सुनील चव्हाण,विरार,
माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते दीपक मोहिते याना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार -२०२५,प्रदान..
ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांना गेल्या महिन्यात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था, नाशिक,यांच्यातर्फे पत्रकारितेचा ” राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार – २०२५,” जाहीर झाला होता.त्याचा वितरण सोहळा नाशिक येथे पत्रकार दिनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता.पण काही कारणास्तव या सोहळ्याला दीपक मोहिते उपस्थित राहू शकले नाहीत.त्यामुळे आयोजकांनी त्यांना तो कुरियरने पाठवून दिला होता व तो जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांच्या हातून स्विकरावा,असे कळवले होते.
त्यानुसार आज तो पुरस्कार दीपक मोहिते यांनी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते स्विकारला.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.आ.हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी ते आपल्या मनोगतामध्ये म्हणाले,आपले news27.inmedia,हे वेबपोर्टल सध्या अनेक जिल्ह्यातील बातम्या देत असते.तुमच्या बातम्या या समाजातील विविध घटकांना न्याय देणाऱ्या असतात.दररोज प्रसिद्ध होणारे ” हल्लाबोल,” हे सदर ( राजकीय विश्लेषण ) वाचनीय असते.हे सदर म्हणजे राजकीय नेत्यांच्या डोळ्यात टाकण्यात येणारे अंजनच असते.तुमचे पत्रकारितेचे कार्य असेच सुरू राहो,तसेच तुमच्या या वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा,

