सुनील परब,पालघर,
महिला व बाल विकास विभागातर्फे पोफरण येथे महिला मेळावा,
महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पालघरच्या वतीने १६ जाने.रोजी तारापूर पोखरण येथे महिला मेळावा पार पडला.
सदर मेळाव्यासाठी जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, ऍड.निखिल राऊत,सरपंच प्रीती ठाकूर,उपसरपंच सचिन ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार,पर्यवेक्षिका दिपाली संखे,दिपाली पाटील, विस्तार अधिकारी ऋषिकेश कलगुंडे,अंगणवाडी सेविका मदतनीस गावातील महिला उपस्थित होते.
ग्रामपंचायत पोफरण क्षेत्रात आयोजित या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी वकिलातर्फे महिलांचे हक्क,वारसाहक्क, स्रीधन,बालविवाह प्रतिबंधक , कौटुंबिक हिंसाचार,पॉक्सो कायदा इ.बाबत माहिती देण्यात आली.पोलिस महिला अधिकारी यांनी महिलांवरील अत्याचारांच्या प्रतिबंध सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन केले. तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.बालविकास प्रकल्प अधिकारी पालघर अमोल पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी आयसीडीसी योजनेबाबत अंगणवाडी सेविकांनी पथनाट्य द्वारे जनजागृती तसेच स्रीभ्रूण हत्या थांबवणेबाबत सेविकांनी नाटिका सादर केली.अंगणवाडीतील बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रमही झाले.
पाककृती स्पर्धेच्या माध्यमातून आहारातील अन्न घटकाबाबत माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे नियोजन गौरी,गोविंद धांगडा व रत्नमाला गायकवाड यांनी केले.
जिल्हा परिषद सदस्या भावना विचारे यांनी अंगणवाडीच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले,तसेच अंगणवाडीच्या कामाचे कौतुक केले.गरोदर माता व स्तनदा मांताना
बाळंत विडा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व बाळंतविड्याचे वाटप करण्यात आले.
गावातील बचत गटाच्या अध्यक्षा,सचिव, ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभगी झाले होते.
सांस्कृतिक कार्यक्रम,रांगोळी व पाककृतीमध्ये सहभागी होणाऱ्या बालकांना व महिलांना बक्षीस देवून गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभवी देशपांडे,आशा,पोस्ट ऑफिसचे महिला कर्मचारी, पाचमार्ग येथील महिला पोलिस अधिकारी प्रशिला व निता भोईर उपस्थित होते.

