संजय लांडगे,वाडा,
आदिवासी विकासमंत्री उईके यांच्या हस्ते ” वाचा संविधान, ” या गाण्याचे प्रसारण
भारतीय संविधानाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होण्याच्या उद्देशाने जव्हार सारख्या अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या तरुणाने ” वाचा संविधान, ” हे गाणे लिहून स्वतः व इतर कलाकारांना घेऊन या गाण्याचा व्हिडिओ तयार केला आहे.या गाण्याच्या व्हिडिओचे प्रसारण जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या निलेश लक्ष्मण मुंडेश्वर कर्णबधिर विद्यालयातील सभागृहात मोठ्या थाटात करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते वाचा संविधान हे गीत आज युट्यूबवर प्रसारित करण्यात आले.या प्रसंगी खा. डॉ.हेमंत सवरा,आ.हरिश्चंद्र भोये व जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजया लहारे इ. मान्यवर उपस्थित होते.
” वाचा संविधान, ” या व्हिडिओ गाण्याचे लेखक यशवंत तेलम,राजेश गवई, संगीतकार डी.जे.आर.के . गीतकार यशवंत तेलम व छायांकन प्रथमेश कदम यांनी केले आहे.प्रत्यक्ष
अभिनेता यशवंत तेलम, विजय बराठे,
विश्वास भरित व शिक्षक
विजय भिसे यांच्यासह अनेक कलाकरानी काम केले आहे.

