सचिन सावंत,वसई,
वसईत नविन भूमिगत २२ के.व्ही.वाहिनीचे लोकार्पण,
२२०/२२ के.व्ही.नालासोपारा उपकेंद्र ते २२ के.व्ही.पोमण स्विचिंग स्टेशन,पोमण इनकमर-२ या नविन भुमिगत २२ के.व्ही. वाहिणीचे उद्घाटन आज वसई विधानसभेच्या आ.स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते पोमण स्विचिंग स्टेशन,रॉयल हब इंडस्ट्रीज,पोमण ता.वसई येथे संपन्न झाले.
या स्विचिंग स्टेशनमुळे वसई विरार परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम,स्थिर व अखंड राहणार असून उद्योग क्षेत्रासोबतच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सोहळ्याला महावितरण कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा,महावितरण वसई मंडळ अधिक्षक अभियंता संजय सु. खंडारे,कार्यकारी अभियंता प्रविण सूटे,अति.कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख,कनिष्ठ अभियंता इरफान शेख,पोमण ग्रामपंचायत सरपंच आत्माराम ठाकरे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू म्हात्रे,वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री. उदय शेट्टी,वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,संदीप पाटील,शिवसेनेचे शशी म्हात्रे, मयंक शेठ, मुकुंद मुळ्ये,मयुर नाईक,श्री.प्रवेश दुबे,प्रकाश देवळेकर,सुनील मिश्रा,जीत सिंग,श्रमजीवी संघटनेचे .l हेमंत बात्रा
तसेच स्थानिक मान्यवर, पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*.*

