जाणार आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी आर्थिक आधार बनलेल्या या बँकेने स्थापनेपासूनच उत्कृष्ट कामगिरी केली आहे.बँकेची स्थापना श्रीमंत यशवंतराव मुकणे,महाराजा जव्हार संस्थान यांनी केली असून, बँकेने ७५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. बँकेचे चेअरमन निलेश ज. पाटील यांनी सांगितले की, बँकेचे मार्गदर्शक व जिजाऊ शैक्षणिक…
दीपक मोहिते, राजकीय विश्लेषण, भाजप जगात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला राजकीय पक्ष, भाजप हा आता जगात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.या पक्षाची सदस्य संख्या प्रचंड असून गेल्या बारा वर्षात या पक्षाचा विस्तार हा मनुष्यबळ,आर्थिक बळ व आक्रमक धोरण,इ. कारणामुळे होत गेला.आज या पक्षाकडे असलेली ताकद इतर कोणत्याही पक्षाकडे नाही. भारतीय समाज हा रूढी,परंपरा व जाती-धर्माबाबत अत्यंत संवेदनशील आहे,हे ओळखून भाजपचे तत्कालीन वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९८० च्या दशकात स्विकारलेल्या गांधीवादाला मूठमाती देत,यांनी हिंदुत्वाला फुंकर घातली.तत्कालीन विश्वनाथप्रतापसिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्विकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने ” मंडल विरुद्ध कमंडलू,” असे युद्ध छेडले.” राममंदिर हम वही बनाएंगे,” ही गगनभेदी गर्जना भारताच्या आसमंतात…
जव्हार,प्रतिनिधी, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत हिरडपाडा आश्रमशाळेची गगनभरारी, नुकत्याच नागपूर येथे आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जव्हार प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हिरडपाडा आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत जव्हार प्रकल्पाला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. खो-खो,या खेळात दीपिका बुध्या जाबर,नेहा दिलीप खरपडे,विश्वनी विनायक थोरात,आणि कु.गीता विष्णू औलंबा,यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत संघाला विजयी बनवले.विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्थेचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.हिरडपाडा शाळेकडून सुसज्ज खेळाचे मैदान,तसेच क्रीडा शिक्षक दराडे,कोकणी आणि मोहडकर यांच्यासह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. माध्यमिक मुख्याध्यापक जी. एस.उदावंत आणि प्राथमिक मुख्याध्यापक आर.व्ही.मेदगे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या यशानंतर शाळेने भव्य विजय मिरवणूक काढली.संस्थेच्या सचिव ज्योती पटेकर यांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.…
जव्हार प्रतिनिधी, ग्रामपंचायत दाभलोन व ढाढरी येथे बालकांची मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न, प्रोजेक्ट प्रकाश चॅरिटेबल ट्रस्ट,दिल्ली व एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत दाभलोन व ढाढरी येथे मोफत बालनेत्र तपासणी शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबीरात १०० हून अधिक मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ऑप्टोमेट्रिस्ट असद फुजेल व व्हिजन टेक्निशियन राम सानप यांनी मुलांच्या डोळ्यांचे विकार,मोतीबिंदू,तिरळेपणा यासारख्या समस्यांची तपासणी करून मोफत समुपदेशन केले.याशिवाय नेत्र विकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.प्रोजेक्ट प्रकाशचे कार्यक्रम प्रमुख शशिकांत भिसे यांनी भविष्यात आदिवासी भागातील मुलांसाठी मोफत बालनेत्र तपासणी शिबीरे नियमितपणे आयोजित करण्याची घोषणा केली. त्यांनी तपासणी दरम्यान मोतीबिंदूसारखे विकार आढळल्यास…
