दीपक मोहिते,
डॉ.निलम गोऱ्हे यांचे वक्तव्य : राजकीय बाजार गजबजला,
एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.खा.संजय राऊत यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी,अशी मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.तर निलम गोऱ्हे यांच्यावर पलटवार करताना गोऱ्हे हे लक्षवेधी करण्यासाठी पैसे घेत होते,तर माजी महापौर विनायक पांडे यांनीही उमेदवारी मिळावी,म्हणून मी गोऱ्हे मॅडमना पैसे दिल्याचा थेट आरोप केला.त्यामुळे निलम गोऱ्हे या आता अडचणीत आल्या आहेत.
निलम गोऱ्हे यांनी
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात थेट मातोश्रीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.त्यानंतर राजकीय वातावरण तापले.खा.संजय राऊत,माजी महापौर पेडणेकर,माजी खा.विनायक राऊत व अन्य सेना नेत्यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली.काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याप्रकरणी खा.संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर आज निलम गोऱ्हे प्रकरणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या शरद पवार व संमेलनाध्यक्ष असलेल्या ताराबाई भवाळकर या दोघांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी खा. राऊत मागणी केली आहे.मात्र पवार व भवाळकर या दोघांनी याविषयी अद्याप तोंडातून शब्द काढलेला नाही.त्यामुळे राज्याच्या अनेक शहरात शिवसेनेने ( उबाठा ) निलम गोऱ्हे यांच्या निषेधार्थ ” जोडो मारो,” छेडले आहे.खा.राऊत यांनी निलम गोऱ्हे या लक्षवेधी करण्यासाठी पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला.हवं तर माझ्यावर हक्कभंग आणा,पण त्या पैसे लक्षवेधी करण्यासाठी पैसे घेत असत,याचा त्यांनी पुनरुच्चार केला.त्यामुळे आणखी काही दिवस आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

