- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” मुंबईसह पालघर/ठाण्यातील वाहतूककोंडी ; सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा… हल्ली मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर होणाऱ्या सततच्या वाहतूककोंडीमुळे मुंबई,ठाणे व पालघर या तीन जिल्ह्यातील व्यापार उदिमावर परिणाम जाणवू लागला आहे.गेले वर्षभर या महामार्गाचे कॉक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम सूरू आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे.त्यामुळे मुंबई, पालघर,ठाणे व गुजरात राज्यातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.मात्र लोकांच्या शेकडो तक्रारीनंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. या चारही महानगराची लोकसंख्या आजमितीस चार कोटीच्या घरात पोहोचली आहे.लोकसंख्या वाढली तसेच वाहनाच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होत गेली.पण रस्त्यामध्ये वाढ झाली नाही. मेट्रो,सागरी…
दीपक मोहिते, ” जिल्हा वर्धापनदिन विशेष,” जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ आजही उपेक्षित जीवन जगताहेत, काल पालघर जिल्ह्याचा ११ वा वर्धापन दिन होता,पण जिल्ह्यात कुठेही उत्साह व आनंदाचे वातावरण नव्हते.कारण गेल्या ११ वर्षाच्या प्रदीर्घ काळात जिल्ह्यात विकासाची गंगा अवतरली नाही.नव्याने जिल्हानिर्मिती होऊनही लोकांच्या जीवनमानात तसूभरही फरक पडला नाही.गेल्या अनेक वर्षांपासून ज्या समस्या प्रलंबित होत्या,त्या आजही ” जैसे थे,” स्थितीत आहेत.रोजगार,कुपोषण, रोजगारासाठी स्थलांतरण,चालायला धड रस्ते नाहीत,आरोग्य सेवा व शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा, जिल्हावासीयांच्या पाचवीला पूजलेलाच आहे.अशा परिस्थितीत नागरिक जिल्ह्याचा वर्धापन दिन तरी कसा साजरा करणार ? या जिल्ह्याला आदिवासी दर्जा मिळाल्यामुळे दरवर्षी प्रचंड प्रमाणात आर्थिक निधी मिळत असतो.पण तो लोककल्याण व जिल्हाविकास…
वसंत भोईर, जिल्हा वर्धापनदिन विशेष, कृषिप्रधान पालघर जिल्ह्याची ओळख हरवतेय… ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्याला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत.नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याची सागरी,डोंगरी,आणि नागरी अशी विभागणी झाली असली तरी कृषी क्षेत्रात विविध उत्पादने घेणारा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो.परंतु जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्यातील कृषीक्षेत्राकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कृषिप्रधान जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसली जातेय की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर भातशेती केली जाते.बहुसंख्य भागात शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहे.यात प्रामुख्याने वाडा तालुक्यासह डहाणू,पालघर, वसईच्या ग्रामीण भागात घेण्यात येणाऱ्या ‘वाडा कोलम’, ‘झिनी’ ह्या भाताला देशभरात लौकिक मिळाला आहे.बाजारपेठेत वाडा कोलम…
सुरेश वैद्य, पालघर महसूल विभाग अत्यंत महत्वाचा विभाग – पालकमंत्री गणेश नाईक, महसूल विभागाचे कार्य हे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असून,शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारा महसूल विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हंटले आहे. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह-२०२५ चे आयोजन करण्यात आले असून महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला. यावेळी आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित,आ.राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,उपजिल्हाधिकारी महेश सागर,तेजस चव्हाण,विजया जाधव,मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील,तसेच वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित…
दीपक मोहिते, ” देवाभाऊंचा रडीचा डाव,” माणिकरत्न आता क्रीडामंत्री झाले ; आता दिवसरात्र ” रमी,” खेळ म्हणावं…. देवाभाऊंनी माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नावाच्या माणिकरत्नाला ” पब्लिक क्राय,” डावलून आता क्रीडामंत्री केले आहे.क्रीडा खाते मिळाल्यानंतर हे माणिकरत्न आता आपला रमीचा खेळ मोठ्या जोमाने खेळून दाखवणार आहेत.” वारे वा देवाभाऊ,तुम्ही अगदी आवेशात हे सारे ” करून दाखवले,” असाच निकष आता संजय शिरसाठ,संजय गायकवाड,भरत गोगावले,संजय राठोड या चौघांनाही लावण्यात यावा,अशी आमची इच्छा आहे.आज हे मंत्री कम गुन्हेगार,तुमच्यामुळे मोकाट सुटले आहेत.जे माणिकरत्न तुमच्या सरकारला भिकारी म्हणते,त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता,एवढा लाचार मुख्यमंत्री उभ्या महाराष्ट्राने गेल्या ६५ वर्षात कधीही पाहिला नव्हता.आता या माणिकरत्नाला म्हणावं, तुला…
सुरेश वैद्य, पालघर, जिल्ह्यातील खेळाडूनी शालेय क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करावी, शैक्षणिक वर्षांमध्ये पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,पालघर यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या, शालेय क्रीडा स्पर्धांचा आराखडा मांडण्यात आला असून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा,अनुदानित व विनाअनुदानित शाळा,यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन उत्तम कामगिरी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर,यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हा क्रीडा शिक्षक सभा आयोजीत करण्यात आली होती.यावेळी पालघर जिल्ह्यातील ४५० क्रीडा शिक्षक या सभेला उपस्थित होते. अगदी शेवटच्या घटकापर्यंत क्रीडा विभागाची माहिती व ज्ञान असावे,या…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” ऐन निवडणुकीच्या तोंडावर बविआमध्ये त्सुनामी येऊ शकते… वसई-विरार परिसरात सक्तवसुली संचलनालयाची एंट्री ही बहुजन विकास आघाडी व शिवसेनेला ( शिंदे गट ) डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.पवार प्रकरण उकरून काढून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.महाप्रतापी अनिलकुमार पवार,हा एकनाथ शिंदे गटाच्या कोट्यातील अधिकारी आहे,तसेच तो शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा नातेवाईक आहे.गेल्या काही काही दिवसांपासून शिंदे गटाच्या अनेक आमदारांचे पाय खोलात अडकले आहेत.या प्रकरणामुळे भाजपच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पवार प्रकरण,हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. तर दुसरीकडे अनेक बिल्डर्स,ठेकेदार व आर्किटेक्ट देखील ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत.त्यामुळे आ.ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या आर्थिक नाड्या…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” पवार याच्या गोरखधंद्यातील वाटेकरीची नांवे उघड झाली पाहिजेत…. वसई विरार शहर महानगरपालिकेचा बदमाश आयुक्त अनिलकुमार कुमार याच्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट मंत्र्यापर्यंत पोहोचल्यामुळे आताअनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे.सुमारे २ हजार कोटी रु.च्या भ्रष्टाचारात किती जण वाटेकरी आहेत,याचा शोध ईडी घेत आहेत.या शोधातून बरेच काही बाहेर येऊ शकते.तशी शक्यता असल्यामुळे अनेक बिल्डर्स,ठेकेदार व दलालांची रात्रीची झोप उडाली आहे. बदली झाल्यानंतर या पवारने चार दिवसात अनेक फायली हातावेगळ्या केल्या.या काळात किती बिल्डर्सना परवानग्या,सीसी व ओसी दिल्या,त्याची सध्या पडताळणी करण्यात येत आहे.या पवाराच्या चौकशीतून बरेच काही उघड होण्याची शक्यता आहे.पवार याच्या जबानीतून अनेक छुप्या रुस्तमचे चेहरे लोकांसमोर येणार आहेत.…
सुरेश वैद्य,पालघर जिल्ह्यामध्ये ” शाळा तेथे दाखला,” महत्वाकांक्षी मोहीम राबवण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागाकडून जनतेसाठी देण्यात येणाऱ्या सेवा व विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी राज्यातील नागरीकांना माहिती व्हावी. त्याचा योग्य लाभ घेता यावा, यासाठी राज्यात महसूल विभागामार्फत १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ” महसूल सप्ताह,”‘ साजरा करण्यात येणार आहे. तसेच १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताह अंतर्गत ७ दिवसात प्रत्येक दिवशी जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरुप पुढीलप्रमाणे १ ऑगस्ट ” महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ,” “…
सचिन पाटील,विरार महानगरपालिकेचे ४ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त, नियत वयोमानानुसार व स्वेच्छानिवृत्तीने वसई विरार शहर महानगरपालिकेचे एकूण ४ अधिकारी-कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले. प्रकाश साटम ( कार्यकारी अभियंता) व राजेश घरत ( उप नगरसचिव ) हे स्वेच्छानिवृत्तीने तसेच संजय कार्व्हालो ( वाहन चालक ) व चंद्रशेखर पाटील ( सफाई कामगार ) हे नियत वयोमानानुसार आज महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी ( भा.प्र.से. ) यांच्या हस्ते निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांच्या धनादेशाचे वाटपही यावेळी करण्यात आले.याप्रसंगी आयुक्तानी सर्व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेच्या…
