संजय नेवे,विक्रमगड
भाताचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आज तहसील कार्यालयात आंदोलन,
तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या आधारभुत भातखरेदी केंद्रावर शेतकरी वर्गाने विक्री केलेल्या व महामंडळाने खरेदी केलेल्या भाताच्या रक्कमेपासुन अनेक शेतकरी वंचित राहीले आहेत सुमारे नऊशेहुन अधिक शेतकऱ्यांची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही,याविरोधात आज शेतकरी तेजस भोईर यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदार कार्यालयासमोर न्याय मागण्याकरीता उपोषणास बसले होते.
जोपर्यत न्याय मिळत नाही,तोपर्यत हे उपोषण चालुच राहील,असे यावेळी शेतकरी शिष्ठमंडळाने सांगितले.त्यामुळे रिजनल अधिकारी योगेश पाटील यांनी शेतक-यांच्या शिष्ठमंडळाशी समक्ष चर्चा करुन येत्या २६ फेब्रु.पर्यत शेतक-यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील,असे लेखी अश्वासन दिल्यांनतर सदर उपोषण शेतक-यांनी मागे घेतले.मात्र दिलेल्या मुदतीत जर पैसे जमा केले गेले नाहीतर भाताच्या वाहनासह रस्त्यावर उतरुन रास्ता रोको करण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेतक-यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा,यासाठी शासनाने ही आधारभुत खरेदी योजना चालु केली,परंतु खरेदीकेद्रावर दिलेल्या मालाची रक्कम मिळविण्याकरीता उपोषण करावे लागते,ही गंभीर बाब आहे.
आधारभुत धान खरेदी योजने अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील आता पर्यत नऊशेहुन अधिक शेतकऱ्यांनी आपल्या भाताची विक्री केली असुन अर्जुन पर्यंत त्यांना भात विक्री केलेल्या भाताचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी आर्थीक दृष्ट्या अडचणीत आले आहेत.त्यामुळे महामंडळाने भात खरेदी केला असून ताबडतोब शेतकऱ्यांना पैसे देण्यात यावे यासाठीचे आंदोलन करण्यात आले होते.
प्रतिक्रिया-
उपलब्ध निधीप्रमाणे तेवढया शेतक.यांना रक्कम अदा केली गेली आहे,अनेक शेत.यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत त्या तपासणी करुन येत्या २६ फेब्रु.पर्यत रक्कम अदा करण्यात येईल.
– योगेश पाटील रिजनल अधिकारी आदिवासी विकास महामंडळ

