- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, सूर्यातीर, अन्यथा जिल्हा नियोजन समित्यांच्या बैठका केवळ सोपस्कार ठरतील, दोन आठवड्यापूर्वी पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.मात्र विविध विभागाचे अधिकारी तयारी न करता आल्यामुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा पारा चढला व त्यांनी बैठकच तहकूब केली.मात्र या घटनेमुळे पालकमंत्र्यांचे प्रशासनावर अंकुश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील बैठकीचे इतिवृत्त देखील तयार करण्यात आले नव्हते.तर मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी देखील झाली नव्हती.त्यामुळे पालकमंत्री संतापले व त्यांनी बैठक तहकूब केली.अशी पाळी पालकमंत्र्यांवर का आली ? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला यंदा एक वर्ष पूर्ण होत आहे.पण जिल्ह्याने कात टाकली नाही.जिल्ह्याला मुबलक प्रमाणात आर्थिक निधी…
भाजप व शिवसेनेची ( एकनाथ शिंदे गट ) लगीनघाई सुरू झाली, पालघर, पालघर जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.तर एकनाथ शिंदे यांनीही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आपल्या पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.या सर्व घडामोडी लक्षात घेता महायुतीमधील या दोन्ही घटकांनी निवडणुकीची लगबग सुरू केल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.या बैठकीस खा.डॉ.हेमंत सवरा,आ. निरंजन डावखरे,प्रभारी राणी द्विवेदी,अभिजीत पेडणेकर,जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी व अन्य ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आखणी व अन्य बाबीवर आपली मते मांडली.तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी…
पालघर, नालासोपारा येथे आधुनिक काळातील लखोबा लोखंडे गजाआड, २५ हुन अधिक महिलांशी लग्न करून त्यांना लाखो रु.ना लुबाडणाऱ्या आधुनिक काळातील लखोबा लोखंडेला नालासोपारा पोलिसांनी गजाआड केले आहे. शादी डॉटकॉम या वेबसाईटवरून फिरोज नियाझ शेख हा इसम महिलांशी ओळख करून लग्न करायचा.नुकतेच त्याने नालासोपारा भागातील एका महिलेशी लग्न केले व त्या महिलेकडून लॅपटॉप व अन्य वस्तू विकत घेण्यासाठी साडेसहा लाख रु.उकळले.पण आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर त्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून फिरोझला ताब्यात घेतले.त्याची कसून चौकशी केली.या चौकशीत फिरोजने २५ हुन अधिक महिलांची अशीच फसवणूक केल्याचे उघडकीस आले.त्यामुळे पोलीस आता सर्व प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.फिरोज याने या महिलांना…
पालघर, अर्नाळा समुद्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू, अर्नाळा समुद्रात तरुण प्रेमीयुगुलाने उडी टाकून आत्महत्या केली.सदर घटनेत मुलाचा बुडून मृत्यू झाला तर मुलीला स्थानिक ग्रामस्थानी वाचवले. दोन दिवसांपूर्वी विरार पश्चिमेस असलेल्या ग्लोबल सिटी या वसाहतीमध्ये राहणारे एक प्रेमीयुगुल तीन दिवसांपूर्वी घरातून पळून गेले होते.या प्रकरणी अर्नाळा पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर अर्नाळा पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्या दोघांना पोलीस ठाण्यात आणले होते.त्यांची चौकशी करण्यात येत असताना त्यांनी पोलिसांची नजर चुकवून पळ काढला व नजिकच्या समुद्रात उड्या मारल्या,अशी माहिती पोलीसांकडून देण्यात आली.सदर घटनेत मुलाचा बुडून मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेल्या मुलीला स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले.या घटनेने ग्लोबल सिटी या मध्यमवर्गीयांच्या नागरी वसाहतीवर…
दीपक मोहिते, ” वास्तवाचे भान,” निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज, दरवर्षी जगभरात जागतिक निसर्ग संवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.यंदाची थीम आहे,” लोक व हिरवाई यांच्यामध्ये समन्वय साधणे, निसर्ग संवर्धनात डिजिटल प्रक्रियेला प्राधान्य देणे,” हा दिवस साजरा करण्यामागे निसर्ग व पर्यावरणाचे महत्व लोकांना कळावे,असा आहे.निकोप पर्यावरण हा निरोगी व मानवी जीवनाचा स्थिर पाया आहे,हे मान्य करण्यासाठी जगभरातील देशात जनजागृती मोहिमा राबवण्यात येत असतात.त्यामागे नैसर्गिक वातावरणातून नामशेष होणारे प्राणी व वृक्षसंपदा वाचवणे,असा उद्देश आहे.पृथ्वी वाचवण्यात पाणी,हवा,माती,ऊर्जा, खनिजे,वृक्षसंपदा,प्राणी व पक्षी जगवण्यासाठी नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनाची नितांत गरज आहे.पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो,त्यामुळे सध्या आपण ग्लोबल वॉर्मिंग,विविध प्रकारचे आजार,वातावरणात होणारे धोकादायक बदल,अवकाळी…
पालघर, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १४४७.९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.गेल्या वर्षी १८०८.३ मि.मी.पाऊस पडला होता. गेल्या पंधरा दिवसापासून सलग पडणाऱ्या पावसाने काल दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळी पुन्हा हजेरी लावली.सकाळी दोन तास पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले.जिल्ह्यातील वैतरणा धरण सोडल्यास धामणी,मोडकसागर ही धरणे,कवडास,वांद्री हे बंधारे,विरार पूर्वेस असलेली उसगाव व पेल्हार ही छोटी धरणे तुडुंब भरली.तर सूर्या, पिंजाळ व देहर्जे या नद्यांच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे.काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.पुन्हा जोरदार वृष्टी झाल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने या नद्यांच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सूर्य देखील खुदकन हसला असेल, पाच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती.त्याच्या या टीकेला खा.सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले होते.त्यानंतर शरद पवार यांनीही अमित शहा यांना त्याच भाषेत पलटवार केला.शरद पवार हे कधीही कोणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करत नाहीत.पण अमित शहा यांनी ज्या भाषेत त्यांना लक्ष्य केले,त्यामुळे त्यांनी आपला संयम सोडला व शहा यांना चांगलेच फैलावर घेतले.शरद पवार यांनी केलेला पलटवार हा ” ऍक्शनवर रीऍक्शन,” अशा सदरात मोडणारा आहे.या सर्व घडामोडींवर आता भाजपचे बोलघेवडे प्रवक्ते अकलेचे तारे तोडू लागले आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या…
शासनाच्या महत्वकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहोचवा- पालकमंत्री चव्हाण, पालघर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना,मुख्यमंत्री वयोश्री योजना,मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना व इतर महत्त्वाच्या योजना राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना असून त्या नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात,असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,खा.डॉ.हेमंत सवरा, आ.श्रीनिवास वनगा,सुनील भुसारा,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल…
पालघर, बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरले, आज दुपारी बोईसर रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीचे चार डबे रुळावरून अचानक घसरले.मात्र या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.दुर्घटनेची खबर मिळताच रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. आज दुपारच्या सुमारास बोईसर रेल्वे स्थानकातून धीम्या गतीने जाणाऱ्या मालगाडीचे चार डबे अचानक घसरले.गाडीचा वेग कमी असल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.तसेच उपनगरीय सेवेवर त्याचा कोणताही परिणाम जाणवला नाही.उपनगरीय सेवा सुरळीत सुरू होती.मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या थोड्या विलंबाने धावत होत्या.मालगाडीचा वेग कमी असल्यामुळे रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही,तसेच जीवितहानीही झाली नाही.या घटनेनंतर रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घसरलेले डबे पूर्वपदावर आणण्याचे काम…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” आ.बाबाजानी दुरानी लवकरच शरद पवार गटात, अजित पवार गटाचे आ.बाबाजानी दुरानी यांनी महायुतीमध्ये काम करताना अवघडल्यासारखे वाटते.विचारात फरक पडल्यामुळे आपण पक्षावर ( अजित पवार गट ) नाराज असल्याचे स्पष्ट केले आहे.काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली.त्यांचे अजित पवार गटाला ” जय महाराष्ट्र,” करणे,हा अजित पवार गटाला मोठा झटका असल्याचे मानण्यात येते आहे. आ.बाबजानी दुरानी हे अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष आहेत.या अगोदर त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती.तेंव्हापासून ते पुन्हा स्वगृही परततील,अशी चर्चा सुरू झाली होती.ते विधान परिषदेचे सदस्य असून लवकरच त्यांचा कार्यकाळ…
