दीपक मोहिते,
विरार-चिखलडोंगरे येथे सबस्टेशनचे भुमीपूजन,
मंत्रालयापासून ते जिल्हाधिकारी आणि ही सब स्टेशनची जागा मिळवण्यासाठी आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितीज ठाकूर यांचे लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वाचे योगदान आहे.
त्यांच्या प्रबळ पाठपुरावामुळेच हे सबस्टेशन साधारणपणे येत्या २ वर्षात पूर्ण करण्यात येईल,असे आश्वासन महापारेषणचे अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी कार्यक्रम प्रसंगी चिखल डोंगरे येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला वसईचे आ. हितेंद्र ठाकूर,नालासोपाऱ्याचे आ. क्षितीज ठाकूर,माजी महापौर नारायण मानकर,माजी स्थायी समिती सभापती जितुभाई शहा,आजीव पाटील,प्रशांत राऊत,माजी नगराध्यक्षा कांता पाटील,माजी नगरसेवक रंजन पाटील,वामन पाटील,माजी सरपंच रामचंद्र मेहेर,गोवालीज औद्योगिक चे अशोक ग्रोव्हर,अशोक कुलास,किशोर शेट्टी ,महावितरण कंपनी चे मुख्य अभियंता महेश भागवत,अधीक्षक अभियंता मोहन ननावरे,कार्यकारी अभियंता योगेश पोलपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.ठाकूर म्हणाले,
गावकरी आणि सर्वांच्या सहकार्याने १६७ कोटी खर्चाच्या २२२ के.व्ही. सबस्टेशनचे काम आज मार्गी लागले आहे.
सबस्टेशनचं हे काम लवकरच मार्गी लागावे यासाठी येत्या चार दिवसात या कामासंबंधी आपण पुन्हा एक बैठक घेणार आहोत.
या बैठकीत संबंधित सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून तांत्रिक अडचणी समजून घेणार आहोत.
आम्ही विकासकामासंदर्भात आपल्याला सहकार्य करायला नेहमीच तयार असतो,अशा शब्दात आम ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना विश्वास दिला. हे काम लवकरात लवकर मार्गी लागणं अपेक्षित आहे,पण अधिकारी एकमेकांना नाचवण्यात आणि आपली ताकद दाखवण्यात धन्यता मानत असतात.
अशावेळी आम्हा लोकप्रतिनिधींना अशा कामात हस्तक्षेप करावा लागतो. अशा लोकोपयोगी कामात अशा गोष्टी घडू नयेत,दिलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावं,यासाठी आपण येत्या चार ते सहा दिवसात एक बैठक घेऊ केवळ उद्घाटन केलं व नारळ फोडला असे नव्हे,असे सांगत आ. हितेंद्र ठाकूर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

