- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, टिवरी ग्रामपंचायतीचा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम मशीनवर उपस्थित झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर वसईतील टिवरी ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेत आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.टिवरी ग्रामपंचायत ही पालघर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे, ज्यांनी इव्हीएमला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. टीवरी ग्रामपंचायतीची २० डिसें.रोजी झालेली ग्रामसभा हा ठराव मंजूर करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. या सभेचे अध्यक्षपद उपसरपंच नुतनकुमार भोईर यांनी भूषवले तर माजी उपसरपंच नंदकुमार चौधरी हे या ठरावाचे सूचक होते.ग्रामस्थांनी एकमताने इव्हीएम हटावचा नारा दिला आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मतदान घेण्याचे ठरवले.या ऐतिहासिक ठरावाला गावचे पोलीस पाटील अजित भोईर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अशा पाहणीतून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला हवं, मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर काही कॅबिनेट मंत्री झाडून पुसून कामाला लागल्याचे चित्र विविध वृत्तवाहिनीवर पाहायला मिळाले.अनेक मंत्र्यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या विभागांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.ही पाहणी करताना मंत्रीमहोदय नजरेस आलेल्या गैरप्रकाराबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांना झापायला देखील विसरत नाहीत.चांगली गोष्ट आहे,कारण अधिकारीवर्गाला अनागोंदी कारभाराबद्दल फैलावर घेतलेच पाहिजे.पण त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला हवं.अन्यथा मंत्र्यांची पाठ फिरली की पुन्हा ” ये रे माझ्या मागल्या,” तसं झाल्यास मंत्र्यांची ही कृती ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” असे होईल.त्यामुळे या मोहिमेतून काहीतरी चांगलं निर्माण होईल,व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होईल,अधिकारीवर्ग झाडून कामाला लागतील,अशी…
दीपक मोहिते, ” अजातशत्रू,” अटलबिहारी वाजपेयी ; सृजनशील मनाचा सुधारणावादी नेता, भाजपचे थोर नेते,विचारवंत व देशाचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज शंभरावी जयंती आहे.त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत तीनवेळा पंतप्रधानपद भूषवले.१९९६,१९९८ व १९९९,असे तीन वेळा ते पंतप्रधान झाले.प्रखर राष्ट्रवादी,पत्रकार,साहित्यिक व यशस्वी राजकारणी, अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली.खासदार म्हणून त्यांनी चाळीस वर्षे संसदेत त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. आजीवन अविवाहित राहून त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशभर प्रचार केला.१९९९ साली त्यांनी २४ राजकीय पक्षाची एकत्रित मोट बांधत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली.त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्यरत असताना ११ व १३ मे १९९८ दरम्यान पोखरण येथे पाच अणुस्फोट करून भारत अणुशक्ती…
दीपक मोहिते, ” राज्याची अधोगती,” संतोष देशमुख हत्या ; आपल्या लाडक्या बहिणीचे कुंकू पुसणाऱ्याना नियती सोडणार नाही, राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे बीड जिल्ह्याची ओळख,” गुन्हेगारीचा जिल्हा,” अशी झाली आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारीची प्रकरणे एकामागोमाग बाहेर येत असूनही आपले मायबाप सरकार जागे व्हायला तयार नाही.त्यांच्याच पक्षाचे आ.सुरेश धस यांनी सरकारची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली आहेत.पण सरकार त्यातून काही बोध घ्यायला तयार नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत,त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.त्यांनी ही मागणी करताना मुंडे यांचे वाल्मिक कराड यांचे एकमेकांशी कसे घनिष्ट संबंध आहेत,हे पुराव्यानिशी दाखवून दिले,पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत.फडणवीस हे दररोज…
जव्हार,प्रतिनिधी, जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, महाराष्ट्र शासन राज्य पेसा कक्ष पुणे,ग्रामविकास व पंचायतराज विभाग,जिल्हा परिषद पालघर,पंचायत समिती जव्हार पेसा कक्ष आणि ग्रामपंचायत कासटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज पेसा कायद्याच्या निर्मितीला २८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे आणि लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या हस्ते झाले.धरतीआबा भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उदघाटन सोहळा पार पडला.यावेळी पंचायत समिती जव्हारचे सहा.गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मनोहर…
सुरेश काटे,तलासरी, जीवनात शिस्तीसोबत सामाजिक शिस्तही महत्वाची – सत्यम गांधी, ज्ञानमाता संस्थेच्या झरी शाळेचा पालक दिन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा काल प्रमुख पाहूणे सत्यम गांधी प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास,डहाणू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात सत्यम गांधी यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली व पालकांनी हा कार्यक्रम केवळ मनोरंजन म्हणून न घेता त्यातील सामाजिक बोधही समजून घ्यावा.तसेच प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या पाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.विद्याथ्यांनो, जीवनात शिस्ती बरोबरच सामाजिक शिस्तही स्वतःला लावणे गरजेचे आहे.मुलींना खूप शिकवा,असा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक फा.निलम लोपीस, झरी गावच्या सरपंच सीना ठाकरे,शाळेच्या प्राचार्या सि. बस्तियान फर्नांडीस व मोठया संख्येने पालक आणि विद्यार्थी…
दिपक मोहिते, लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, वनविभागातील आणखी एक बडा अधिकारी आज लाचलुचपत विभागाने रचलेल्या जाळ्यात अडकला.संदीप तुकाराम चौरे,असे या वनअधिकाऱ्याचे नावं असून तो वनविभागाच्या मांडवी कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत होता.जप्त मिळकतीचा वस्तुस्थितीदर्शक अहवालाचा कागदोपत्री मोबदला म्हणून चौरे याने तक्रारदाराकडून २० लाख रु.च्या लाचेची मागणी केली होती.त्यापैकी १० लाखाची लाच स्विकारताना लाचखोर चौरे एसीबीच्या जाळ्यात सापडला.या कारवाईत एसीबीने चंद्रकांत पाटील व अन्य एका अनोळखी इसमालाही ताब्यात घेतले आहे.यापूर्वीही एसीबीने लाचखोरी प्रकरणात वसईतून वनविभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली होती.या पार्श्वभुमीवर वनविभाग लाचखोरीच्या दलदलीत रुतल्याचे स्पष्ट होत आहे. वसई तालुक्यातील गाव ससुनवघर हद्दीत ” विस्तारित सासुपाडा,” गावठाण या ठिकाणी…
दीपक मोहिते, नंडोरे ग्रामपंचायततर्फे पेसा दिन साजरा, आज नंडोरे ग्रामपंचायत मार्फत पेसा दिन साजरा करण्यात आला.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर,सरपंच सोनल घोडके,पेसा अध्यक्ष सुरेंद्र सांबरे,अशोक जाधव,पंचायत समिती सदस्य सीमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. पेसा दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने २४ डिसें.हा दिवस पेसा दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायत मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आले होते.त्यानुसार जिल्ह्यात पेसा ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिन…
वसंत भोईर,वाडा, उद्घाटन होऊन दहा दिवस लोटले तरी धान खरेदी केंद्र अद्याप बंदच, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी विक्री आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत असते.या केंद्रांचे उद्घाटन गेल्या शनिवार १४ डिसें.रोजी आमदारांच्या उपस्थितीत पार पडले.उद्घाटन होऊन दहा दिवस लाटले तरी या धान खरेदी विक्री केंद्रावर अजून भातखरेदी सुरू झालेली नाही.तसेच बारदानही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.बारदानशिवाय भात विक्री केंद्रावर भात घेतले जात नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी गेल्या कित्येक दिवसापासून बारदानासाठी धान खरेदी केंद्रावर हेलपाटे मारत आहेत.केंद्रचालक मात्र त्यांना जुने फाटलेले बारदान घेऊन जाण्यास सांगत आहेत. नवीन बारदाने येण्याची शक्यता नाही,त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला…
दीपक मोहिते, २६ डिसें.पासून ३५ वा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव २०२४ ला सुरुवात, वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिक यांच्या कला व क्रीडागुणांना वाव मिळावा व त्यांना कला व क्रीडा क्षेत्रात एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन व स्पर्धात्मक संधी देण्याच्या हेतूने वसईत दरवर्षी होणारा, वसई तालुका कला क्रीडा महोत्सव गुरु.२६ डिसें.२०२४ ते मंगळ.३१ डिसें.२०२४ या कालावधीत संपन्न होत आहे. यंदाचे कला क्रीडा महोत्सवाचे हे ३५ वे वर्ष आहे.सन १९९० मध्ये लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाप्रमाणे ३५०० स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेल्या महोत्सवात या वर्षी कला व क्रीडा विभागात एकूण ५५ हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला…
