वसंत भोईर,वाडा
वाडा तालुक्यातील नाणे जि.प.शाळेला रोटरी क्लबकडून मिळाले संगणक,
शाळा व्यवस्थापन समिती व रोटरी क्लबचे सदस्य व प्रोजेक्ट चेअरमन डाॅ.राहूल पाटील यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब ऑफ मनोर हायवे आणि रोटरी क्लब ऑफ मीरा रोड यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा नाणे येथील विद्यार्थ्यांना ६ संगणक संच भेट देण्यात आले.
तालुक्यातील जि.प.नाणे शाळेत नुकताच संगणक कक्ष सुरु करण्यात आला असून या संगणक कक्षाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मीरा रोडचे अध्यक्ष आनंद भटकळ व रोटरी क्लब ऑफ मनोर हायवेचे अध्यक्ष डॉ.श्रद्धा पावडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ दहिसर मुंबईचे राजेंद्रन उन्नीकृष्णन,रोटरी क्लब ऑफ मनोर हायवेचे सेक्रेटरी संजय मळेकर,रोटरी क्लब ऑफ मनोर हायवेचे चार्टर्ड प्रेसिडेंट विलास पाटील,जि.प.पालघरच्या माजी महीला व बालकल्याण सभापती सुवर्णा पाटील, कैलास पाटील,ज्ञानेश्वर घरत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश पाटील,कस्तुरी पाटील,डॉ प्राची पाटील,दिपाली खिलारे, सुचित्रा ठाकरे,योगिता घोलप,सान्वी पाटील,संतोष ठाकरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

