- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, विरार-चिखलडोंगरे येथे सबस्टेशनचे भुमीपूजन, मंत्रालयापासून ते जिल्हाधिकारी आणि ही सब स्टेशनची जागा मिळवण्यासाठी आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितीज ठाकूर यांचे लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या प्रबळ पाठपुरावामुळेच हे सबस्टेशन साधारणपणे येत्या २ वर्षात पूर्ण करण्यात येईल,असे आश्वासन महापारेषणचे अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी कार्यक्रम प्रसंगी चिखल डोंगरे येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला वसईचे आ. हितेंद्र ठाकूर,नालासोपाऱ्याचे आ. क्षितीज ठाकूर,माजी महापौर नारायण मानकर,माजी स्थायी समिती सभापती जितुभाई शहा,आजीव पाटील,प्रशांत राऊत,माजी नगराध्यक्षा कांता पाटील,माजी नगरसेवक रंजन पाटील,वामन पाटील,माजी सरपंच रामचंद्र मेहेर,गोवालीज औद्योगिक चे अशोक ग्रोव्हर,अशोक कुलास,किशोर शेट्टी ,महावितरण कंपनी चे मुख्य अभियंता महेश भागवत,अधीक्षक अभियंता मोहन ननावरे,कार्यकारी अभियंता योगेश पोलपांडे…
पालघर, फ्रंटलाईन, एक देश,एक निवडणूक ; शिफारशींना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ” एक देश,एक निवडणूक,” या प्रणालीला नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यावर दोन्ही सभागृहात मंजुरी मिळावी,यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.पण त्यांच्या या प्रयत्नांना प्रादेशिक पक्षाची साथ मिळेल,अशी शक्यता नाही.कारण ही प्रणाली प्रादेशिक पक्षाना मारक ठरणारी आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे इंडिया गटानेही यावर विचार करण्यासाठी आपल्या घटक पक्षाची बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारने १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले.या बैठकीत ” एक देश,एक निवडणूक,” या महत्वाच्या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी एकमताने स्विकारण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी होणारा प्रचंड खर्च,वेळेचा…
दीपक मोहिते, सामाजिक भान, सरकारची अवस्था ; धरलं तर चावत आणि सोडलं तर पळते,” आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात जाती-धर्म व समाजा-समाजात भांडणे लावली,आज हीच भांडणे महायुतीच्या चांगलीच अंगलट आली आहेत.मराठा-ओबीसी व धनगर-आदिवासी आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.जाती-धर्मात आग लावल्यानंतर ती आटोक्यात आणणे,कदापी शक्य होत नाही.त्यामुळे आज आरक्षणाच्या प्रश्नावरून तीन इंजिन सरकारची प्रचंड दमछाक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.तर त्याच्याविरोधात ओबीसी समाजाच्या नेत्यांनीही याच गावात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे अंतरवाली-सराटीमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे.मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी जरांगे…
दीपक मोहिते, ” राजकीय डावपेच,” महामंडळाची खिरापत वाटून भाजपने डाव साधला, भाजपच्या चाणक्याने एका चेंडूमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा नुकताच त्रिफळा उडवला आहे.शिंदे गटातील अनेकांना महामंडळाची लॉटरी लागली आहे.ज्यांना ही लॉटरी लागली आहे,त्यांना भाजपने विधानसभेसाठी असलेल्या इच्छुकांच्या भल्यामोठ्या रांगेतून आता बाहेर काढले आहे.तर अजित पवार गटाच्या तोंडालाही पाने पुसली आहेत.अशाप्रकारे अनेक इच्छुक उमेदवारांना आता उमेदवारी मागता येणार नाही.महामंडळाच्या खिरापती वाटण्यात आल्यामुळे भाजपने स्वतःचा मार्ग अत्यंत हुशारीने मोकळा करून घेतला आहे.अजित पवार व एकनाथ शिंदे या गटाच्या जागा स्वतःकडे खेचून घेण्यासाठी भाजपकडून आखण्यात आलेली रणनिती यशस्वी ठरली आहे.शिंदे गटाचे संजय शिरसाठ व भरत गोगावले हे मंत्रीपदासाठी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” आधीच मर्कट,त्यामध्ये दारू प्यायले,” काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून महायुतीच्या लोकांनी राज्यात जो काही धुमाकूळ घातला,त्याचा निषेध करावा,तेवढा थोडाच म्हणावा लागेल.राहुल गांधी यांनी मुलाखतीमध्ये आपले जे मत मांडले,त्याचे भाजपच्या आयटी सेलने ” कट अँड पेस्ट,” निती वापरून क्लिप व्हायरल केली.त्यानंतर आ.संजय गायकवाड व खा.अनिल बोंडे,यांनी एकामागोमाग अकलेचे तारे तोडले.ज्यांचे ” वरचे मजले रिकामे,” आहेत,अशा या दोन महाभागांची राजकीय वाटचाल अतिशय वादग्रस्त आहे.त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणे,म्हणजे स्वतःचे डोके दगडावर आपटून घेण्यासारखे आहे. वास्तविक खा.राहुल गांधी यांनी मुलाखतीमध्ये मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नाला अत्यंत अभ्यासपूर्ण व देशातील सामाजिक व्यवस्थेचे भान राखून उत्तर दिले…
दीपक मोहिते, ” बदलते राजकारण,” येत्या १५ दिवसात राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी, महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात मोठा राजकीय बॉम्ब फुटणार आहे.त्याची कुणकुण महायुतीच्या नेत्याना लागल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक,या बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग आला आहे.शरद पवार यांची भेट मिळावी,यासाठी अनेक आमदार रांगा लावत आहेत.त्यामध्ये महायुतीच्या २५ ते २८ आमदारांचा समावेश आहे.पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शरद पवार यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती,महायुतीमधील अंतर्गत वाद,अजित पवार व एकनाथ शिंदे या दोघांमध्ये वाढत चाललेली दरी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याची सूत्रे काढून घेण्याच्या दिल्लीत सुरू झालेल्या हालचाली लक्षात घेऊन तिन्ही घटक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप ; लोकमान्य टिळक स्वर्गात अश्रु ढाळत असतील, हिंदू धर्मात गणेशोत्सव व शिवजयंती,या दोन उत्सवाला अनन्यसाधारण महत्व असून हे दोन्ही उत्सव गेल्या अनेक शतकापासून उत्साहात साजरा करण्यात येत असतो.आपली संस्कृती व धर्म,याविषयी प्रत्येक हिंदूंच्या मनात अस्मिता कायम जागृत असावी. तसेच आपापसातील मतभेद दूर सारून सर्व भारतीयांनी एकत्र यावे,अशी लोकमान्य टिळकांची इच्छा होती.त्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेचा जन्म झाला.स्वातंत्र्यपूर्व काळात पारतंत्र्यातील आपल्या बांधवांना संघटीत करावे व त्यांच्यामध्ये राष्ट्रीय अस्मिता जागृती करावा,असाही एक उद्देश होता.परंतु अलीकडच्या काळात लोकमान्यांनी सुरू केलेल्या या उत्सवाला हिडीस स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे.हल्ली लाडक्या बाप्पाला किती सोने व पैसे जमा होतात,यावर गणपतीचे…
दीपक मोहिते, सरन्यायाधीशानी मौन सोडायला हवे,अन्यथा चौथा स्तंभही निखळून पडेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाण्यावरून देशभरात जो धुरळा उडाला होता,तो आता बराच खाली आला आहे.या प्रकरणी अनेक घटनातज्ञानी, पंतप्रधान व सरन्यायाधीशांनी लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत,अशा शब्दात या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.आता हा गदारोळ संपत आला असला तरी या दोघांनी या प्रकरणी जे मौन बाळगले आहे,ते अत्यंत चिंताजनक तर आहेच पण आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारेही आहे.या दोघांपैकी एकाने तरी कोणी कोणाला बोलावले ? याविषयी खुलासा करणे,गरजेचे होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वभाव लक्षात घेता,ते कधीही खुलासा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.पण सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मौन…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्हाला असले सावत्र भाऊ नकोत- अंगणवाडी सेविका, कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुका जिंकायच्याच या इर्षेने तीन इंजिनच्या सरकारने सरकारी खजिन्याची अक्षरशः लूट चालवली आहे.” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,” राबवण्यासाठी इतर विभागाचा पैसा ओरबाडून खाण्यात येत आहे.योजनांच्या प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातीसाठी २७० कोटी रु.मंजूर करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री लाडकी बहीण इतर योजनांसाठी लागणाऱ्या ८० हजार कोटी रु.चा बोजा सरकारी खजिन्यावर पडेल,अशी भिती अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नव्या योजनांमुळे राज्याचे आर्थिक गोळा बेरीज पूर्णपणे कोलमडून पडली आहे.दुसरीकडे जुनी पेंशन योजना लागू करा,यासाठी विविध संघटनांनी सरकार प्रचंड दबाव वाढवला आहे.त्यामुळे सरकार सध्या अडचणीत आले आहे.ही…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” देशात ” एक देश,एक निवडणूक,” संकल्पनेचे वारे वाहू लागले, ” एक देश,एक निवडणूक,” हा विषय गेली अनेक वर्षे चर्चेत आहे.गेल्या महिन्यात स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आपल्या भाषणात ” एकत्रित निवडणुका,” घेण्याचा आपला मनोदय व्यक्त केला होता.काल त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याचा मनोदय व्यक्त केल्यामुळे देशातील प्रादेशिक पक्षासह राष्ट्रीय पक्ष सावध झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना प्रादेशिक पक्षामुळे देशावर एकछत्री कारभार करणे,शक्य होत नाही.या प्रादेशिक पक्षामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे ” अबकी बार ४०० पार,” चे स्वप्न पार भंगले. त्यामुळे २०२९ च्या निवडणुका या एकत्रित निवडणूक पद्धतीने…
