सचिन परब,विरार,
जागतिक महिला दिनी वसई विरार मनपाच्या परिवहन सेवेत महिलांना मोफत प्रवास,
०८ मार्च, २०२५ रोजी जगभरात १०० हून अधिक देशांमध्ये ” जागतिक महिला दिन,” साजरा होत आहे. महिलांचा सन्मान करण्यासाठी,महिला सक्षमीकरण आणि समानतेचे समर्थन करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात.समाज, राजकारण,अर्थव्यवस्था आणि संस्कृतीमध्ये महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या रॅली,परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.राजकारणापासून विज्ञान,कला,संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो.तसेच महिला दैनंदिन जीवनात स्वतःच्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असतात.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सर्व महिलांना ०८ मार्च,२०२५ रोजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी महिलांना प्रोत्साहन देणे कामी वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमध्ये मोफत बस प्रवास देण्याबाबत एक विशेष संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त ०८ मार्च, २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील मोफत बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,

