पालघर,प्रतिनिधी,
पालघरच्या रेल्वे समस्या मार्गी लागणार,
खा.सवरा-रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव भेट,
पालघरचे खा.डॉ.हेमंत सवरा यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या रेल्वेप्रवाशांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली.
चर्चेत त्यांनी नव्या गाड्या सुरू करणे,लांबपल्याच्या गाड्याना पालघर येथे थांबा देणे व विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले.त्यामध्ये प्रामुख्याने उमरोळी-विक्रमगड-जव्हार-मोखाडा-खोडाळा-इगतपुरी व ठाणे-भिवंडी-अंबाडी-वाडा-जव्हार-मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक पर्यायी मार्ग,डीएफसीसी रेल्वे मार्गाखाली पाणी साचून राहणे,किसान रेल सुरू करणे,गुजराथ,राजस्थान व दिल्लीला जाणाऱ्या गाड्याना पालघर थांबा₹
देणे,पालघर-सावंतवाडी गाडी सुरू करणे,इ.मागण्या सवरा यांनी केल्या.त्यास रेल्वेमंत्र्यांनी सकारात्म प्रतिसाद दिला.लवकरच रेल्वे अधिकाऱ्याची बैठक घेऊन या सर्व मागण्यांचे निराकरण करू,असे आश्वासन वैष्णव यांनी सवरा यांना दिले.रेल्वेमंत्र्याशी झालेल्या भेटीत मी अनेक महत्वाच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले व त्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला.त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या आता मार्गी लागू शकतील,असे खा.डॉ.हेमंत सवरा यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

