- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” सरकारला कानपिचक्या,” मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे ; सरकार अडचणीत, निवडणुकीपूर्वी सरकारकडून खैरात करण्यात येणाऱ्या मोफत योजनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना खडे बोल सुनावले आहेत.या संदर्भात शहरी भागातील बेघर लोकांशी संबधित एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्या.बी.आर.गवई व न्या.ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने ” मोफत मिळत असलेल्या सुविधांमुळे लोक आता काम करण्यास तयार नाहीत.त्यांना मोफत धान्य मिळते,त्यांना कोणतेही काम न करता पैसे मिळतात.त्यांच्या अडचणी आपण समजू शकतो,पण त्यांना आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून देशाच्या विकासाला हातभार लावण्याची संधी मिळवून द्यायला हवी.त्यांना मोफत योजनांचा फायदा मिळत असल्यामुळे ते काम करण्यास टाळाटाळ करत असतात,” अशा शब्दात त्यांनी…
दीपक मोहिते, थ्री वॉर रूम वॉर : संघर्ष पराकोटीला, महायुती सरकारमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफूस सुरू असते.आता मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या तीन प्रमुख नेत्यांच्या वॉर रूमवरून घमासान सुरू झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवर नजर ठेवणे व वेळोवेळी आढावा घेणे,यासाठी वॉर रूमची निर्मिती केली होती.त्यांच्या मागोमाग अजित पवार यांनीही आपली वॉर रूम सुरू केली होती,पण तीला अवघ्या काही दिवसात टाळे लागले होते. त्यांची वॉर रूम का बंद झाली,हा एक वेगळा विषय आहे.पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे.राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानकपणे याच मजल्यावर आपली…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग अंतिम, पीएमएलए कायद्याची राजकीय नेते व उद्योगपतींमध्ये प्रचंड दहशत, कालच्या भागात आपण सक्तवसुली संचालनालयाचा ( ईडी ) पूर्व इतिहास,कामकाजाची पद्धत,इ.विषयाचा आढावा घेतला.आज आपण पीएमएलए म्हणजे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा,हा कसा आहे.या कायद्याची राजकीय नेते व उद्योगपतींमध्ये एवढी दहशत का आहे ? याविषयीची माहीती घेणार आहोत. मनी लाँडरिंग,हवाला,इ. प्रकरणाची चौकशी करणे व अशा आर्थिक प्रकरणातील गुन्हेगारांना या कायद्याच्या २८ ( १५६ कलम ) नुसार संपत्ती जप्त करणे,हस्तांतरण,रुपांतरण व विक्री यावर बंदी घालणे,अशा प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार असतात.गडगंज पैसा आला कोठून ? त्याचा विनियोग कसा व कुठे झाला ? याची माहिती घेण्यासाठी सक्तवसुली संचालनालय या कायद्यानुसार संबधित…
लता देशपांडे,वसई, वसई- माणिकपूर येथे पालघर ग्रंथोत्सव-२०२४ चे आयोजन, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत ग्रंथालय संचालनालय, वसई-विरार महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी,कार्यालय,पालघर व मनोहर वाचनालय, माणिकपूर,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ फेब्रु.२०२४ रोजी पालघर ग्रंथोत्सव-२०२४ च्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि त्यासोबतच साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वनेमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १५ फेब्रु.२०२५ रोजी सकाळी १०.३० वा.समाजोन्नती मंडळ संचलित मनोहर वाचनालय,माणिकपूर वसई येथे होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,खा.हेमंत सवरा, आ.राजेंद्र गावित,आ.निरंजन डावखरे,आ.विनोद निकोले, आ.राजन नाईक,आ.विलास तरे,आ.दौलत दरोडा, आ.हरिश्चंद्र भोये,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.शांताराम मोरे, आ.स्नेहा दुबे-पंडीत यांची प्रमुख उपस्थित…
लता देशपांडे,वसई, वसई – माणिकपूर येथे पालघर ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन, पालघर,दि.14:-महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत ग्रंथालय संचालनालय, वसई-विरार महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी,कार्यालय,पालघर व मनोहर वाचनालय, माणिकपूर,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ फेब्रु.२०२४ रोजी पालघर ग्रंथोत्सव-२०२४ च्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि त्यासोबतच साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वनेमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १५ फेब्रु.२०२५ रोजी सकाळी १०.३० वा.समाजोन्नती मंडळ संचलित मनोहर वाचनालय,माणिकपूर वसई येथे होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,खा.हेमंत सवरा, आ.राजेंद्र गावित,आ.निरंजन डावखरे,आ.विनोद निकोले, आ.राजन नाईक,आ.विलास तरे,आ.दौलत दरोडा, आ.हरिश्चंद्र भोये,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.शांताराम मोरे, आ.स्नेहा दुबे-पंडीत यांची प्रमुख…
दीपक मोहिते, ” कटू सत्य,” एसटी महामंडळ ; मंत्र्यांची नजर भुखंडाचे श्रीखंड लाटण्यावर, राज्यातील जनतेची लालपरी,अशी ओळख असलेल्या एसटी सेवेची गेल्या काही वर्षात पार दुर्दशा झाली आहे.अशावेळी नवनिर्वाचित परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे महामंडळाचे भूखंड विकून श्रीखंड लाटू पाहत आहेत.दरवर्षी पाच हजार वाहने विकत घेण्याचा त्यांचा विचार आहे.सलग पाचवर्षे खरेदी झाल्यानंतर महामंडळाच्या ताफ्यात २५ हजार गाड्या असतील,अशा पद्धतीने नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पण त्यांची ही चाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली व त्यानी महामंडळाच्या अध्यक्षपदी उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याला आणून बसवले. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमीनीची विक्री व गाड्या खरेदी,अशा दोन खरेदी-विक्री व्यवहारातून डबघाईला आलेल्या एसटी सेवेला उर्जितावस्था येणार का ?…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करण्यापूर्वी संविधानातील शपथेची आठवण ठेवावी, राज्याचे मत्स्यउद्योग/ बंदरे विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मविआच्या सरपंचाला एक रु.चा निधी मिळणार नाही,विकासासाठी निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा,असा फतवाच जारी केला.ते आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पुढे म्हणाले,ज्या ज्या गावात महाविकास आघाडीचे सरपंच आहेत,अशांच्या नावांची यादी काढा,त्या गावांना एक रु.चा ही निधी मिळणार नाही.महाविकास आघाडीचे सरकार असताना मला खूप त्रास दिला गेला,मी आमदार असूनही मला निधी देताना डावलण्यात येत होते.त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरपंचांना विकासासाठी निधी हवा असेल तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा,असा सल्लाही त्यांनी यावेळी…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” जनता दरबारला लोकांचा किती प्रतिसाद मिळेल,हे सांगणे कठीणच आहे…. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत ” सरकार आपल्या दारी,” या उपक्रमाचा चांगलाच सुळसुळाट झाला होता.कोट्यवधी रु.ची उधळपट्टी करत,असे अनेक इन्व्हेंट पार पडले.पण सरकार दरबारी दाखल झालेल्या लाखो तक्रारींपैकी किती तक्रारीचा निपटारा होऊ शकला,हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिंदे यांच्या ” शासन आपल्या दारी,” च्या धर्तीवर ” जनता दरबार,” आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.या दोन्ही उपक्रमाला गोरगरीब जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो,पण कालंतराने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळते,पण बिचारे काही करू शकत नाहीत.मंत्र्यांची भेट सहजासहजी मिळणे कठीण असते,त्यामुळे ते अशा उपक्रमाकडे धाव…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ईडी ; छातीत धडकी भरवणारी तपास यंत्रणा, ( भाग क्र.१ ) गेल्या काही वर्षात सक्त वसुली संचालनालय ( ईडी ),केंद्रीय गुन्हे अन्वेषण ( सीबीआय ) व आयकर विभाग ( आयटी ) या तीन केंद्रीय तपास यंत्रणांची दहशत आपल्याला पाहायला मिळाली.ईडीच्या भितीने तर अनेक राजकीय नेत्यांचे धाबेच दणाणले,अटक टाळण्यासाठी अनेक नेत्यांनी अक्षरशः लोटांगण घालत सत्ताधारी पक्षाला समर्थन दिले.अनेकांच्या छातीत धडकी भरवणारा हा पीएमएलए कायदा नेमका काय आहे ? इतकी वर्षे ईडी हा विभाग कार्यरत असताना गेल्या बारा वर्षात तो इतका सक्रिय होण्यामागची नेमकी काय कारणे आहेत,यावर आपण आज प्रकाशझोत टाकणार आहोत. चला,तर सर्वप्रथम ईडी हा विभाग कधी…
वसंत भोईर,वाडा पळसाच्या पानांची पत्रावळ्या झाल्या जेवणावळीतून हद्दपार, विवाह सोहळा,सप्ताह,पूजा व धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पळसाच्या पानांच्या पत्रावळी हल्ली हद्दपार झाल्याचे चित्र आता ग्रामीण भागातही सर्रास पहावयास मिळत आहेत.तर आधुनिकीकरणाच्या युगात प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींना समाजात अधिक पसंती मिळू लागली आहे. विवाह सोहोळ्यात व इतर धार्मिक कार्यक्रमात आता पळसाच्या पानाच्या पत्रावळींची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली आहे.त्यामुळे स्थानिकांचे पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातून आणून व्यापाऱ्यांना विकणे, असा अल्प रोजगार देणारा व्यवसाय हा मागणी कमी होत असल्यामुळे भूतकाळात जमा झाला आहे. पुरातन काळापासून मंगलकार्याच्या जेवणावळीत पळसाच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या पत्रावळींचा वापर केला जात होता.आयुर्वेदीक…
