Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, विकास करताना स्थानिकांचा आधी विचार झाला पाहिजे-निवृत्त न्या.गोखले, कुठल्याही प्रदेशात विकास करताना स्थानिक जनता,संस्कृती आणि त्यांच्या मूलभूत गरजांचा विचार केला पाहिजे.शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे सुराज्य स्थापन करताना आधी रयतेच्या अशा हिताचा विचार केला होता.अशाप्रकारचे सुराज्य स्थापन करण्यासाठी जी निवडक मंडळी धडपडत आहेत,त्यापैकी मनवेल तुस्कानो एक आहेत. जनहिताचे प्रश्न बाजूला सारून कुठल्याही मार्गाने सत्तेवर राहण्यासाठी सत्तांतर,पक्षफोडी अशा कुरापतींना प्राधान्य देण्याची पद्धत रूढ होत असताना तत्त्वासाठी लढणारे माणूसप्रेमी व साधे सरळ आयुष्य जगणारी माणसं आता दुरापास्त होत आहेत. विरार पश्चिमेस नंदाखाल गावी काल संपन्न झालेल्या मनवेल तुस्कानो अमृतमहोत्सवी गौरव सोहळा समिती आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून सभेला…

Read More

संजय नेवे,विक्रमगड भाताचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आज तहसील कार्यालयात आंदोलन, तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या आधारभुत भातखरेदी केंद्रावर शेतकरी वर्गाने विक्री केलेल्या व महामंडळाने खरेदी केलेल्या भाताच्या रक्कमेपासुन अनेक शेतकरी वंचित राहीले आहेत सुमारे नऊशेहुन अधिक शेतकऱ्यांची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही,याविरोधात आज शेतकरी तेजस भोईर यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदार कार्यालयासमोर न्याय मागण्याकरीता उपोषणास बसले होते. जोपर्यत न्याय मिळत नाही,तोपर्यत हे उपोषण चालुच राहील,असे यावेळी शेतकरी शिष्ठमंडळाने सांगितले.त्यामुळे रिजनल अधिकारी योगेश पाटील यांनी शेतक-यांच्या शिष्ठमंडळाशी समक्ष चर्चा करुन येत्या २६ फेब्रु.पर्यत शेतक-यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील,असे लेखी अश्वासन दिल्यांनतर सदर उपोषण शेतक-यांनी मागे घेतले.मात्र दिलेल्या मुदतीत…

Read More

विरार येथे वार्षिक कला उदघाटनाचा सोहळा संपन्न, विरार येथील विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधील विद्यार्थ्यांनी सुरेख काम करत देशातील अत्यंत जुन्या संस्थेची बरोबरीच केली आहे, असे उदगार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व निर्माता रवि जाधव यांनी अतिथी म्हणून मुलांना मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात काढले.रवि जाधव यांच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर तसेच मार्गदर्शक राजू वनमाळी,अनिल ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे विवा इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट,या विरार पूर्व,शिरगाव येथील कला महाविद्यालयात २०१० साली बी.एफ.ए.या पदवी अभ्यासक्रमात अप्लाइड आर्ट व पेंटिंग हे दोन विषय…

Read More

वसंत भोईर,वाडा ऑनलाइन पीक पाणी न झालेले शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी करण्याची मागणी, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते.यावेळी सुमारे विविध विभागांचे सातशे एकोणचाळीस तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी वाडा तालुक्यातील विविध समस्यांबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदने सादर केली आहेत.आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी केली जाते.यासाठी ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.मात्र अनेक शेतकऱ्यांकडून तांत्रिक कारणांमुळे पीक पाहणी करण्यात आलेली नाही.अशा शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडून ऑफलाइन पद्धतीने पिक पाहणी सातबारा उतारावर केली आहे.पण या शेतकऱ्यांची धान (…

Read More

संजय नेवे,विक्रमगड तलवाडा विक्रमगड मार्गावर मालवाहु ट्रकचा भिषण अपघात, वाहनचालकाचा मृत्यू, विकमगड…तलवाडा-सेलवाल येथिल कंपनीतुन लोखंडी ब्लेड घेवुन मालहु ट्रक वाडा येथील कंपनीत जात असतांना तलवाडा-विक्रमगड मार्गावरील दादडे गावानजीक ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक वळणावर असलेल्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाला धडकला.या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे ट्रकचालक बिपीन राधेश्याम राय रा.खानवेल याला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यु झाला. हा अपघात वइतका भिषण होता की ट्रकच्या केबीनचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.त्यामुळे वाहनांचा फिटनेस तसेच जुन्या झालेल्या ट्रकचा आरटीओ विभागाकडुन तपासला जातोय की नाही,असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरसंघचालक भागवत यांचे नथीतून तीर मारणे सुरूच… महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( अजित पवार ) अनेक नेत्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी एकामागोमाग उजागर होत असल्यामुळे भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चांगलीच आगपाखड केली आहे. पक्षाचे धनंजय मुंडे हे अडचणीत आले असताना त्यांचे कृषीमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे देखील आता जेलची हवा खाण्याच्या तयारीत आहेत.अजित पवार गटात स्वतः अजित पवार,धनंजय मुंडे,माणिकराव कोकाटे,हसन मुश्रीफ,या चार वरिष्ठ मंत्र्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,माजी मंत्री छगन भुजबळ,नबाब मलिक व खा.प्रफुल्ल पटेल,असे एकूण आठ जण भ्रष्टाचार प्रकरणी वादग्रस्त ठरले आहेत.या लोकांमुळे आपल्या पक्षाच्या प्रतिमेला तडा गेल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.…

Read More

सुरेश वैद्य,सफाळे, सफाळे गांव : पालकमंत्र्यांनी नियोजित विकास आराखडा तयार करावा, पश्चिम रेल्वेवर असलेल्या सफाळे गांवात गेल्या काही वर्षात नागरिकरणाला प्रचंड वेग आला असून या गावाच्या लोकसंख्येचा वेलू आता गगनावर पोहोचला आहे. नागरिकरणाचा वेग लक्षात घेऊन जिल्हाप्रशासनाने या गावातील नागरी समस्या वेगाने मार्गी लावण्याची गरज आहे.त्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालण्याची नितांत गरज आहे. वेगळा पालघर जिल्हा व उपनगरीय रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर सफाळे ते डहाणू दरम्यान असलेल्या अनेक गावाची लोकसंख्या चढत्या कमानीवर आरुढ झाल्या.त्यामध्ये सफाळे या गावाचाही समावेश आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकाचे गांव,अशी जी ओळख या गावाची होती,ती हळूहळू पुसली गेली.तालुक्यातील अनेक गावांची वाटचाल शहराच्या दिशेने सुरु…

Read More

संजय लांडगे,वाडा सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी गजानन काशिद यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन सामाजिक कार्यकर्ते संजय काशिद यांचे वडील,वाडा पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी गजानन काशिद यांचे त्यांच्या राहत्या घरी आंबिस्ते ( खुर्द ) येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दोन दिवसापूर्वी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यात ग्रामविस्तार अधिकारी म्हणून काम केले आहे. ते अत्यंत शांत,संयमी,प्रेमळ, मितभाषी,अजातशत्रू, मनमिळावू व संवेदनशील व्यक्तिमत्व होते.त्यांच्या पश्चात शोकाकुल पत्नी कमळ काशिद,मुलगा संजय काशिद, मुलगी भारती जाधव,मुलगा राजू काशिद,मुलगा कुंदन काशिद,सुना,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीला ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, शासकीय अधिकारी,कर्मचारी,…

Read More

दीपक मोहिते, येणाऱ्या काळात लाखभर ” लाडक्या बहिणी,” होणार ” सावत्र बहिणी,” विधानसभा निवडणूका संपल्यानंतर राज्य सरकार विविध जाचक अटी व कडक निर्बंध लादून लाडक्या बहिणी योजनेचा गळा घोटू पाहत आहे.या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीला सुमारे ४५० कोटी रु.चुना लागल्याचे स्पष्ट झाले आहे.ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवणे, अशक्यप्राय असल्याचे दिसून आल्यामुळे राज्य सरकार आता वेगाने कामाला लागले आहे.गेल्या महिनाभरात सरकारने योजनेचे निकष बदलल्यामुळे सुमारे ९ लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर फेकल्या गेल्या.सध्या या योजनेचा फायदा २ लाख ३ हजार महिलांना देण्यात येत आहे.ही संख्या निम्यावर आणण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न आहे. महिलांच्या मतांवर डोळा ठेवून महायुती सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या ” लाडली…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ज्या अधिकाऱ्यांना प्रमाणिकपणे काम करायचे नाही,त्यांनी स्वयंखुशीने निघून जावे – पालकमंत्री नाईक, काल पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. अपेक्षेनुसार या जनता दरबाराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या दरबारात सुमारे साडेसातशे निवेदने दाखल झाली.त्यापैकी ३५ ते ४० निवेदने निकाली काढण्यात आली.आलेल्या एकूण तक्रारीपैकी ५ % प्रकरणाचा निपटारा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.उर्वरित तक्रार अर्जावर संबंधित विभागाकडून खुलासा मागवण्यात येणार आहे.संबंधित विभागाकडून खुलासे आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.पण या जनता दरबारामध्ये नाईक यांनी प्रशासकीय व लोकांच्या समस्या/ अडचणी सोडवण्यासंदर्भात अधिकाऱ्याकडून होणारी दिरंगाई व…

Read More