- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
सचिन परब,विरार, जागतिक महिला दिनी वसई विरार मनपाच्या परिवहन सेवेत महिलांना मोफत प्रवास, ०८ मार्च, २०२५ रोजी जगभरात १०० हून अधिक देशांमध्ये ” जागतिक महिला दिन,” साजरा होत आहे. महिलांचा सन्मान करण्यासाठी,महिला सक्षमीकरण आणि समानतेचे समर्थन करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात.समाज, राजकारण,अर्थव्यवस्था आणि संस्कृतीमध्ये महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या रॅली,परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.राजकारणापासून विज्ञान,कला,संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो.तसेच महिला दैनंदिन जीवनात स्वतःच्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असतात. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सर्व महिलांना ०८ मार्च,२०२५ रोजी आयुक्त अनिलकुमार…
संदीप जाधव,बोईसर, तारापूर येथे महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन, तारापूर अणुशक्ती केंद्र आणि जिल्हा परिषद,पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.आ.केंद्र, तारापूर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.या शिबिरामध्ये तारापूर पंचक्रोशीतील ४०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक रामदास मऱ्हाड उपस्थित होते. शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या आणि उपचार सेवा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.रक्तदाब,रक्तशर्करा, मुखाचा,स्तन, गर्भाशय व मुखाची कर्करोग तपासणी, तसेच गरोदर माता आणि नवजात बालकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय सिकल सेल, सामान्य आजारांचे निदान व उपचार करण्यात आले. पालघर जिल्ह्यात गर्भवती महिलांमध्ये वाढत्या रक्तक्षयाच्या (अॅनिमिया) समस्येच्या पार्श्वभूमीवर,…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” निदान आता तरी अलिबाबा आणि चाळीस चोरांपासून सावध रहा… गेल्या विधानसभा निवडणुकीत ” अलिबाबा आणि चाळीस चोर,” आपल्या बहिणींची फसवणूक करत पुन्हा सत्तेच्या गादीवर विराजमान झाले आहेत.आम्हीच जगज्जेते अशा आविर्भावात ते सध्या वावरत आहेत.पण धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे या दोन भामट्यांनी त्यांच्यासह इतर ३९ चोरांची लक्तरे वेशीला टांगली व राज्यभरात त्यांची नाचक्की झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे ४१ आमदार ( अलिबाबा आणि चाळीस चोर ) निवडून आले.त्यामध्ये छगन भुजबळ,( महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा ) सुनील तटकरे,दस्तुरखुद्द अजित पवार,( जलसंपदा विभागाचे ७० हजार कोटी रु.फेम ) हसन मुश्रीफ,( अनेक आर्थिक घोटाळ्याचा जनक ) माणिकराव…
दीपक मोहिते, जनतेचा प्रचंड दबावासमोर सरकारला झुकावे लागले,पण सरकारची अब्रू गेली, संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.गेल्या तीन महिन्यापासून राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.पण सरकारपक्ष मात्र जोवर धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रत्यक्ष पुरावे मिळत नाहीत,तोवर त्यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही,असे सांगत होते.काल देशमुख यांची हत्या करतानाचे व्हिडियो व छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले.या हत्येतील छायाचित्रे व व्हिडियो पाहून सरकार देखील हादरून गेले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघामध्ये काल सुमारे तासभर चर्चा झाली.या बैठकीत मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा,असा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार त्यांचा…
संदीप जाधव,बोईसर वारांगडे येथे फर्निचर दुकानाना भीषण आग ; सात दुकाने जळून खाक, वारांगडे येथील फर्निचर मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागली.या आगीतसात एकमेकांना लागून असलेली सात दुकाने खाक झाली. आगीची भीषणता इतकी होती की संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने भरून गेला. सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मात्र आग कशामुळे लागली याबाबत कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. येथे फर्निचरची दुकाने दाटीवाटीने एकमेकांना लागुन असल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली.विशेष म्हणजे,या भागात कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतात.या घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.मात्र दुकाने एकमेकांना लागून असल्याने पाण्याचा फवारा मारून…
दीपक मोहिते ” हल्लाबोल,” सारं काही संपल्यात जमा… संतोष देशमुख यांची हत्या करताना काढण्यात आलेले फ़ोटो वायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशीरा बैठक घेऊन या प्रकरणी चर्चा केली.निदान या चर्चेनंतर तरी सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतात की पुन्हा त्यांचा बचाव करत राहतात,याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील हादरवणारे फोटो सोशल मीडियावर काल व्हायरल झाले आणि उभा महाराष्ट्र सुन्न झाला.अत्यन्त अमानुष पद्धतीनं देशमुख यांची अत्यन्त निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्याची छायाचित्रे व व्हिडीओ आरोपीनी काढले…
दीपक मोहिते, महाराष्ट्रात सध्या काय चाललं आहे ? बघा, आपल्या राज्यसरकारचा ११ कलमी कार्यक्रम, १) महिला सुरक्षित नाहीत, बलात्कारांच्या घटनामध्ये लक्षणीय वाढ, २) कोयता गँग,कराड गँगचा धुमाकूळ,विद्यानगरी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता गुंडाचे आश्रयस्थान झाले आहे. ३) गुंड,पोलीस व राजकारणी यांची अभद्र युती,वैभवी देशमुख आपल्याला न्याय मिळावा,यासाठी वणवण फिरत आहे,पण नालायक सरकार अधिक असंवेदनशील होत चालले आहे. ४) राज्याचे गृहखाते मुर्दाड बनले असून या खात्यावर नियंत्रण नसल्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. ५) कायदा व सुव्यवस्थेचा पार बोजवारा,गुन्ह्यामध्ये दिवसागणिक वाढ,पोलिसांची विश्वासाहर्ता प्रचंड खालावली. ६) राज्यातील उद्योगधंदे परराज्यात चालले,पण मायबाप सरकार आमदार फोडण्यात व्यस्त,मुंडे व कोकाटे,हे दोघे आमचं कोणी वाकडं…
वसंत भोईर,वाडा उन्हाळी मिरची खाते भाव; फुल किडीला रोखणार कसे? तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी भाजीपालाच आर्थिकदृष्ट्या तारत आहे. मात्र,उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी मिरचीची अधिक लागवड करत असतात.पीक बहरत आले की या पिकांवर रोगराई त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कीड लागते.तिला रोखण्याकामी मात्र शेतकऱ्याची दमछाक होत असते. वाडा बाजारपेठेत सध्या मिरचीची आवक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी मिरची ८० रू.प्रति किलो दराने विक्री होत होती.आताही सरासरी ५० रु. भाव मिळत आहे. विहीर,बोरवेल कमी पाणी असलेले भाजीपाला उत्पादक शेतकरी मिरची पीकाला पहिली पसंती देत आहेत. ठिबकच्या साहाय्याने मिरचीला पाणी देण्यात येते. तसेच मल्चिंगवर ही मिरचीची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा…
वसंत भोईर,वाडा आदिवासी विकास महामंडळाचा गलथान कारभार चव्हाटय़ावर, वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळीच पैसा उपलब्ध होत नसल्यामुळे तीन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.भात दिल्यानंतर तीन दिवसात पैसे असा महामंडळाचा नियम आहे,मात्र हा नियम धाब्यावर बसवून तीन महिने उलटले तरी पैसांचा पत्ताच नाही.त्यामुळे शेतकऱ्यांत महामंडळाविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज तहसीलदारांना निवेदन देऊन येत्या चार पाच दिवसात पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून तालुक्यात भातखरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.गो-हे,पोशेरी, कोनसई,परळी,सारशी,खैरे- आंबिवली,मानिवली,गुहिर या आठ केंद्रांचा…
नाशिक,प्रतिनिधी, सीपीआय ( एम ) चे २४ वे अधिवेशन सेलू येथे पार पडले, राज्यातील मराठवाडा भागातील परभणी जिल्ह्यात सेलू येथे काल सीपीआय (एम) च्या २४ व्या महाराष्ट्र राज्य पक्ष अधिवेशनाची यशस्वीरित्या सांगता झाली. या अधिवेशनात ४७ वर्षीय डॉ. अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून एकमताने निवड करण्यात आली. पॉलिट ब्युरो सदस्य आणि पक्षाचे समन्वयक प्रकाश करात,पोलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू आणि डॉ.अशोक ढवळे या अधिवेशनास उपस्थित होते. राज्यातील २९ जिल्ह्यांतील एकूण ३३७ प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते. २४ व्या राज्य अधिवेशनाची ज्येष्ठ नेते नरसय्या आडम,उदयन शर्मा,दत्ता माने आणि शिवगोंडा खोत यांनी ध्वजारोहण करून सुरुवात केली. सीपीआय (एम) चे…
