- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- नेपाळ नंतर भारताला सर्वाधिक धोका,
- पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ पासून धावणार,
- अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही,- सर्वोच्च न्यायालय,
- मी वसई – विरारच्या रस्त्यावरून येऊ तरी कसा ? – बाप्पा
- सर्वप्रथम नालासोपारा शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारा…
- पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका,
- सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या,
- दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, प्रतिक्षा संपणार का ? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ; आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सूनावणीकडे सर्वांचे लक्ष, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सोक्ष मोक्ष लागण्याची शक्यता आहे.गेल्या साडेचार वर्षांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.त्यामुळे आज होणाऱ्या सूनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आरक्षण व प्रभाग रचना, अशा दोन कारणावरून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका गेल्या साडेचार वारंवार पुढे ढकलल्या गेल्या.राज्यशासनाने या काळात महानगरपालिका,महापालिका,नगरपरिषदा,नगर पंचायती,जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,सहकारी बँका व संस्थावर शासनाने प्रशासक नेमले.प्रशासकीय राजवटीत या सर्व संस्थांचा कारभार नोकरशाहीच्या ताब्यात गेल्यामुळे विकासाची गती मंदावली,भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाली,तसेच या काळात लोकांची कामे वेळेवर झाली नाहीत.सर्वत्र बजबजपुरी निर्माण…
निवृत्ती घुसेकर, राजेंद्र पाटील : तळागाळातील जनतेचा प्रामाणिक प्रतिनिधी, दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने पालघर व ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.गेली अनेक वर्षे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.आज त्यांच्या सायवान या गावी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हितचिंतक व मित्रांची गर्दी उसळणार आहे. सालाबादप्रमाणे त्यांचा वाढदिवस यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून वर आलेले राजेंद्र पाटील यांनी समाजकारण व राजकारणाची सांगड घालत राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संचालक मंडळी पण खूप काही शिकू शकलो. संचालकांना कृषी व सहकार क्षेत्राची जवळून ओळख…
बळीराम जाधव माजी खासदार, राजेंद्र पाटील ; सहकार क्षेत्रातील बहूआयामी नेतृत्व – माजी खा.जाधव, ऐन तारुण्यात राजकारणात प्रवेश करणारे दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष व जिवलग मित्र राजेंद्र पाटील यांनी सहकार क्षेत्रात जी बहुमोल कामगिरी केली,त्याला तोड नाही.आज त्यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने राज्यात मानाचे स्थान मिळवले आहे.समाजातील वंचित घटकांना आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून नवनवीन योजना सुरू केल्या.त्यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील चाळीस ते पन्नास हजार महिलांना रोजगार मिळू लागला.बचत गटांना कमी व्याज दराने अर्थसहाय्य मिळवून देण्याचा निर्णय अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी घेतला,त्यांचा हा निर्णय आदिवासी महिलांचे जीवन पार बदलून टाकणारे ठरले.अनेक…
दीपक मोहिते, वाढदिवस विशेष, राजेंद्र पाटील ; शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी, कृषी व सहकार क्षेत्रात नावारूपाला आलेले राजेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस.दरवर्षी त्यांचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विरार पूर्वेस ग्रामीण भागातील सायवन या गावात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळते.त्यामध्ये शेतकरी,आदिवासी मजूर,राजकीय नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व सहकार क्षेत्रातील मातब्बर मंडळींचा समावेश असतो. पाटील यांचे कुटुंब हे वर्षानुवर्षे सायवन या अतिदुर्गम भागात भातशेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत.त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक आवक माफक प्रमाणात असे,पण हे कुटुंब अत्यंत समाधानी होते.कुटुंबातील एक सदस्य राजेंद्र पाटील हे लहानपणापासून उत्साही व हुरहुन्नरी असे व्यक्तिमत्व होते.केवळ आपले नातेवाईक असलेले…
संजय लांडगे,वाडा वाडा भिवंडी मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, वाडा भिवंडी महामार्गावर पाहुनी पाडा येथे झालेल्या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला आहे. पाहूनीपाडा येथील गतीरोधका जवळ कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे कंटेनरवर बांधून ठेवलेला स्टेनलेस स्टीलचा रोल ड्रायव्हर केबिनवर येऊन पडला व केबिन पूर्णपणे चिरडली गेली. त्यामध्ये असलेला चालक विनोद कुमार सिंग ( वय ६५ ) रा.उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.या अपघातामुळे वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.त्यानंतर कंटेनर बाजूला काढण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली.
नाशिक प्रतिनिधी, संवेदनशीलता कायम ठेवत रुग्णसेवेला प्राधान्य द्या- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, नाशिक आरोग्य विज्ञान क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानामुळे सातत्याने बदल होत आहेत. हे तंत्रज्ञान आत्मसात करीत आणि स्वतःतील संवेदनशीलता कायम ठेवत भावी डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.राज्यातील शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी महिन्यातून किमान एक दिवस या डॉक्टरांनी सामान्य आणि गरजू रुग्णांना सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचा २४ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ.बी.एन.गंगाधर, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल…
अनिरुद्ध देशपांडे, वसई येथे जागर मराठीचा,कुसुमांजली व सप्रेम नमस्कार पत्र वाचन,कार्यक्रमाचे आयोजन, मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने साहित्य जल्लोष प्रतिष्ठान,समाज उन्नती मंडळ व मनोहर वाचनालय,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर मराठीचा… कुसुमांजली व सप्रेम नमस्कार पत्र वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुरुवातीला जागर मराठीचा… कुसुमांजली हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाची संहिता लेखन – स्व.भारती देशमुख यांनी लिहिली होती,त्याचे निवेदन निवेदिका – स्वाती जोशी करणार असून सुषमा राऊत,सारिका सावे,सीमा पाटील,सुरेखा धनावडे वीरेंद्र पाटील,मकरंद सावे हे सदर कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच स्वागतगीत सादरकर्ते – ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघ,वसई रोड मराठी अभिमान गीत सादरकर्ते साहित्य जल्लोष प्रतिष्ठान परिवार सदस्य आहेत.…
दीपक मोहिते, डॉ.निलम गोऱ्हे यांचे वक्तव्य : राजकीय बाजार गजबजला, एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.खा.संजय राऊत यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी,अशी मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.तर निलम गोऱ्हे यांच्यावर पलटवार करताना गोऱ्हे हे लक्षवेधी करण्यासाठी पैसे घेत होते,तर माजी महापौर विनायक पांडे यांनीही उमेदवारी मिळावी,म्हणून मी गोऱ्हे मॅडमना पैसे दिल्याचा थेट आरोप केला.त्यामुळे निलम गोऱ्हे या आता अडचणीत आल्या आहेत. निलम गोऱ्हे यांनी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात थेट मातोश्रीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.त्यानंतर राजकीय वातावरण तापले.खा.संजय राऊत,माजी महापौर पेडणेकर,माजी…
संदीप जाधव,बोईसर, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आचार्य नरेंद्र महाराजांच्या अनुयायांचा मोर्चा, जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अपमान केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या अनुयायांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वामीजींचा एकेरी उल्लेख करत साधू-संतांचा अपमान केला, असा संतप्रेमींकडून आरोप करण्यात येत आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो साधू-संतांच्या अनुयायांनी संताप व्यक्त करत, ” संतांचा अपमान सहन करणार नाही,” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.संतपरंपरेचा अवमान केल्याबद्दल विजय वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी,अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला. सदर मोर्चा चार रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय,…
दीपक मोहिते, ” आदिवासी ग्रामीण जीवन,” २८ फेब्रु.रोजी डहाणू तालुक्यात तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे ( मातीच्या रंगाचे संमेलन ) आयोजन, येत्या २८ फेब्रु.ते २ मार्च २०२५ दरम्यान पालघर जिल्ह्यातील गंजाड,बापूगाव व घोलवड या तीन गावात तीन दिवसीय भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे ( मातीच्या रंगाचे संमेलन )आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात येथील कला व ऐतिहासिक वारसा याचे दर्शन घडवण्यात येणार आहे. राज्याच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याची संस्कृती,गावांची स्थित्यंतरे,सांस्कृतिक वारसा,विविध जाती-जमातीमधील एकोपा,कला व जीवनशैली लोकासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. * बापूगाव व गंजाड येथे वारली पेंटिंग,यामध्ये स्थानिक आदिवासी कलावंत आपल्या पेंटिंग सादर करणार आहेत. * त्यानंतर…
