सुरेश काटे,तलासरी
तलासरी तालुक्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी,
तलासरी तालुक्यातील दापचरी येथे असलेल्या कपिलेश्वर महादेव मंदिर व सुत्रकार येथील शिवमंदिरात महाशिवरात्री
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.महादेवाच्या पिंडीला पहाटे अभिषेक झाल्यानंतर
दर्शनासाठी भक्ताची रीघ लागली.
दापचरी दुग्ध प्रकल्पातील कपिलेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी
भक्तांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या,दापचरीत महाशिवरात्री
निमित्त मोठी जत्रा भरते.या जत्रेत या भागातील तसेच गुजरातमधील व्यापारी
विविध प्रकारची दुकाने लाऊन आपला माल विक्रीसाठी ठेवत असतात,महाशिवरात्री
ला तलासरी, डहाणू भागातील आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने येऊन दर्शना
नंतर गरजेच्या वस्तू जत्रेत खरेदी करतात.
दापचरीतील कपिलेश्वर महादेव मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे.
या मंदिरात भागातील भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. महाशिवरात्री निमित्त येथे
होणाऱ्या जत्रेचे नियोजन नवयुवक सांस्कृतिक मंडळाचे
कार्यकर्ते करतात,तसेच मंडळातर्फे दापचरीत क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात
येतात.त्यामध्ये कब्बडी,खो खो,व्हॉलीबॉल,इ.खेळासोबत महिलासाठीही
विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

