- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, सूर्यातीर, पर्यटनवाढीसाठी जोमाने प्रयत्न हवेत, दरवर्षी राज्य व केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करत असते.मात्र इतर देशांच्या तुलनेत आपले पर्यटनक्षेत्र गेल्या सात दशकात वाढू शकले नाही.गेल्या ७७ वर्षात पर्यटनवाढीसाठी हजारो कोटी रु.च्या तरतुदी करण्यात आल्या.पण अजूनही आपल्या पर्यटनक्षेत्राला सुगीचे दिवस येऊ शकले नाही. ज्या कोकण परिसराला आपण कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहतो,तो कोकण आजही उपेक्षितच आहे.अस का घडलं ? तर या प्रश्नाचं उत्तर आहे,नोकरशाहीचा करंटेपणा व लोकप्रतिनिधींची उदासीनता होय.आपल्या राज्यात कोकण,प.महाराष्ट्र,विदर्भ व उ.महाराष्ट्र या उपविभागात अनेक पर्यटनस्थळे असून ते विकसित करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळात प्रभावीपणे विकासकामे झाली नाहीत.कोकणचा निसर्गरम्य समुद्रकिनारा,गडकिल्ले, प्रसिद्ध देवस्थाने,कर्नाळा अभयारण्य,डोंगरमाथ्यावर वसलेले माथेरान,नंदुरबार…
[04/08, 6:57 am] droneweb123: दीपक मोहिते, सूर्यातीर, पर्यटनवाढीसाठी जोमाने प्रयत्न हवेत, दरवर्षी राज्य व केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करत असते.मात्र इतर देशांच्या तुलनेत आपले पर्यटनक्षेत्र गेल्या सात दशकात वाढू शकले नाही.गेल्या ७७ वर्षात पर्यटनवाढीसाठी हजारो कोटी रु.च्या तरतुदी करण्यात आल्या.पण अजूनही आपल्या पर्यटनक्षेत्राला सुगीचे दिवस येऊ शकले नाही. ज्या कोकण परिसराला आपण कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहतो,तो कोकण आजही उपेक्षितच आहे.अस का घडलं ? तर या प्रश्नाचं उत्तर आहे,नोकरशाहीचा करंटेपणा व लोकप्रतिनिधींची उदासीनता होय.आपल्या राज्यात कोकण,प.महाराष्ट्र,विदर्भ व उ.महाराष्ट्र या उपविभागात अनेक पर्यटनस्थळे असून ते विकसित करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळात प्रभावीपणे विकासकामे झाली नाहीत.कोकणचा निसर्गरम्य समुद्रकिनारा,गडकिल्ले, प्रसिद्ध…
पालघर, कलम ३७० व ३५अ निष्कासित ; पाच वर्षे पूर्ण, बॉटमलाईन, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय संविधानातील अनुच्छेद ३७० हटवण्यासंदर्भातील विधेयक,राज्यसभेत मांडले ,होते व त्यास प्रचंड गदारोळात मंजुरी मिळाली होती.विरोधक या विधेयकाविरोधात आक्रमक झाले व जोरदार घोषणाबाजी करत विरोधी पक्षाचे तमाम खासदार वेलमध्ये उतरले होते. हे कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाख हा प्रदेश केंद्रशासित करण्यात आला.मात्र लडाखसाठी वेगळी विधानसभा निर्माण करण्यात आली नाही.या दोन महत्वाच्या घडामोडीसोबत कलम ३५ अ देखील हटवण्यात आले. कलम ३७० व ३५ अ हटवण्या संदर्भात केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून सावध पावले टाकण्यास सुरुवात केली होती.हे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये आंदोलन व निदर्शने…
दिपक मोहिते, बॉटमलाईन, वायनाड दुर्घटना ; पर्यावरणाचे महत्व वेळीच ओळखा, केरळ राज्यातील वायनाड या गावात दरड कोसळून सुमारे ३७३ जणांना आपले जीव गमवावे लागले.२२० लोक अद्याप बेपत्ता आहेत,तर २२५ जण गंभीर जखमी झाले आहेत.बचावपथकाने अद्याप शोधमोहीम सुरू ठेवली आहे.निसर्गाकडून अशाप्रकारचा कोप का होतो,यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी आपल्या राज्यातही माळीण व इर्शालवाडी येथे दरड कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडले होते.ही दोन्ही गावे डोंगर उतारावर वसलेली होती.वायनाड येथे झालेली दुर्घटनाही तशीच आहे.३० जुलै २०२४ ची सकाळ वायनाडवासीयांसाठी दुर्देवी ठरली.या दरडीखाली मेपड्डी व निलांबूर या दोन गावातील अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली व सर्वत्र हाहाकार उडाला.घटनेची खबर लागताच…
दीपक मोहिते, वास्तव, भूमीपुत्राना उध्वस्त करू नका,मुख्यमंत्र्यांना हजारो भूमीपुत्रांचे साकडे, गेल्या आठवड्यात विरार पश्चिमेस असलेल्या नवापूर या समुद्रकिनारी असलेल्या गावात सेव्हन सी बीच रिसॉर्टससमोर घडलेल्या हाणामारीच्या घटनेत मिलिंद मोरे या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली,या मारहाणीनंतर मोरे याना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला.ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मित्राचा मुलगा होता.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ते रिसॉर्टस तोडण्याचे आदेश दिले व महसूल विभागाने वेळ न दवडता तो एका रात्रीत जमीनदोस्त केला.मुख्यमंत्री शिंदे यांची ही कृती म्हणजे केवळ बेजबाबदारपणा होता.ज्या मुलांनी हाणामारी केली त्यांच्यावर कारवाई सुरू असताना रिसॉर्टस तोडणे हे अत्यंत चुकीचे होते. कारण ज्या तरुणांनी मिलिंद मोरे याना मारहाण केली,त्यांच्यावर गुन्हा दाखल करून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वाझेच्या पाठीशी असणाऱ्या अज्ञात शक्ती तोंडघशी पडतील, वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे,पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर अज्ञात शक्ती सक्रिय झाल्या व सचिन वाझे आता पुन्हा पोपटासारखा बोलायला लागला आहे.या सर्व घडामोडी अत्यन्त वेगाने घडल्या,यामागचे कारण काय असावे,असा प्रश्न सर्वानाच पडला असणार,ते कारण जाणून घेऊया. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १५ ऑगस्ट पूर्वी आणखी एक गौप्यस्फोट करणार आहेत.त्यामुळे काही जणांची घाबरगुंडी उडाली व त्यांनी वाझे याला रिचार्ज केले व सचिन वाझे पुन्हा वृत्तवाहिनीवर झळकू लागला.सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत…
दिपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आरक्षणप्रश्नी समाजाच्या नेत्यांनी स्वार्थी व सत्तापिपासू राजकारण्यांना ओळखावे, राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून जो सावळा गोंधळ सध्या चालला आहे,तो राज्याला विनाशाच्या वाटेवर नेणारा ठरणार आहे.आज मराठा,ओबीसी,धनगर व दलित या जातीमध्ये भांडणे लावून कोणालाही सुखाने सत्ता उपभोगता येणार नाही.मणिपूरमध्ये जे झालं व आजही होत आहे.ते आपल्या राज्यात होता कामा नये,याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे जे प्रयत्न सध्या होत आहेत,ते अत्यंत घातक असे आहेत.पण आपले राज्यकर्ते स्वार्थापोटी फार मोठ्या संकटाला आमंत्रण देत आहेत.या सर्व समाजाच्या नेत्यांनी या दळभद्री राजकारण्यांच्या नादी लागू नये,कारण या राजकारण्यांच्या अशा जीवघेणी खेळीमुळे आपल्या पोराबाळांचे भवितव्य अंधारात ढकलले जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे…
दीपक मोहिते, हल्लाबोल, अजित पवार यांच्या संतापाचा कडेलोट, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,हे आपले वागणं व वाचाळपणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात.त्यांचे वेषांतर करून व नाव बदलून दिल्लीला जाण्यावरून खा.संजय राऊत व खा.सुप्रिया सुळे या दोघांनी त्यांची पळता भुई थोडी केली आहे.खा.सुप्रिया सुळे यांनी तर संसदेत यावर केंद्र सरकारला जाब विचारल्यानंतर अजित पवार यांच्या संतापाचा कडेलोट झाला व त्यांनी आपल्या बहिणीला ” जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा,” सुनावले.अजित पवार हे आपल्या बेलगाम वागण्याने वारंवार वादाच्या भोवऱ्यात का सापडत असतात,असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आहे.लोकसमूह किंवा कार्यकर्त्याचा जमाव पाहून त्यांची जीभ नेहमी कशी काय घसरते ? एक राजकारणी म्हणून त्यांना…
पालघर,प्रतिनिधी, पालघरच्या रेल्वे समस्या मार्गी लागणार, खा.सवरा-रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव भेट, पालघरचे खा.डॉ.हेमंत सवरा यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या रेल्वेप्रवाशांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. चर्चेत त्यांनी नव्या गाड्या सुरू करणे,लांबपल्याच्या गाड्याना पालघर येथे थांबा देणे व विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले.त्यामध्ये प्रामुख्याने उमरोळी-विक्रमगड-जव्हार-मोखाडा-खोडाळा-इगतपुरी व ठाणे-भिवंडी-अंबाडी-वाडा-जव्हार-मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक पर्यायी मार्ग,डीएफसीसी रेल्वे मार्गाखाली पाणी साचून राहणे,किसान रेल सुरू करणे,गुजराथ,राजस्थान व दिल्लीला जाणाऱ्या गाड्याना पालघर थांबा₹ देणे,पालघर-सावंतवाडी गाडी सुरू करणे,इ.मागण्या सवरा यांनी केल्या.त्यास रेल्वेमंत्र्यांनी सकारात्म प्रतिसाद दिला.लवकरच रेल्वे अधिकाऱ्याची बैठक घेऊन या सर्व मागण्यांचे निराकरण करू,असे आश्वासन वैष्णव यांनी सवरा यांना दिले.रेल्वेमंत्र्याशी झालेल्या भेटीत मी अनेक महत्वाच्या…
पालघर, उद्या व परवा पालघरच्या समुद्रात महाकाय लाटा उसळणार, राज्याच्या महाराष्ट्र सागरी मंडळाने डहाणू,सातपाटी,केळवे- माहीम,अर्नाळा व वसई येथील समुद्रात सलग दोन दिवस प्रचंड लाटा उसळतील असा इशारा दिला आहे.त्यामुळे या समुद्रकिनारी असलेल्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे निर्देश असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. पालघर जिल्ह्यात सरासरी अडीच ते तीन हजार मि.मी. पाऊस पडतो.यंदाही जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला.मुसळधार वृष्टी झाली कि समुद्रातील वातावरण वादळी होत असते.वेगाने वारे वाहणे व प्रचंड उंचीच्या लाटा उसळणे,असे प्रकार सतत घडत असतात.यंदाही सातपाटी व डहाणूच्या समुद्रात सलग दोन दिवस ( ४ व ५ ऑगस्ट ) दुपारी १.०० ते ३.०० च्या दरम्यान ५.२० मी.उंचीच्या लाटा उसळतील,असा इशारा…
