Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा शेतकऱ्यांच्या भाताचे पैसे तत्काळ बँकेत जमा करा अन्यथा आक्रोश आंदोलन छेडणार – ज्योतीताई ठाकरे आदिवासी विकास महामंडळाने घेतलेल्या भाताचे पैसे हे केवळ प्रशासनातील पदाधिकारी अधिकारी यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने हे पैसे रखडले आहेत.त्यांच्या या मनमानी कारभाराचा फटका ऐन होळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बसला आहे.येत्या २० मार्चपर्यंत शेतकऱ्यांना भाताचे पैसे मिळाले नाही तर शिवसेना आक्रोश आंदोलन छेडून शेतकऱ्यांचे पैसे मिळवणार असल्याचे यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी बोलताना सांगितले. आज तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले.शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदार कार्यालय परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता.वाड्याचे…

Read More

शुभम सावंत,विरार वसई विरार शहर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनाची उच्चस्तरीय समितीद्वारा चौकशी होणार, वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाचा घोटाळा आ.राजेंद्र गावित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे. संबंधित मंत्रीमहोदयांनी उच्च समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल,असे आश्वासन दिले आहे. यावेळी आ.गावित म्हणाले की,वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन संबंधित २४ कोटी ६४ लाख रु.चा गैरव्यवहार झाला असल्याची माहिती आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली.यामध्ये भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे लेखापाल ( ऑडिट-१ ) महाराष्ट्र यांच्याकडील परीक्षण अहवालात उक्त प्रकल्पाचा कोणताही उपयोग न होता २४ कोटी ६४ लाख खर्च केला गेला असल्याचे उघडकीस आले आहे.सदर प्रकल्प फसल्यामुळे हरित लवादाने…

Read More

संजय लांडगे,वाडा महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वाड्यात भव्य रॅली बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका शाखा व वाडा तालुक्यातील बौद्ध समाजातर्फे आज वाडा येथील खंडेश्वरीनाका येथून तहसिल कार्यालयावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह संपुर्ण देशभरातील बौद्ध समाजाचे बिहार राज्यातील पवित्र बोधगया महाबोधी महाविहार हे आस्थेचे व श्रद्धेचे स्थान आहे.परंतु सध्या अस्तित्वात असलेला बोधगया मंदिर अधिनियम १९४९ हा कायदा भारतीय संविधानातील अनुच्छेद १३,२५ आणि २६ मध्ये दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्य व संस्थात्मक व्यवस्थापनेच्या मुलभूत अधिकारांचे सरळसरळ उल्लंघन करतो. महाबोधी महाविहार हे केवळ बौद्ध समाजाचे धार्मिक व ऐतिहासिक वारसास्थळच नसून,संपूर्ण जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान आहे,असे असतांना बौद्ध…

Read More

सचिन परब,विरार करवाढ मागे घ्या,अन्यथा तीव्र आंदोलन- मनसेचा इशारा वसई-विरार शहर महानगरपालिकेने वर्ष २०२५-२६ या वित्तीयवर्षात पाणीपट्टी २५ टक्के,मालमत्ता करात ५-७ टक्के वाढ जाहीर केली आहे.पालिकेने केलेल्या या करवाढीविरोधात वसईत संतापाची लाट उसळली आहे. पालिकेच्या करवाढी विरोधात वसईतील राजकीय व सामाजिक वातावरण तापत चालले असून वसईत जनआंदोलन होण्याची शक्यता आहे. आज मनसेनेही मनपाच्या करवाढ विरोधी आंदोलनात उडी घेतल्याने या आंदोलनाला अधिक बळकटी मिळाली आहे.मनसे नेते अविनाश जाधव,वसई विरार अध्यक्ष प्रविण भोईर यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले.या निवेदनात सामान्यांच्या माथी मारलेली करवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात…

Read More

मनिष म्हात्रे,वसई चौथ्या राज्यस्तरीय शुटींगबाॅल स्पर्धेत टेंभुर्णी,सोलापूर संघ अंतिम विजेता, वस‌ईतील रंजन क्रीडा मंडळ, देवाळेतर्फे ८ मार्च रोजी चौथी कै.मनिष वर्तक स्मृती चषक भव्य राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा पार पडली. राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत राज्यातील अनेक दिग्गज संघ उतरले होते.त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण २४ नामवंत संघाचा समावेश होता.या स्पर्धेत टेंभुर्णी,सोलापूर संघाने आपला दबदबा सुरुवातीपासुन कायम ठेवला,तर मालेगाव संघ उपविजेता ठरला. या शूटिंग बॉल स्पर्धेच्या उद्घाटनास पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सुदेश चौधरी,बसीन कॅथोलिक बॕकेचे संचालक ओनिल आल्मेडा,सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ वसईचे अध्यक्ष नरेंद्र राऊत,कार्यकारी विश्वस्त सुरेश वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास वसई विकास सहकारी बँकेचे संचालक अवनीश वर्तक,समाज…

Read More

मनिष म्हात्रे,वसई शिवसेना ( उबाठा ) महिला आघाडीतर्फे महायुती सरकारचा जाहीर निषेध, विधानसभा निवडणूकीत महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या मतांवर डोळा ठेऊन लाडकी बहिण योजनेत ६०० रु.ने वाढ करून २१०० रु देणार असे आश्वासन देत सत्ता मिळवली.आता त्याच बहिणींचा १५०० रु. चा हप्ता रडत खडत देणा-या सरकारचा शिवसेना ( उबाठा ) पालघर जिल्हा महिला आघाडीने आज जोरदार निषेध केला. वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे,अशा महिलांच्या उन्नतीसाठी दरमहा १५००/ रु.अशी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचे मानधन १५०० रु.वरून २१००/ रु. करण्याचे जाहीर आश्वासन दिले.आणि त्यांच्या मतांवर सत्ताही मिळवली,पण प्रत्यक्षात गेले दोन महिने लाडक्या बहिणींचे मानधन…

Read More

सुशील भोईर,वसई पूर्व कामण येथे सिद्धार्थ फाउंडेशनतर्फे कॅन्सर निदान शिबीर संपन्न, कामण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सिद्धार्थ फॉउंडेशन व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने काल कॅन्सर निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. बदलत्या जीवनशैलीमुळे व भेसळयुक्त खाण्याच्या पदार्थामुळे कॅन्सरचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत आहे. कॅन्सरमुळे मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. सिद्धार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कामण ग्रामपंचायतचे माजी सरपंच ऍड.दिनेश हरेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये मौखिक कॅन्सर तसेच स्त्रीरोग तज्ञाकडून स्त्रियांमध्ये आढळणारा स्तन व गर्भाशाय कॅन्सरची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये एकूण साठ लोकांची तपासणी झाली. यामध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. सदर शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, पालघर जिल्ह्यातील रोजगार हमीच्या कामावरील मजुरांना वेळेवर मजुरी मिळावी, पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून,येथे मोठ्या प्रमाणावर मजूर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार मिळवतात.मात्र मजुरांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात खा.डॉ.हेमंत विष्णु सवरा यांनी संसदेत सरकारला प्रश्न विचारला की, “ पालघर जिल्ह्यातील मजुरांना वेळेवर वेतन मिळावे,यासाठी सरकार कोणत्या ठोस उपाययोजना करत आहे ?,” यावर उत्तर देताना संबंधित विभागाच्या मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले की, “ १०० दिवसांची मजुरी वेळेवर देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.” मागील सरकारच्या कार्यकाळात,२०१३ – १४ मध्ये मजुरांना तब्बल ९ महिने मजुरी…

Read More

सुरेश वैद्य,सफाळे, पालघर जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज जिल्हा परिषद पालघर येथे साजरी करण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज जिल्हा परिषद पालघर येथे साजरी करण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,प्रकल्प संचालक ( जलजीवन मिशन ) अतुल पारसकर,जिल्हा कृषी विकास…

Read More

वसंत भोईर, वाडा हक्काच्या पैशासाठी बळीराजाची फरपट सुरू,आज आंदोलन होणार, आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या भाताचे पैसे शेतकऱ्यांना तीन महिन्यानंतरही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आला आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या भाताचे पैसे तातडीने मिळावेत या मागणीसाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज वाडा तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख निलेश पाटील यांनी दिली. भात पीक लागवडीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे.३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांकडून बँक शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ केले जाते.त्यामुळे ही रक्कम ३१ मार्च पूर्वी, मिळणे गरजेचे आहे.मात्र काही कारणांमुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शासनाने ३१ मार्चपर्यंत भात विक्रीची…

Read More