अनिरुद्ध देशपांडे,
वसई येथे जागर मराठीचा,कुसुमांजली व सप्रेम नमस्कार पत्र वाचन,कार्यक्रमाचे आयोजन,
मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने साहित्य जल्लोष प्रतिष्ठान,समाज उन्नती मंडळ व मनोहर वाचनालय,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जागर मराठीचा… कुसुमांजली व सप्रेम नमस्कार पत्र वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सुरुवातीला जागर मराठीचा… कुसुमांजली हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाची संहिता लेखन – स्व.भारती देशमुख यांनी लिहिली होती,त्याचे निवेदन निवेदिका – स्वाती जोशी करणार असून सुषमा राऊत,सारिका सावे,सीमा पाटील,सुरेखा धनावडे वीरेंद्र पाटील,मकरंद सावे हे सदर कार्यक्रम सादर करणार आहेत.
तसेच स्वागतगीत सादरकर्ते – ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघ,वसई रोड मराठी अभिमान गीत सादरकर्ते साहित्य जल्लोष प्रतिष्ठान परिवार सदस्य आहेत.
याच कार्यक्रमात प्रदीर्घ, मनमोकळी,विनोदाचा शिडकावा असणारी आणि पुढील कामाचं किंवा लेखनाचं सूतोवाच करणारी असंख्य पत्रं राजहंसी प्रकाशक दिलीप माजगावकर यांनी लिहिली असून अभिजात मराठी भाषेतील या पत्रांमधून आपल्याला लेखक समजतो,तसाच पत्रलेखकही समजत जातो. ” या ” हृदयीचे त्या हृदयी, ” घातले असा चिंतनशील,भावगर्भ पत्रसंवाद म्हणजे,
” सप्रेम नमस्कार, ” सादरकर्ते प्रसिद्ध अभिनेत्री – सोनाली कुलकर्णी / रंगकर्मी- कुणाल रेगे असून हा कार्यक्रम गुरू.२७ फेब्रु.२०२५ रोजी सायं. ४.३० ते ७.०० स्थळ – समाज उन्नती मंडळ,माणिकपूर,वसई ( प.) येथे सम्पन्न होणार असल्याचे आयोजकातर्फे सांगण्यात आले.

