Author: दीपक मोहिते

नवीन देसाई,वाशी, शिंदे यांच्यामागे आणखी एक शुक्लकाष्ठ, राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.दोन आठवड्यापूर्वी त्यांनी शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार भरवून त्यांनी शिंदे यांच्याविरोधात शड्डू ठोकले होते.आता त्यांनी शिंदे यांच्या एका निर्णयाला आव्हान दिले आहे.मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी महानगरपालिकेत समाविष्ट करणारा अध्यादेश जारी केला होता.तो अध्यादेश रद्द करण्याची मागणी नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.ही सर्व गावे पूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेत होती,पण मालमत्ताकराचा भार पडल्यामुळे ही गावे बाहेर पडली होती.पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांनी अध्यादेश करून ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात विमानतळ : विकासाच्या लाटेत स्थानिक भूमिपुत्र उध्वस्त होता कामा नये… दोन दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना काही महत्वाच्या घोषणा केल्या.त्यामध्ये मुंबई व आसपासच्या महानगर प्रदेश विकास क्षेत्रात एकूण तीन विमानतळे असतील,या घोषणेचा समावेश होता.हे नवीन विमानतळ पालघर जिल्ह्यात वाढवण पंचक्रोशीत उभारण्यात येणार आहे.या भागात उभारण्यात येणाऱ्या महाकाय आधुनिक बंदराच्या पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेन व आता विमानतळ उभारण्यात येत आहे.बंदर,बुलेट ट्रेन व आता नव्याने होऊ घातलेले विमानतळ,या तीन विकासकामांमुळे पालघर जिल्ह्याला वेगळी झळाळी येणार आहे.उद्योगधंद्याला चालना मिळून या उपप्रदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.केंद्र सरकारचे हे निर्णय स्तुत्य असले तरी या प्रक्रियेत स्थानिक भूमीपुत्र…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरी येथे ग्रामीण भागातील मुलींना प्रेरणा देणारा उपक्रम, तलासरी तालुक्यात, गुजरातच्या सीमेवर औद्योगिक क्षेत्र जवळ असल्याने मुलांना सहज रोजगार मिळतो, त्यामुळे उच्च शिक्षणाकडे त्यांचा कल कमी असतो. विशेषतः मुलींच्या शिक्षणामध्ये मोठी हेळसांड होत असते.घरातील अशिक्षित पालकांमुळे मार्गदर्शनाचा अभाव आणि समाजात उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांचे प्रमाण कमी असल्याने, मुलींना पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी ” सन्मान नारीशक्तीचा,” हा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.३ ते ८ मार्च या कालावधीत शाळेने आपल्या परिसरातील शिक्षणाच्या जोरावर संघर्ष करून यश मिळवलेल्या महिलांना आमंत्रित करून त्यांचा गौरव करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाचा मुख्य…

Read More

वसंत भोईर,वाडा देहर्जे प्रकल्पातील बाधितांच्या पुनर्वसनासाठीच्या भूसंपादनात गैरव्यवहार, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील देहर्जा मध्यम धरण प्रकल्पामुळे विस्थापित होणा-या धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील भूसंपादन व मूल्यांकन समितीद्वारे थेट वाटाघाटीद्वारे खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप पीक ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र जोगवला यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे तक्रार केली आहे. देहर्जे प्रकल्प हा वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. विक्रमगड तालुक्यात मौजे सुकसाळे येथे या प्रकल्पाचे काम सुरु आहे.या प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात जांभे,साखरे, खुडेद ही एकूण तीन आदिवासी महसुली गावे येत असून चार पाडे अंशतः बाधीत…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, श्रमजीवी संघटनेचा तहसील कार्यालयावर होळी (शिमगा) मोर्चा, विक्रमगड तालुक्यातील गाव खेडयातील आदिवासींच्या विकासाचा समतोल ढासळला असुन शासनाच्या उदासिन धोरणामुळे येथील मजूर, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी विविध मुलभुत सुविधा अभावी हैराण आहेत. या विविध मागण्यासाठी आज विक्रमगड तहसिल कार्यालयावरत तालुका श्रमजीवी सघटनेने होळी ( शिमगा ) मोर्चा काढला. शासनाच्या रोजगार हमीच्या कामाची मजुरी मिळत नसल्याने याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना निवदेन देण्यात आले होते.त्यानुसार आज सदर मोर्चामध्ये घेतलेल्या विविध विषयांवर तहसिलदार,रोहयोचे अधिकारी,व सबधित विभागाच्या अधिकारी याचेसमवेत चर्चा करण्यात आली. विक्रमगड तालुक्याच्या निर्मीतीस आज २६ वर्षाचा काळ लोटला आहे.तरीही आदिवासी गाव पाड्यातील नागरीक विविध सुविधांपासुन वंचित आहेत.देशाला स्वातंत्र मिळुन…

Read More

दीपक मोहिते, अरे हाssड… मी गंगाजल पिणार नाही.. दोन दिवसापूर्वी राज ठाकरेंनी गंगाजलाची उडवलेली खिल्ली व केलेले हातवारे हे कोणाच्याच मनाला पटलेले नाही.गंगाजल हे किती शुद्ध आहे,हा मुद्दा महत्वाचा नाही. पण पुराण काळापासून वाहणाऱ्या गंगा नदीशी तुमच्या आमच्या धार्मिक भावना निगडीत आहेत.या नदीकिनारी राहणारा स्थानिक नागरिक त्या पाण्यावरच आपली तहान भागवत असतो,हे आपण लक्षात घ्यायला हवे होते.लोकांच्या आस्था या गंगाजलाशी वर्षानुवर्षे जोडल्या गेल्या आहेत.ते तुम्हाला कदापि नाकारता येणार नाही. तुमच्या पक्षाचे काही पदाधिकारी पक्षाचा महत्त्वाचा कार्यक्रम बुडवून कुंभमेळ्याला गेले होते.त्यांना तूम्ही जाब विचारायला हवा होता. त्यापैकी एका पदाधिकाऱ्यांने तुमच्यासाठी गंगाजल आणले आणि त्याला तूम्ही हाssड म्हणत ते गंगाजल पिणार नाही,अशी…

Read More

दीपक मोहिते, भितीने व्याकुळ झालेल्या एका बापाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, सध्या राज्यात जे काही चालले आहे,ते पाहून व्यथित झालेल्या एका बापाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माझ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,अशी गळ घातली आहे. ते आपल्या पत्रात काय म्हणतात ते पहा,” माझ्या अकरा वर्षाच्या मुलाने मला काल प्रश्न विचारला ” आप्पा मी मोठा झाल्यावर कलेक्टर होऊ का ? की त्यापेक्षाही मोठा अधिकारी ? त्याच्या या प्रश्नाने मी बुचकळ्यात पडलो.कारण बीडची एक ना अनेक प्रकरणे माझ्या डोळ्यासमोर तरळत होती.वाल्मिक कराड,त्याची खतरनाक टोळी,खोक्या,धनंजय मुंडे,सुरेश धस, मनात विचार आला की त्याला आयपीएस किंवा आयएएस अधिकारी बनवायचं,आणि असल्या फालतू व मानवजातीला काळिमा फासणाऱ्या…

Read More

शुभम सावंत,विरार, विवा महाविद्यालयात “अ‍ॅक्युप्रेशर अँड अ‍ॅक्यूपंक्चर,” व्याख्यान संपन्न, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विवा महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने “अ‍ॅक्युप्रेशर अँड अ‍ॅक्यूपंक्चर” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शैला सावंत, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी.श.अडिगल,उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि उपप्राचार्या डॉ.दीपा वर्मा, महिला सक्षमीकरण कक्षाच्या प्रमुख प्राक्तना कोरे उपस्थित होते. महिला सक्षमीकरण कक्ष आणि आयक्यूएसी यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्राचे उद्दीष्ट अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्यूपंक्चरच्या उपचारात्मक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे होते. शरीरातील उर्जेचा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी दबाव आणि सुया वापरणाऱ्या या प्राचीन चीनी उपचारपद्धतींचे महत्त्व या सत्रात स्पष्ट…

Read More

नाशिक प्रतिनिधी, सरकारने साडेचार कोटी कामगारांना वाऱ्यावर सोडले, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील साडेचार कोटी संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. कामगार खात्यासाठी फक्त १७१ कोटीची तरतूद केली आहे. राज्य सरकारने उद्योग वाढीसाठी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.या धोरणानुसार चाळीस लाख कोटी रु.ची गुंतवणूक तसेच ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. यासाठी उत्पादन तसे निर्यात प्रोत्साहन धोरणाची अंमलबजावणी ही करण्यात येणार आहे.अर्थात त्यांची ही घोषणा पूर्वीच्या घोषणांप्रमाणेच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडे ठरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात उद्योग विभागासाठी १०२१ कोटीची तर कामगार विभागाला फक्त १७१ कोटीची तरतूद केली…

Read More

संजय लांडगे,वाडा थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघटनेचा वाडा तहसील कार्यालयावर मोर्चा, आपल्या देशातील प्रत्येक गरिबाच्या हाताला काम मिळावे,म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू करण्यात आली.या योजनेतील कामगारांची थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघानेचा वाडा तहसील कार्यालयवर मोर्चा आपल्या देशामध्ये प्रत्येक गरिबाच्या हाताला काम मिळावे म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू करण्यात आली.मात्र या योजनेकडे शासन व प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे हजारो नागरिकांना हक्काच्या रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे.वाडा तालुका हा ग्रामीण तथा आदिवासी बहुल तालुका असून मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करतात.…

Read More