संजय नेवे,विक्रमगड,
श्रमजीवी संघटनेचा तहसील कार्यालयावर होळी (शिमगा) मोर्चा,
विक्रमगड तालुक्यातील गाव खेडयातील आदिवासींच्या विकासाचा समतोल ढासळला असुन शासनाच्या उदासिन धोरणामुळे येथील मजूर, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी विविध मुलभुत सुविधा अभावी हैराण आहेत.
या विविध मागण्यासाठी आज विक्रमगड तहसिल कार्यालयावरत तालुका श्रमजीवी सघटनेने होळी ( शिमगा ) मोर्चा काढला. शासनाच्या रोजगार हमीच्या कामाची मजुरी मिळत नसल्याने याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना निवदेन देण्यात आले होते.त्यानुसार आज सदर मोर्चामध्ये घेतलेल्या विविध विषयांवर तहसिलदार,रोहयोचे अधिकारी,व सबधित विभागाच्या अधिकारी याचेसमवेत चर्चा करण्यात आली.
विक्रमगड तालुक्याच्या निर्मीतीस आज २६ वर्षाचा काळ लोटला आहे.तरीही आदिवासी गाव पाड्यातील नागरीक विविध सुविधांपासुन वंचित आहेत.देशाला स्वातंत्र मिळुन ७५ वर्षे उलटूनही ग्रामस्थांना गाव/पाडयात जनतेला विविध समस्यामध्ये आपले जीवन जगावे लागत आहे.आजही या भागातील आदिवासी समाज विविध कामावर केलेल्या हक्काची मजुरीची मागणी करत आहेत.त्यामुळे या होळी ( शिमगा ) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निवेदनांत खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
१.ग्रामपंचायत साखरे/खुडेद/सुकसाळे/जांभा जीवन प्राधिकरण योजनेचे काम तत्काळ सुरु व्हावे,
२.तालुक्यातील रोजगार हमीची कामे सुरु असुन रखडलेली मजुरी मजुरांच्या बॅक खात्यावर जमा करण्यांत यावी व ज्या भागात कामे सुरु नाहीत तेथे कामे सुरु करावीत,
३.घरकुल योजनेतील ड चा सर्व्हे झाला पाहिजे
४.खुडेद ( विजयनगर ) महसूल गाव विक्रमगड तालुक्यात समाविष्ट करण्यात यावे,
५.रोजगार सेवकाचे थकीत मानधन मिळावे,
तसेच विविध विषयांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत चर्चा व योग्य ती उपाययोजना करावी,
या मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवीचे पदाधिकारी मंगेश काळे,कैलास तुंबडा,रुपेश डोले आदींनी केले.

