- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” हिंदीतुनच बोला,” अशी सक्ती करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज… काल राज्यभरात मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.या दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपक्रम राबवण्यात आले.शासकीय स्तरावर मात्र उदासीनताच पाहायला मिळाली.राज्याच्या शासकीय कामकाजात १ मे १९८५ पासून मराठी भाषेचा वापर करणे,अनिवार्य करण्यात आले आहे.त्यानुसार काही किरकोळ अपवाद वगळता मराठी भाषेचा १०० % वापर करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते,असे असतानाही राज्यात मराठी भाषा आम्ही का म्हणून बोलावी ? असा प्रश्न विचारणारे महाभाग जागोजागी पाहायला मिळत आहेत.अनेकदा यावरून हाणामाऱ्याही होत असतात.सध्या अशा घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळते. राज्य शासनाने कायदा केला,पण तो केवळ मराठी माणसानेच पाळायचा,असा…
विनीत चौधरी,बोर्डी, ” सांस्कृतिक वारशाचे जतन,” आजपासून डहाणू तालुक्यात ” पालघर महोत्सव,” डहाणू तालुक्यातील घोलवड,गंजाड व बापूगाव,या तीन गावामध्ये आजपासून तीन दिवसीय पालघर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील सांस्कृतिक वारशावर आधारीत पर्यटनाला चालना देण्यासाठी आजपासून २ मार्च दरम्यान तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.जिल्ह्यातील आदिवासी भागातील भूमीपुत्रांना सांस्कृतिक वारसा जपत पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करणे,असा उद्देश या महोत्सवाच्या मागे आहे.यापूर्वी वरील तीन गावात विविध गट स्थापन करून हस्तकला वस्तू,वारली चित्रकला व पारंपारिक वाद्ये तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.त्यांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात करण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांना तसेच अन्य महिलांना…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा, जव्हार येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ” मराठी भाषा गौरव दिना,” च्या निमित्ताने ” काव्यवाचन,” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विजय शिंदे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) उपस्थित होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर डोके ( जिल्हा परिषद शिक्षक, कवी, कथाकार ) उपस्थित होते.महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागगी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.मराठी विभाग प्रमुख डॉ.राहुल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक…
दीपक मोहिते, राज्याचे तापमान चढत्या कमानीवर : अनेक शहरे तापली, गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या किनारपट्टी भागात सध्या प्रचंड तापमान आणि दमटपणा वाढत आहे.मुंबईसह कोकणातील राज्यातील अनेक शहराच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून मुंबई,पालघर, ठाणे,रत्नागिरी,सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.फेब्रु. महिन्यातच या सर्व शहरांचे तापमान ३८ अंश सेल्सियसवर गेले आहे. नागरिक उन्हाच्या कडाक्याने हैराण झाले आहेत.आज राज्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली.मराठवाडा विदर्भात आज दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे अशक्य झाले होते.उत्तर महाराष्ट्रातही सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.दरम्यान येत्या तीन दिवसात राज्यातील अंतर्गत भागात २ ते ३ अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण…
संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड येथे जनता दरबाराचे आयोजन, विक्रमगड तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी खा.हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली आज विक्रमगड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत आज विक्रमगड तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी खा. डॉ.हेमंत सावरा यांच्या अध्यक्षतेखाली आज विक्रमगड येथील संत रोहिदास सभागृह जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.यावेळी या कार्यक्रमास विक्रमगडचे आ.हरिश्चंद्र भोये जिल्हा कृषी सभापती संदीप पावडे,सभापती यशवंत कनोजा,उपसभापती विनोद भोईर,तहसीलदार चारुशीला पवार,प्रांत अधिकारी,गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक,सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता, पाणीपुरवठा,आरोग्य, बँक,ग्रामसेवक तलाठी, कृषी,आदिवासी विकास महामंडळ,रोजगार हमी,पंचायत समिती विभाग,शिक्षण,या विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून विक्रमगड तालुक्याचा विकास, नागरिकांचे प्रश्न व समस्या ” जैसे थे,” स्थितीत…
सुरेश वैद्य सफाळे, देशाला आर्थिक् महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल – मत्स्यव्यवसायमंत्री राणे, वाढवण बंदर हा देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.हे बंदर,देशा आणि राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी राणे बोलत होते.या बैठकीस आ.राजेंद्र गावित,आ.विलास तरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदिप,मत्स्यव्यवसाय विभागाचे सहा.आयुक्त दिनेश पाटील,आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले,वाढवण बंदरामध्ये महाराष्ट्र शासनाचा २६ टक्के…
ऋतुजा तिरोडकर,हडपसर, पुणे बलात्कार : समस्त लाडक्या बहिणी भितीच्या सावटाखाली, बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर आता पुणे स्वारगेट येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाने राज्य हादरून गेले आहे.घटना घडून गेल्यानंतर आपल्या सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या होत असतात.या घटनेनंतरही असेच घडले.या घटनेतील नराधमाला हुडकून काढण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सक्रिय झाल्या आहेत.पण ज्या महिलेवर हा प्रसंग ओढवला,त्या महिलेचे पुढच्या आयुष्याचे काय ? जर अशा घटना घडत राहिल्या तर महिलांना एकटे दुकटे फिरायला नको… मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वारगेटसारख्या दिवसाचे २४ लोकांनी गजबजलेल्या एसटी आगारात त्या अबलेवर एकदा नाही तर दोन वेळा बलात्कार करतो,त्यावेळी त्या आगाराचे सुरक्षा रक्षक काय करत होते.आता…
सुरेश काटे,तलासरी तलासरी तालुक्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी, तलासरी तालुक्यातील दापचरी येथे असलेल्या कपिलेश्वर महादेव मंदिर व सुत्रकार येथील शिवमंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.महादेवाच्या पिंडीला पहाटे अभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी भक्ताची रीघ लागली. दापचरी दुग्ध प्रकल्पातील कपिलेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या,दापचरीत महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते.या जत्रेत या भागातील तसेच गुजरातमधील व्यापारी विविध प्रकारची दुकाने लाऊन आपला माल विक्रीसाठी ठेवत असतात,महाशिवरात्री ला तलासरी, डहाणू भागातील आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने येऊन दर्शना नंतर गरजेच्या वस्तू जत्रेत खरेदी करतात. दापचरीतील कपिलेश्वर महादेव मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे. या मंदिरात भागातील भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. महाशिवरात्री निमित्त येथे होणाऱ्या…
दीपक मोहिते, आज मराठी राजभाषा दिन,पण शासनस्तरावर मात्र उदासीनता, आज मराठी भाषा दिन असून तो दरवर्षी शासनस्तरावर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा हा दिन उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होता. पण दुर्देवाने तसं घडताना दिसत नाही.एकीकडे आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद जरूर आहे.पण दुसरीकडे मराठी भाषेची होत असलेली गळचेपी ही दुर्देवी तर आहेच पण मराठी मन व मराठी अस्मितेला क्लेशकारक ठरणारी आहे. मराठी माणसांवर हिंदी बोलण्याची जी सक्ती वारंवार होत असते, वेळप्रसंगी मारहाण होते.हे न्यायाला धरून नाही.पण आपले सरकार या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला तयार नाही.असो,” कोळसा कितीही उगाळला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता तुम्ही सत्तेत आहात,सरकारवर दबाव टाकून कामे करा,अधिकाऱ्यांना निवेदने कसली देता ? जुन्या मानसिकतेमधून आता बाहेर पडा .. विधानसभा निवडणुका होऊन जवळपास चार महिन्याचा काळ लोटला पण सरकारची गाडी अद्याप रुळावर आलेली नाही.आपले मायबाप सरकार सुरुवातीपासून लडखडत उभे आहे.मंत्रीपदे,खाती, पालकमंत्रीपदे वाटप इ.महत्वाची कामे हातावेगळी करताना सरकारची चांगलीच दमछाक झाली.पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही.राज्यस्तरावर सरकारची अशी तऱ्हा तर जिल्हा व तालुका स्तरावर अशीच परिस्थिती पाहायला मिळते.राज्याचे विविध क्षेत्राचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.फडणवीस सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी केवळ दोन विषयावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.विरोधी पक्षाच्या आमदारांची फोडाफोडी व दुसरे रस्त्याची कामे..या दोन विकासकामाशिवाय अन्य प्रश्नाकडे…
