अनिल वैद्य,नाशिक,
विमा क्षेत्रातील धोक्याबद्दल जनजागृती,
आयुर्विमा राष्ट्रीय करणच्या ६९ व्या वर्षपूर्ती निमित्त विमा कर्मचारी संघटना देशातील विमा क्षेत्रातील धोक्याबद्दल जनजागृती करणार,अशी माहिती नाशिक विभागीय अध्यक्ष मोहन देशपांडे यांची पत्रकार परिषदेत दिली.
आयुर्विमा राष्ट्रीयकरणाच्या ६९ व्या वर्षपूर्ती निमित्त अधिक मजबूत भारतासाठी मजबूत एलआयसी आवश्यक या धोरणानुसार विमा क्षेत्रातील धोक्याबाबत विमा कर्मचारी संघटना पत्रक वाटप आणि अन्य विविध उपक्रमातून जनजागृती करणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.उपाध्यक्ष मोहन देशपांडे म्हणाले की १९ जाने.१९५६ रोजी विमा क्षेत्राचे राष्ट्रीयकरण झाल्याच्या निमित्ताने हा दिवस प्रतिवर्षी राष्ट्रीयकरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. विमा व्यवसायात विमाधारकाचे हित देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारा फायदा हा महत्त्वाचा हेतू आहे त्यानिमित्ताने विमाधारकाचे हित जपण्यासाठी तसेच विमा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या धोक्यांची माहिती विमाधारकांना आणि देशातील सर्वसामान्य जनतेला व्हावी,या दृष्टीने जनजागृती चे विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत भारतात १९५६ पूर्वी २४५ पेक्षा अधिक खाजगी विमा कंपन्या कार्यरत होत्या. या कंपन्यांचा हेतू केवळ नफा कमवणे असा होता, त्यामुळे विमाधारकांच्या बचतीची लूट होत असे.मोठ्या प्रमाणावर दावे नाकारले गेल्यामुळे संकट काळात विमाधारकांना मोठा फटका सहन करावा लागत असे.अनेक वेळा विमा कंपन्या दावे नाकारून दिवाळखोरी जाहीर करत असत.१९ जाने.१९५६ रोजी राष्ट्रपतींनी आयुर्विमा व्यवसायाच्या राष्ट्रीय करणाचा अध्यादेश जारी केला तेव्हापासून १९ जाने. हा दिवस आयुर्विमा राष्ट्रीयकरण दिन म्हणून साजरा केला जातो पुढे तत्कालीन पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांच्या पुढाकाराने १ सप्टें. १९५६ रोजी एलआयसी अस्तित्वात आली एखाद्या कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नामुळे मोठी आर्थिक संस्था अस्तित्वात येणे हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असेल.विमा व्यवसाय पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीच्या आणि नियंत्रणाखाली असावा,असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट मत व्यक्त केले होते.राष्ट्रीय कारणामुळे भारतीय नागरिकांची बचत एलआयसी द्वारे सुरक्षित झाली.या बचतीतून देश उभारणी करता देशविकासाचे कार्य सुरू झाले देशाच्या विकासात एलआयसीचा सिंहाचा वाटा आहे.केवळ पाच कोटी रु.वरून सुरू झालेला या व्यवसायाचे उद्दिष्ट देशातील विमाधारकांची गुंतवणूकदारांची बचत सुरक्षित राहिली पाहिजे. विम्याच्या निमित्ताने मिळणारा मोठा निधी देशाच्या उभारणीच्या कारणासाठी उपयोगी पडावा,जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च उपयोगी व्हावा,ही प्रमुख उद्दिष्टे एलआयसीच्या माध्यमातून शंभर टक्केपेक्षा जास्त पूर्ण झाली आहेत.पाच कोटी रु.तून निर्माण झालेल्या या व्यवसायातून ५२ लाख कोटी रु.च्या जवळपास निधी रस्ते, वाहतूक,वीज,रेल्वे नैसर्गिक वायू,जलपुरवठा यासारख्या कारणांसाठी मागील काही वर्षात खर्च होऊन भारताच्या विकासात एलआयसीने मोठा वाटा उचलला आहे.मात्र नंतर आलेल्या नवीन सरकारच्या विचारातून विशेषता १९९१ पासून सरकारच्या धोरणातून एलआयसीच्या खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे.ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनच्या माध्यमातून या खाजगीकरणाला होणाऱ्या कठोर विरोधामुळे अद्याप पर्यंत एलआयसी आणि विमाधारकांचे हित सुरक्षित राहिले आहे.परंतु पुढील काळात हे हीत सुरक्षित राहण्यासाठी कठोर परिश्रमाची आणि मोठ्या जनजागृतीची गरज आहे. याबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम विविध माध्यमातून उद्यापासून सुरू होणार आहे,असे सांगून देशपांडे म्हणाले की नवीन सरकार विमा क्षेत्रासाठी घातक निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता दिसत असून आगामी अर्थसंकल्पातही त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे.विमा कर्मचारी म्हणून हा धोका आम्हाला अधिक जाणवतो आणि देशाच्या विमाधारकाला गुंतवणूकदाराला तो समजावा यासाठी जनजागृती व्हावी म्हणून प्रयत्न करण्याचा निर्णय चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी घेतला आणि त्यानुसार याबाबत माहिती देण्यासाठी माहिती पत्रकांचे वाटप कॅन्डल लाईट मोर्चा, मानवी साखळी,मेळावे पत्रकार परिषद चर्चासत्र यासारख्या माध्यमातून जनजागृती करण्याचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.विमा क्षेत्रात निवृत्ती नवीन भरती न होणे,यामुळे मनुष्यबळाची मोठी टंचाई निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात नौकर भरती व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी,यासाठी देखील संघटना प्रयत्न करीत आहे देशाच्या संपत्तीचा संरक्षणाचा लढायासाठी सर्वसामान्य जनतेने प्रसारमाध्यमांनी समाज माध्यमांनी विमा कर्मचारी संघटनेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी नेत्यांनी केले.पत्रकार परिषदेला सरचिटणीस अजय डोळस उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे योगेश कोल्हे खजिनदार महेश डांगे सरचिटणीस मंदार नायगावकर योगेश कासार महिला आघाडी निमंत्रक अनघा यार्दी,प्रिया मटांगे, ज्योती रत्नपारखी,अनघा देशपांडे,राजेंद्र अहिरे व निशांत चित्राव शांताराम गामणे आदी नेते उपस्थित होते.

