पालघर,
अर्नाळा समुद्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू,
अर्नाळा समुद्रात तरुण प्रेमीयुगुलाने उडी टाकून आत्महत्या केली.सदर घटनेत मुलाचा बुडून मृत्यू झाला तर मुलीला स्थानिक ग्रामस्थानी वाचवले.
दोन दिवसांपूर्वी विरार पश्चिमेस असलेल्या ग्लोबल सिटी या वसाहतीमध्ये राहणारे एक प्रेमीयुगुल तीन दिवसांपूर्वी घरातून पळून गेले होते.या प्रकरणी अर्नाळा पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर अर्नाळा पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्या दोघांना पोलीस ठाण्यात आणले होते.त्यांची चौकशी करण्यात येत असताना त्यांनी पोलिसांची नजर चुकवून पळ काढला व नजिकच्या समुद्रात उड्या मारल्या,अशी माहिती पोलीसांकडून देण्यात आली.सदर घटनेत मुलाचा बुडून मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेल्या मुलीला स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले.या घटनेने ग्लोबल सिटी या मध्यमवर्गीयांच्या नागरी वसाहतीवर शोककळा पसरली आहे.याप्रकरणी अर्नाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

