मनिष म्हात्रे,वसई,
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशीचा उद्या ४७ वर्धापनदिन,
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशीचा ४७ वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उद्या संध्याकाळी काशिदास घेलाभाई हायस्कूल,आगाशी येथे साजरा होत आहे.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य तथा युवा नेतृत्व विकास तज्ञ प्रिया सावंत,या उपस्थित राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून केळवे येथील नूतन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक राऊत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सो.क्ष.स.संघाचे चिटणीस प्रफुल्ल म्हात्रे भुषवणार आहेत,अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष महेश म्हात्रे यांनी दिली आहे.

