सचिन पाटील,वसई
चिंचोटी-भिवंडी रस्ता दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी मंत्रालयात बैठक संपन्न,
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन चिंचोटी-भिवंडी रस्त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली.या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत या राजमार्गाची तात्काळ दुरुस्ती सुरू करण्याबाबत चर्चा होऊन मंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना पुढील दोन दिवसांत काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले.तसेच, रस्त्याची पुनर्बांधणी काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले.हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आवश्यक परवानग्या मिळवून प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे यावेळी आदेशही देण्यात आले.
या सकारात्मक निर्णयासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.तसेच,वसईच्या नागरिकांच्या प्रश्न व समस्याचे निराकरण करण्यासाठी सातत्याने संपर्कात राहून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस वसईच्या आ. स्नेहा दुबे पंडीत भाजपा वसई-विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष राजू म्हात्रे,जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार, मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,संदीप पाटील व सर्व अधिकारी उपस्थित होते.

