दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
निदान आता तरी अलिबाबा आणि चाळीस चोरांपासून सावध रहा…
गेल्या विधानसभा निवडणुकीत ” अलिबाबा आणि चाळीस चोर,” आपल्या बहिणींची फसवणूक करत पुन्हा सत्तेच्या गादीवर विराजमान झाले आहेत.आम्हीच जगज्जेते अशा आविर्भावात ते सध्या वावरत आहेत.पण धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे या दोन भामट्यांनी त्यांच्यासह इतर ३९ चोरांची लक्तरे वेशीला टांगली व राज्यभरात त्यांची नाचक्की झाली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे ४१ आमदार ( अलिबाबा आणि चाळीस चोर ) निवडून आले.त्यामध्ये छगन भुजबळ,( महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा ) सुनील तटकरे,दस्तुरखुद्द अजित पवार,( जलसंपदा विभागाचे ७० हजार कोटी रु.फेम ) हसन मुश्रीफ,( अनेक आर्थिक घोटाळ्याचा जनक ) माणिकराव कोकाटे,( सदनिका चोरणारा भामटा ) धनंजय मुंडे,( याच्या नावावर अनेक उपदव्याप ) खा.प्रफुल्ल पटेल ( एअर पोर्ट जमिनी व मुंबईमधील अनधिकृत इमारत ) हे सारे या टोळीचे सरदार आहेत.शिक्षा भोगून आलेले नबाब मलिक,या भामट्याला लोकांनी निवडणुकीत थेट हाकलूनच दिले.त्यामुळे मलिक याना टोळीचे सदस्यत्व मिळू शकले नाही.धनंजय मुंडे याने तर सत्तेच्या आड येणाऱ्याचे रक्त पिण्याचे ऐतिहासिक कार्य करून दाखवले आहे.याला आपण काळाकुट्ट इतिहास म्हणता कामा नये.कारण स्वतःला सभ्य व सुसंस्कृत म्हणवणाऱ्या नीच माणसाचा तो वर्तमान आहे.आणि तुमच्या-आमच्या दुर्देवाने आज ही नीच माणसे सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसलेली पाहायला मिळतात.याला तुम्ही व आम्ही जबाबदार आहोत.गुलाबी पेहराव करून ” आमच्या लाडक्या बहिणी,” अशा आरोळ्या ठोकत गल्लीबोळात हे नराधम फिरले व आपण त्यांना डोक्यावर घेतले.आज या नराधमांमुळे त्या सभ्य,सुसंस्कृत व लेकुरवाळ्या संतोष देशमुख या तरुणाला जीवानिशी जावे लागले.त्याची लेकरे गेली तीन महिने आपल्याला न्याय मिळावा, यासाठी सगळ्यांचे उंबरठे झिजवत राहिले,पण त्यांना न्याय मिळाला नाही.धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा केवळ राजीनामा घेऊन त्यांना न्याय मिळणार नाही,तर या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकवले गेले पाहिजेत,तरच देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल.या सर्व पार्श्वभूमीवर सरकारची विश्वासार्हता मात्र लयाला तर गेलीच आहे.पण सरकार किती असंवेदशील आहे,हे देखील स्पष्ट झाले आहे.

