- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
राजू वाघ,मुंबई गारगाई प्रकल्प व भांडुप जलशुद्धीकरण केंद्र मुंबईसाठी महत्त्वाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाल विधान भवन,मुंबई येथे ” गारगाई धरण प्रकल्प,” यासंदर्भात आढावा बैठक आणि मौजे भांडूप,मुंबई येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी बैठक पार पडली.या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,गारगाई प्रकल्प मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक आहे. या प्रकल्पातून ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पुढील ५० वर्षे शहर व उपनगरासाठी पाणी उपलब्धता निश्चित होणार आहे. उगदा गावाजवळ ( वाडा ) हा प्रकल्प उभारण्यात येत असून या परिसरातील सहा गावांचे पुनर्वसन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व…
दीपक मोहिते, बॉटमलाईन महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक : गैरवापर होण्याची शक्यता अधिक,कामगार संघटना आक्रमक, प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा अमलात आणण्यापूर्वी सरकारने या विधेयकासंदर्भात सावधानता बाळगायला हवी.कारण या कायद्याविरोधात राज्यातील अनेक भागात पडसाद उमटू लागले आहेत. या कायद्याविषयी लोकांच्या मनात भिती आहे.हा कायदा लोकशाही मुल्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे.तो भारतीय राज्य घटनेच्या विरोधात आहे,असा जो समज निर्माण झाला आहे. तो लक्षात घेऊन सरकारने सावध पावले टाकली पाहिजेत. या कायदयाच्या तरतूदीमध्ये ” बेकायदेशीर कॄत्य,” म्हणून जे म्हंटले आहे.त्याबाबत लोकांचा आक्षेप आहे.या दोन शब्दाची नेमकी कशी व्याख्या केली आहे,त्याविषयी लोकांच्या मनात संशययाचे वातावरण आहे.आमचे मूलभूत अधिकार/हक्क,अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात…
सुरेश काटे,तलासरी, वेवजी-काटीलपाडा येथे गौणखनिजाची लूट, तलासरी तालुक्यातील मौजे वेवजी काटीलपाडा येथील गट क्रमांक २२५/९ मधून नाममात्र २०० ब्रासची रॉयल्टी असताना हजारो ब्रास माती उत्खनन करण्यात येत आहे, याबाबत खातेदार तारा अशोक वाडु यांनी तलासरी तहसील कार्यालयात तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे. गट क्रमांक २२५/९ हा सामायिक गट असून या गटातून धर्मा जवळ्या कडू यांचे नावे किरकोळ ब्रासची रॉयल्टी काढून त्या आधारे हजारो ब्रास माती पोकलन द्वारे काढण्यात येत आहे. तलासरी भागात अनेक प्रकल्प होत आहेत,त्यासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज लागते,यासाठी या प्रकल्पतिल ठेकेदार आदिवासी शेतकऱ्याची दिशाभूल करून त्यांच्या जमिनीतून हजारो…
शुभम सावंत,विरार स्वच्छ भारत अभियान २.० मध्ये उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय प्रथम क्रमांकावर, वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित स्वच्छ भारत अभियान २.० आणि स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता जनजागृतीच्या संदर्भात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै.पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विविध आंतरमहाविद्यालयीन आणि शासकीय स्पर्धांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मुग्धा लेले,श्रीमती कल्पना राऊत,उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे,प्रा.रमेश पाटील आणि प्रा.हेमा पाटील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील समन्वय समितीचे सदस्य यांनी अनमोल असे मार्गदर्शन केलेले…
वसंत भोईर,वाडा टायर कंपन्यांनी घातलाय वाड्याला विळखा, तालुक्यात ७० टायर कंपन्यामुळे वाड्याच्या नागरिकांचा जीव गुदमरत आहे.बहुसंख्य कंपन्या या शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे उघड झाले आहे.यातील ५२ टायर कंपन्या दिवस-रात्र काळाकुट्ट प्रदूषणकारी धूर ओकत आहेत.त्यांच्या त्रासाने येथील नागरिकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत.या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी त्याची तत्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याने अखेर वाड्यातील १८ टायर कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केल्या. सध्या वाडा तालुक्यात ५२ टायर कंपन्या सुरू असून या कंपन्यांमध्ये जुने टायर जाणून त्यापासून ऑइल,तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात…
संजय लांडगे,वाडा रोटरी क्लबतर्फे देवळी-मानिवली येथील विद्यार्थ्यांना १५० सौर दिव्यांचे वाटप, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई निओ आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे जुहू बीच यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील देवळी-मानिवली विभागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना १५० सौर दिवे वितरित करण्यात आले.हे सौर दिवे एका वेळच्या चार्जिंगनंतर सलग ६ तास उजेड देतात,. त्यामुळे अभ्यासामध्ये अडचण ठरणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येवर मात करणे शक्य होणार आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. हे सौर दिवे रोटरी क्लब ऑफ मुंबई निओचे अध्यक्ष आर. श्रीधर आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे जुहू बीचच्या अध्यक्षा मानसी ठक्कर यांच्या…
दीपक मोहिते, आरोग्य सुविधामध्ये वाढ करण्यासाठी आरोग्य मंत्रालय सकारात्मक- खा.सवरा, पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.हेमंत सवरा यांनी लोकसभेत गरीब,ग्रामीण व आदिवासी बांधवांसाठी केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे कौतुक केले. ” गरीब व आदिवासी समाजासाठी केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजना वरदान ठरत आहेत.त्यामुळे जनता,सरकारच्या या योजनेची आभारी आहे,” असे खा.सवरा यांनी सभागृहात सांगितले. केंद्र सरकारने १ हजार ९६१ आजारांच्या उपचारांचा समावेश विविध योजनांमध्ये केला आहे.परंतु कॅन्सर, हृदयविकार,अवयव प्रत्यारोपण यांसारख्या जीवघेण्या आणि खर्चिक आजारांसाठी अधिक सहाय्याची आवश्यकता आहे.त्यामुळे सरकार ” टॉप अप स्कीम,” लागू करण्याचा विचार करत आहे का ? असा महत्त्वाचा प्रश्न खा.सवरा यांनी सभागृहात उपस्थित केला. गरीब रुग्णांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावे,यासाठी…
दीपक मोहिते, ” सारं काही अजबच,” सरकार एका गाण्याने इतके भयभीत का झाले ? कुणाल कामरा याच्या गाण्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या पायाखालची जमीनच जणू सरकली आहे.कामरा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आ.राम कदम यांनी केली आहे.कुणाल कामरा याला परदेशातून फंडिंग होत असल्याचा त्यांनी सनसनाटी आरोप केला आहे.सनसनाटी आरोप करणाऱ्या भाजपच्या तुफानी ब्रिगेडमधील हे एक अग्रेसर नेते असून त्यांच्याकडे फारसे कोणी लक्षही देत नाही.” पोरींना उचलून आणण्याची,” शेखी मिरवणारे व भर सभागृहात एका पोलिसाला जबर मारहाण करणाऱ्यांकडून महाराष्ट्राला फारसे काही अपेक्षित नाही. असो,त्यांच्या या आरोपामध्ये तथ्य असेल तर केंद्रीय तपास यंत्रणानी कुणाल कामरा यांच्या बँक खातीची सखोल चौकशी करण्याची…
सुरेश वैद्य,पालघर जिल्हा परिषद पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मनोज रानडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनोज रानडे यांची नियुक्ती झाली आहे.आज संध्याकाळी ६.०० वाजता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारला. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी त्यांच्याकडे पदभार सोपवला.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते आणि सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सर्व विभाग प्रमुख आणि गटविकास अधिकारी यांच्याशी परिचय करून त्यांच्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. प्रशासन आणि महसूल क्षेत्रातील व्यापक अनुभव असलेल्या रानडे यांची ही नियुक्ती जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण…
वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यातील नाणे जि.प.शाळेला रोटरी क्लबकडून मिळाले संगणक, शाळा व्यवस्थापन समिती व रोटरी क्लबचे सदस्य व प्रोजेक्ट चेअरमन डाॅ.राहूल पाटील यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब ऑफ मनोर हायवे आणि रोटरी क्लब ऑफ मीरा रोड यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा नाणे येथील विद्यार्थ्यांना ६ संगणक संच भेट देण्यात आले. तालुक्यातील जि.प.नाणे शाळेत नुकताच संगणक कक्ष सुरु करण्यात आला असून या संगणक कक्षाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मीरा रोडचे अध्यक्ष आनंद भटकळ व रोटरी क्लब ऑफ मनोर हायवेचे अध्यक्ष डॉ.श्रद्धा पावडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ दहिसर मुंबईचे राजेंद्रन उन्नीकृष्णन,रोटरी क्लब ऑफ मनोर हायवेचे सेक्रेटरी…
