- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
नवीन पाटील,सफाळे, तारापूर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, तारापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येवून सर्व धर्म समभाव,बंधुभाव आणि सामाजिक सलोखा,अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने गावातील सर्व जाती धर्माच्या खेळाडूंसाठी तारापूर क्रिकेट प्रीमियम लीग २०२५ चे आयोजन तारापूर जवळ कांबोडा येथील मैदानावर तीन दिवस करण्यात आले आहॆ.या क्रिकेट स्पर्धेत तारापूर गावातील आठ संघ व सुमारे १२५ खेळाडू सहभागी झाले आहेत . या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार पंकज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तारापूरच्या सरपंच संध्या पागधरे,उपसरपंच उमेश दवणे पालघर तालुका रोहिदास समाज संघाचे अध्यक्ष वसंत जाधव,माजी उपसरपंच निळकंठ पाटील व गणेश दवणे,ग्रामपंचायत सदस्य तन्वी किणी व योगिता उंबरे माजी…
वसंत भोईर,वाडा, वाड्यात विश्व हिन्दू परिषद वाडा प्रखंडाच्या वतीने समरसता महायज्ञ संपन्न, वाडा तालुक्यातील वावेघर येथे विश्व हिन्दू परिषद वाडा प्रखंडच्या वतीने काल श्री स्वामी समर्थ मंदिरात समरसता आयाम महायज्ञ पार पडला.यावेळी २० विवाहित दाम्पत्य यज्ञासाठी बसले होते. पुरोहित्य जिल्हा सामाजिक समरसता प्रमुख श्री.महेंद्र सुरती महाराज यांनी केले.तसेच उपस्थित सर्वाना मार्गदर्शन प्रांतमंत्री मोहन सालेकर यांनी केले.यावेळी हिंदू समाजामध्ये महान यज्ञ परंपरा सांगितली. महिला संत यांची महती सांगितली.हिंदू समाज आज संघटीत जर राहिला नाही तर येणारा काळ आपल्यासाठी कठीण असेल. ” बटोंगे तो कटोंगे,” ब्रीदवाक्य समजुन सर्व जातीपातीच्या पलिकडे राहून हिंदू म्हणून एक झालो पाहिजे.नियमित यज्ञ सत्संग केला पाहिजे,असे आवाहन त्यांनी…
अनिल वैद्य,नाशिक, विमा क्षेत्रातील धोक्याबद्दल जनजागृती, आयुर्विमा राष्ट्रीय करणच्या ६९ व्या वर्षपूर्ती निमित्त विमा कर्मचारी संघटना देशातील विमा क्षेत्रातील धोक्याबद्दल जनजागृती करणार,अशी माहिती नाशिक विभागीय अध्यक्ष मोहन देशपांडे यांची पत्रकार परिषदेत दिली. आयुर्विमा राष्ट्रीयकरणाच्या ६९ व्या वर्षपूर्ती निमित्त अधिक मजबूत भारतासाठी मजबूत एलआयसी आवश्यक या धोरणानुसार विमा क्षेत्रातील धोक्याबाबत विमा कर्मचारी संघटना पत्रक वाटप आणि अन्य विविध उपक्रमातून जनजागृती करणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.उपाध्यक्ष मोहन देशपांडे म्हणाले की १९ जाने.१९५६ रोजी विमा क्षेत्राचे राष्ट्रीयकरण झाल्याच्या निमित्ताने हा दिवस प्रतिवर्षी राष्ट्रीयकरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. विमा व्यवसायात विमाधारकाचे हित देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारा फायदा हा महत्त्वाचा हेतू आहे त्यानिमित्ताने…
सुनील परब,पालघर, महिला व बाल विकास विभागातर्फे पोफरण येथे महिला मेळावा, महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पालघरच्या वतीने १६ जाने.रोजी तारापूर पोखरण येथे महिला मेळावा पार पडला. सदर मेळाव्यासाठी जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, ऍड.निखिल राऊत,सरपंच प्रीती ठाकूर,उपसरपंच सचिन ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार,पर्यवेक्षिका दिपाली संखे,दिपाली पाटील, विस्तार अधिकारी ऋषिकेश कलगुंडे,अंगणवाडी सेविका मदतनीस गावातील महिला उपस्थित होते. ग्रामपंचायत पोफरण क्षेत्रात आयोजित या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी वकिलातर्फे महिलांचे हक्क,वारसाहक्क, स्रीधन,बालविवाह प्रतिबंधक , कौटुंबिक हिंसाचार,पॉक्सो कायदा इ.बाबत माहिती देण्यात आली.पोलिस महिला अधिकारी यांनी महिलांवरील अत्याचारांच्या प्रतिबंध सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन केले. तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याबाबत मार्गदर्शन…
संजय लांडगे,वाडा, आदिवासी विकासमंत्री उईके यांच्या हस्ते ” वाचा संविधान, ” या गाण्याचे प्रसारण भारतीय संविधानाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होण्याच्या उद्देशाने जव्हार सारख्या अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या तरुणाने ” वाचा संविधान, ” हे गाणे लिहून स्वतः व इतर कलाकारांना घेऊन या गाण्याचा व्हिडिओ तयार केला आहे.या गाण्याच्या व्हिडिओचे प्रसारण जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या निलेश लक्ष्मण मुंडेश्वर कर्णबधिर विद्यालयातील सभागृहात मोठ्या थाटात करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते वाचा संविधान हे गीत आज युट्यूबवर प्रसारित करण्यात आले.या प्रसंगी खा. डॉ.हेमंत सवरा,आ.हरिश्चंद्र भोये व जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजया लहारे इ. मान्यवर उपस्थित होते. “…
सुनील चव्हाण,विरार, माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते दीपक मोहिते याना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार -२०२५,प्रदान.. ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांना गेल्या महिन्यात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था, नाशिक,यांच्यातर्फे पत्रकारितेचा ” राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार – २०२५,” जाहीर झाला होता.त्याचा वितरण सोहळा नाशिक येथे पत्रकार दिनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता.पण काही कारणास्तव या सोहळ्याला दीपक मोहिते उपस्थित राहू शकले नाहीत.त्यामुळे आयोजकांनी त्यांना तो कुरियरने पाठवून दिला होता व तो जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांच्या हातून स्विकरावा,असे कळवले होते. त्यानुसार आज तो पुरस्कार दीपक मोहिते यांनी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते स्विकारला.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.आ.हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी ते…
दीपक मोहिते, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. आदिवासी विभागाअंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांचा संवाद मेळावा जव्हार येथील राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. पालघर जिल्ह्यात आदिवासी विभागाकडून विविध योजना राबवण्यात येतात.परंतु या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद व प्रचार करुन आदिवासी विभागाअंतर्गत योजनांचे सादरीकरण करुन सकारात्मक विचार घेउन यापुढे आदिवासी विभाग धावत राहणार कधीही थांबणार नाही.तसेच आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आज आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जव्हार…
दीपक मोहिते, शेतकरी पुन्हा अस्वस्थ.. शेतकरी संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत … घाम गाळून पिकवलेत्या शेतमालाला हमी भाव मिळावा,यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी २०२० मध्ये जोरदार आंदोलन केले होते.या आंदोलनात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे वादग्रस्त कृषी सुधारणा विधेयक मागे,घ्यावे अशी मागणी केली होती.हे आंदोलन सुमारे वर्षभर चालले होते.या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आपले तंबू ठोकले होते.प्रचंड उष्मा,थंडी व कोविडमुळे अनेकांचे जीव देखील गेले होते.२०२१ मध्ये केंद्र सरकारने नव्याने लागू करण्यात येणारे कृषी विषयक कायदे रद्द करणे व योग्य कृषीमालाला योग्य हमीभाव देणे,आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे व कृषिक्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करण्यावर केंद्र सरकार व शेतकरी संघटना यामध्ये सहमती झाल्यानंतर प्रदिर्घ चाललेले…
मनिष म्हात्रे,वसई, सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशीचा उद्या ४७ वर्धापनदिन, सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशीचा ४७ वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उद्या संध्याकाळी काशिदास घेलाभाई हायस्कूल,आगाशी येथे साजरा होत आहे.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य तथा युवा नेतृत्व विकास तज्ञ प्रिया सावंत,या उपस्थित राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून केळवे येथील नूतन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक राऊत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सो.क्ष.स.संघाचे चिटणीस प्रफुल्ल म्हात्रे भुषवणार आहेत,अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष महेश म्हात्रे यांनी दिली आहे.
वसंत भोईर,वाडा, वाड्यातील शेतकरी भागीदारी पद्धतीने घेतात,कलिंगड पिकाचे ठोस उत्पन्न, वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून हिवाळी शेतीचे अर्थकारण हे कलिंगड पिकावर उभी राहत आली आहे.तालुक्यात डि प्लस झोन आल्यामुळे कारखानदारीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.तरुणांच्या हाताला काही प्रमाणात काम मिळू लागल्याने येथील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीकडे दुर्लक्ष केले होते. आता मात्र तालुक्यातील बहुतांशी कारखाने विविध कारणास्तव बंद अवस्थेत आहेत.तरुणांच्या हाताला फारसे काम नसल्याने ठोस उत्पन्नाचे साधन म्हणून पुन्हा कलिंगड पिकाची लागवड २ ते ३ शेतकरी एकत्र येऊन भागीदारी पद्धतीने करु लागले आहेत. बेभरवशा हवामानामुळे शेतीपेक्षा नोकरीच बरी,असा पवित्रा येथील तरुणवर्गाकडून घेण्यात आला होता.परंतू आता काही प्रमाणात तालुक्यात पुन्हा शेतकरी…
