दीपक मोहिते,
महाराष्ट्रात सध्या काय चाललं आहे ?
बघा, आपल्या राज्यसरकारचा ११ कलमी कार्यक्रम,
१) महिला सुरक्षित नाहीत, बलात्कारांच्या घटनामध्ये लक्षणीय वाढ,
२) कोयता गँग,कराड गँगचा धुमाकूळ,विद्यानगरी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता गुंडाचे आश्रयस्थान झाले आहे.
३) गुंड,पोलीस व राजकारणी यांची अभद्र युती,वैभवी देशमुख आपल्याला न्याय मिळावा,यासाठी वणवण फिरत आहे,पण नालायक सरकार अधिक असंवेदनशील होत चालले आहे.
४) राज्याचे गृहखाते मुर्दाड बनले असून या खात्यावर नियंत्रण नसल्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही.
५) कायदा व सुव्यवस्थेचा पार बोजवारा,गुन्ह्यामध्ये दिवसागणिक वाढ,पोलिसांची विश्वासाहर्ता प्रचंड खालावली.
६) राज्यातील उद्योगधंदे परराज्यात चालले,पण मायबाप सरकार आमदार फोडण्यात व्यस्त,मुंडे व कोकाटे,हे दोघे आमचं कोणी वाकडं करू शकत नाहीत,अशा मस्तीत..
७) मंत्रीपद,मलईदार खाती, पालकमंत्रीपद व खुर्चीसाठी मंत्र्यांची जीवघेणी धडपड,
८) महायुती सरकारच्या काळात गुन्हेगारांना राजाश्रय मिळू लागल्यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत,मात्र महायुतीचे शिलेदार मात्र आपल्याच मस्तीत,
९), भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजागर,पण कारवाई नाही.अक्षय शिंदे याचा फेक इन्काउंटर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न,
१०) आर्थिक आघाडीवर राज्याची प्रचंड घसरण, राज्यावर ९ लाख कोटी रु.च्या कर्जाचा बोझा,मात्र मंत्र्यांची उधळपट्टी सुरूच..
११) गेल्या साडेतीन वर्षात परकीय कंपन्यासोबत राज्यात प्रकल्प उभाण्यासाठी हजारो कोटीचे करारनामे,किती खरे किती खोटे देवजाणे ? पण एकाही प्रकल्पाची साधी वीट लागली नाही.

