संजय लांडगे,वाडा
वाडा भिवंडी मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू,
वाडा भिवंडी महामार्गावर पाहुनी पाडा येथे झालेल्या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला आहे.
पाहूनीपाडा येथील गतीरोधका जवळ कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे कंटेनरवर बांधून ठेवलेला स्टेनलेस स्टीलचा रोल ड्रायव्हर केबिनवर येऊन पडला व केबिन पूर्णपणे चिरडली गेली. त्यामध्ये असलेला चालक विनोद कुमार सिंग ( वय ६५ ) रा.उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.या अपघातामुळे वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.त्यानंतर कंटेनर बाजूला काढण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली.

