- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, आज मराठी राजभाषा दिन,पण शासनस्तरावर मात्र उदासीनता, आज मराठी भाषा दिन असून तो दरवर्षी शासनस्तरावर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा हा दिन उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होता. पण दुर्देवाने तसं घडताना दिसत नाही.एकीकडे आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद जरूर आहे.पण दुसरीकडे मराठी भाषेची होत असलेली गळचेपी ही दुर्देवी तर आहेच पण मराठी मन व मराठी अस्मितेला क्लेशकारक ठरणारी आहे. मराठी माणसांवर हिंदी बोलण्याची जी सक्ती वारंवार होत असते, वेळप्रसंगी मारहाण होते.हे न्यायाला धरून नाही.पण आपले सरकार या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला तयार नाही.असो,” कोळसा कितीही उगाळला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता तुम्ही सत्तेत आहात,सरकारवर दबाव टाकून कामे करा,अधिकाऱ्यांना निवेदने कसली देता ? जुन्या मानसिकतेमधून आता बाहेर पडा .. विधानसभा निवडणुका होऊन जवळपास चार महिन्याचा काळ लोटला पण सरकारची गाडी अद्याप रुळावर आलेली नाही.आपले मायबाप सरकार सुरुवातीपासून लडखडत उभे आहे.मंत्रीपदे,खाती, पालकमंत्रीपदे वाटप इ.महत्वाची कामे हातावेगळी करताना सरकारची चांगलीच दमछाक झाली.पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही.राज्यस्तरावर सरकारची अशी तऱ्हा तर जिल्हा व तालुका स्तरावर अशीच परिस्थिती पाहायला मिळते.राज्याचे विविध क्षेत्राचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.फडणवीस सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी केवळ दोन विषयावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.विरोधी पक्षाच्या आमदारांची फोडाफोडी व दुसरे रस्त्याची कामे..या दोन विकासकामाशिवाय अन्य प्रश्नाकडे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गृहविभाग संभाळण्यास देवाभाऊ अपयशी… महायुतीच्या साडेतीन वर्षाच्या काळात राज्याची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पूर्णतः ढासळली आहे.दिवसागणिक होणारे बलात्कार,हत्या,लूटमार, विनयभंग,कोयता गॅंगचा हैदोस,हिट अँड रन,अपहरण इ.घटनांनी महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा पार काळावंडला गेला आहे.या परिस्थितीला राज्याचा गृहविभाग सर्वस्वी जबाबदार आहे.२०१४ ते २०१९ दरम्यान यशस्वी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या अडीच वर्षातील बेभरवसा कारभार जबाबदार आहे.वास्तविक राज्यात गुन्हेगारीचा आलेख सतत वर जात असताना फडणवीस यांनी गृहखाते सांभाळण्यास आपण असमर्थ ठरलो,हे कबूल करून हा महत्वाचा तसेच संवेदनशील विभाग मंत्रिमंडळातील एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवणे आवश्यक ठरते.पण देवेंद्र फडणवीस यांचा जीव,या विभागात कायम अडकल्याचे दिसून आले आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणात जे काही…
संजय लांडगे,वाडा, लाखो भाविकांनी घेतले तिळसेश्वराचे दर्शन, वाडा तालुक्यातील तीळसा येथील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त तिळसेश्वराच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी उसळली होती. वाडा शहरापासून नऊ कि.मी.अंतरावर असलेले महादेवाचे मंदिर हे वैतर्ना नदीपात्रात अखंड दगडावर बांधलेले असून ते पुरातन असल्याने दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवसी मोठी जत्रा भरते. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक भक्त शिव दर्शनासाठी येथे येथे येत असतात. येथील पाण्यात मोठ मोठे देवमासे असल्याने त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असते, तर हे मासे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी दिसतात अशी भक्तांची धारणा आहे. यावर्षीही लाखोंच्या आसपास भक्तांनी दर्शन घेतले,दरम्यान वाडा पोलिसांचे एकूण दोनशे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात सहभागी होते.वाडा पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेसह चोख बंदोबस्त…
दीपक मोहिते, नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यावर केवळ भाजपचाच प्रभाव, २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजना संदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते.तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.त्यामुळे मंत्रालयात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.या कुंभमेळ्यावर भाजपचे वर्चस्व राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. आज झालेल्या बैठकीला केवळ जलसंपदामंत्री गिरीष महाजन उपस्थित राहिल्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या आहेत.बैठकीला त्यांनी हजर राहणे,म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागणार,अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. २०२७ मध्ये नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती.या बैठकीचे जिल्ह्यातील…
दीपक मोहिते, आजच्या दिवशी ( २६ फेब्रु.१९६६ ) प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्रवीर सावरकर अनंतात विलीन झाले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी २८ मे १८८३ मध्ये झाला.ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक,राजकारणी, समाजसुधारक तसेच कवी /, लेखक होते.सावरकर हे सर्वसमावेशक हिंदुत्वाचे कट्टर प्रणेते होते.त्यांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या अशी होती. ” आसिंधू सिंधू पर्यंता,यस्य भारतभुमिका ! पितृभू: पुण्यभूषचैव स वै हिंदुरीती स्मृत: !! आज त्यांचा स्मृतिदिन… अशा या प्रखर हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीराचे निधन २६ फेब्रु. १९६६ रोजी झाले.ही दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली.अनेक वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले.वृत्त ऐकताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय…
दीपक मोहिते, ” कुछ तो गडबड है,” ” दालमे कुछ काला भी है,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,या दोघांमध्ये निर्माण झालेली दरी दिवसेंदिवस अधिक रुंदावत चालली आहे.तर दुसरीकडे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,हे फडणवीस यांच्यावर सध्या टीकेची झोड उठवत नाहीत.उलट ठाकरे हे फडणवीस यांचे सतत कौतुक,अभिनंदन करत भेटीगाठी घेत आहेत.त्यामुळे ” कुछ तो गडबड है,” अशी चर्चा सुरू झाली आहे.या सर्व घडामोडीमुळे शिंदे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.मंत्र्यांचे स्वीय सचिव व ओएसडी नेमण्याचे अधिकार स्वतःकडे घेत अनेक मंत्र्यांच्या वसुलीबाज लोकांना बाहेरचा दरवाजा दाखवला. त्यामुळे शिंदे गटाच्या…
दीपक मोहिते, वसई – विरार भागात परवडणाऱ्या घरांसाठी गोदरेज कॅपिटलकडून अर्थसहाय्य, गोडरेज इंडस्ट्रीज समूहाची वित्तीय सेवा शाखा, गोडरेज कॅपिटलने आपल्या गृहवित्त उपकंपनीच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन विरार येथे केले. आवाक्यातील घरांना अर्थसहाय्य करण्यासाठी निवडण्यात आलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.वसई, बोईसर,डहाणू,पालघरसह अन्य जवळपासच्या भागातही ही शाखा सेवा पुरवेल आणि कमी ते मध्यम-उत्पन्न गटाला गृहकर्ज उपलब्ध करून देईल. मध्यम ते कमी उत्पन्न असलेल्या गृहखरेदीदारांना स्वस्तातील घरांचे पर्याय शोधून देणे, तसेच पगारदार आणि व्यवसायिकांसाठी बिगर निवासी भारतीय ५ लाखांपासून गृहकर्ज उपलब्ध करून देणे,हे गोदरेज कॅपिटलचे उद्दिष्ट आहे.या कर्जाचा कालावधी ३० वर्षांपर्यंतचा असेल.आवड आणि किंमत याची सांगड घालण्यासोबतच गृहनिर्माण फायनान्स सोल्यूशन्ससह गृहखरेदीदारांमध्ये एक…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती मेळावा संपन्न, तालुका विधी सेवा समिती जव्हार व जव्हार तालुका विधिज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती मेळावा आज जुनी जव्हार ग्रामपंचायतमधील काळीधोंड येथे संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिजित ना.गायकवाड दिवाणी न्यायाधीश जव्हार होते,तर प्रमुख अतिथी म्हणून भाऊसाहेब फटांगरे अप्पर जिल्हाधिकारी पालघर मुख्यालय जव्हार,गणपतराव पिंगळे,उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार, लता धोत्रे तहसीलदार जव्हार, मूयर चव्हाण तहसीलदार मोखाडा, चारूशीला पवार तहसीलदार विक्रमगड,दीपक टिके सहाय्यक प्रकल्प अधिकारी जव्हार,महादेव राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी,जव्हार मधुकर गवळी सहाय्यक गटविकास अधिकारी, मोखाडा निलेश भोये…
सुधीर धांगडा, तिल्हेर, राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी मेढे फाटा येथे असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्ते व मित्राच्या उपस्थित त्यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर मेढे फाटा येथील अनाथ आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.सायवन येथे जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या हस्ते संगणक वाटप करण्यात आले.या प्रसंगी माजी खा. बळीराम जाधव,यांनी राजेंद्र पाटील यांच्या मागील तीन दशकाच्या कार्याचा गौरव केला. राजेंद्र पाटील हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सहकार क्षेत्रात गेल्या…
